Sunday, 1 September 2019

यूईएफए 2018-19 चॅम्पियन्स लीगचे पुरस्कार जाहीर

​​​

🅱 लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला.

🅱 गुरुवारी रात्री झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19 या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

🅱 त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.

🅱 लिव्हरपूलला 2018-19 च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता.

🅱 बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

🅱 यापूर्वी 2012 मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.

🅱 आंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड्स फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या व्हॅन डिकला मे महिन्यात प्रीमियर फुटबॉल लीगचासुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.

🅱 28 वर्षीय व्हॅन डिकने युव्हेंटसच्या रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेसी यांना मागे टाकले.

🅱 गेल्या आठ वर्षांत मेसी अथवा रोनाल्डो यांच्यापैकीच एकाने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. याव्यतिरिक्त, मेसीने सर्वोत्तम आक्रमक, तर लिव्हरपूलच्याच अ‍ॅलिसन बेकरने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.

❇️ पुरस्कार विजेते :

▪️सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू : व्हॅन डिक

▪️गोलरक्षक :अ‍ॅलिसन बेकर

▪️मध्यरक्षक : फ्रँक डी जाँग

▪️आक्रमणपटू : लिओनेल मेसी

▪️बचावपटू : व्हॅन डिक

राष्ट्रीय पोषण आठवडा


- 1 ते 7 सप्टेंबर
- 1982 पासून केंद्र सरकारकडून साजरा केला जातो.
- लोकांच्या आरोग्यसंबंधी आणि सुदृढपणासाठी जागृकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
----------------------------------------------
● उद्देश

- आहार आणि पोषणाची वारंवरता यांचा आढावा घेणे
- राष्ट्रीय पोषण कार्यक्रमासंबंधी संशोधन आणि मजबुतीवर लक्ष्य ठेवणे
- लोकांच्या आहार आणि पोषणासंबंधीच्या स्थितीचे निरीक्षण करणे
- पोषणविषयक समस्यांचे निर्मूलन करणे
- आरोग्य आणि पोषणविषयक शिक्षण देवून जागृकता निर्माण करणे

मराठी प्रश्नसंच 2/9/2019

1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?
   1) अपसरण चिन्ह    2) स्वल्पविराम    3) अपूर्ण विराम    4) संयोग चिन्ह
उत्तर :- 4

2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
     भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.
   1) यमक – अनुप्रास    2) अनन्वय – दृष्टान्त  3) अन्योक्ती – स्वभावोक्ती  4) शब्दालंकार आणि अर्थालंकार
उत्तर :- 4

3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे  ?
   1) अभ्यस्त      2) सामासिक    3) प्रत्ययसाधित    4) यापैकी कोणताही नाही
उत्तर :- 1

4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
      वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
   1) अभिधा      2) लक्षणा    3) व्यंजना    4) धववाणी
उत्तर :- 3

5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
   1) जलद      2) कसर      3) पथ      4) वीज
उत्तर :- 4

1) ‘इ, ई’ – या स्वरांची उच्चारस्थाने लिहा.
   1) तालव्य    2) मूर्धव्य      3) दन्त्य      4) ओष्ठय

उत्तर :- 1

2) ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह –

   1) मन + रथ    2) मनो + रथ    3) मन + ओरथ    4) मन: + रथ

उत्तर :- 4

3) ज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून येतो किंवा बदल करता येते त्या शब्दांना ........... असे म्हणतात.

   1) विकारी    2) अविकारी    3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 1

4) पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.

   1) वकिली    2) गुलाम      3) गायक      4) लबाड

उत्तर :- 1

5) ‘मी स्वत: त्याला पाहिले,’ या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) अनिश्चित    2) संबंधी      3) दर्शक      4) आत्मवाचक

उत्तर :- 4

डिजी ठाणेला स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

🔰इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

🔰इस्राईलची राजधानी तेल अविवमध्ये हा प्रकल्प पाहिल्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले.

🔰"स्कॉच' या संस्थेकडून दरवर्षी पर्यावरण, स्मार्ट सिटी व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो.

🔰"डिजी ठाणे' या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

🔰डिजी प्रकल्प उभारणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.

लिव्हरपूलचा व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी

लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला.

गुरुवारी झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19 या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.

तर लिव्हरपूलला 2018-19च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता.

बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2012मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला


◾️मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीत सुद्धा दिसतील.

◾️नरवणे मराठमोळे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले.

◾️आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.

◾️ परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान


● राष्ट्रीपती रामनाथ कोविंद यांना गिनी या प्रजासत्ताकचा सर्वोच्च सन्मान "नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट" देण्यात आला आहे.

● गिनी आणि भारतामधील विकास आणि संबंधांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

गिनी

● गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याला पूर्वी फ्रेंच गिनी म्हणून ओळखले जात असे.

● गिनी 2 ऑक्टोबर 1958 रोजी फ्रान्सपासून स्वतंत्र झाला

● गिनीचे क्षेत्रफळ 2,45,836 चौरस किलोमीटर आहे.

● त्याची राजधानी कोनाक्री आहे.

● गिनीची अधिकृत भाषा फ्रेंच आहे.

● गिनियाचे सध्याचे अध्यक्ष अल्फा कांडे आहेत, तर अब्राहम कसुरी फोफाना हे गिनियाचे पंतप्रधान आहेत.

चंद्रिमा शहा : भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा


● प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
● 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
● याआधी त्या  दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी :
● या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
● ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.
● उद्देश : देशात विज्ञानाचा प्रसार करणे
● मुख्यालय : नवी दिल्ली
● यापूर्वीचे अध्यक्ष : अजय सूद
● वर्तमान अध्यक्षा : चंद्रिमा शहा

डीआरडीओ ची QRSAM चाचणी यशस्वी.


● नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने DRDO सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम (क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल) ची यशस्वी चाचणी घेतली.

●ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत हवाई लक्ष्य ठेवले होते.

QRSAM (Quick Reaction Surface-to-Air Missile)

● हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) भारतीय सैन्यासाठी विकसित केले आहे.

● डीआरडीओ ने या मिसाइल ची निर्मिती भारत इलेक्ट्रनिक्स लिमिटेड च्या मदतीने केली आहे.

● हे क्षेपणास्त्र फारच कमी वेळात शत्रूंच्या लक्ष्यांवर नजर ठेवू शकते.

◆ इंधन प्रकार : घन इंधन
◆ रेंज : 25-30 किमी

● हे क्षेपणास्त्र एका ट्रकवर तैनात केले जाऊ शकते.

●  हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर असलेले आपले लक्ष्य नष्ट करू शकते.

● क्यूआरएसएएमची प्रथम चाचणी 4 जुलै 2017 रोजी घेण्यात आली, नंतर 26 फेब्रुवारी 2019 रोजी या क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या.

टाइम्सच्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ यादीत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा समावेश


● गुजरातमधल्या 597 फूट उंची असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याला टाइम्स मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ या यादीत स्थान दिले गेले आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईचे ‘सोहो हाऊस’ या इमारतीनेही या यादीत स्थान मिळवले.

✅ सन 2019 मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या जगातली प्रथम पाच ठिकाणे -

1. जियोसी जियोथर्मल सी बाथ्स (हुसविक, आइसलँड )
2. कॅम्प अ‍ॅडव्हेंचर (रॉनेडे, डेन्मार्क)
3. मोरी बिल्डिंग डिजिटल आर्ट म्युझियम (टोकियो, जपान)
4. स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज अॅट डिस्नेलँड (अॅनाहिम, कॅलिफोर्निया)
5. SFER IK (तुलूम, मेक्सिको )

● गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर उंच आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. त्याचे अनावरण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ही शिल्पाकृती विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारले. विक्रमी 33 महिन्यांमध्ये याचे बांधकाम केले गेले.

● मुंबईचे सोहो हाऊस हे 11 मजली इमारतीत असून ते अरबी समुद्राकाठी आहे. येथे 34 बैठकांचे सिनेमागृह, एक लायब्ररी आणि एक रूफटॉप बार आणि पूल आहे.

राज्यात पोलीस भरती ३ सप्टेंबरपासून सुरू होणार


📢   खूप दिवसांपासुन प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस भरतीची  जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी *३ सप्टेंबरपासून* ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहणार

💁‍♂  *पोलीस भरती प्रक्रिया मध्ये झाले मोठे बदल*

▪  राज्यात पहिल्यांदाच पोलीसभरती प्रक्रिया हि महापोर्टलद्वारे होणार आहे.

▪  यावेळेस पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आणि नंतर मैदानी चाचणी  होणार

▪  लेखी परीक्षा हि पूर्वीप्रमाणेच  ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे.

▪  लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार

🙋‍♂   *शारीरिक चाचणीतील बदल*

🔰   मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे

🔰   मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत.

👱‍♂  *पुरुष उमेद्वार शारीरिक चाचणी*  -  ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० राहतील

👱‍♀  *महिला उमेद्वार शारीरिक चाचणी*  -   मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण राहतील

✍  *NOTE - पोलीस भरती बाबत हे महत्वाचे अपडेट आहे*

राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी जाहीर, यादीत 3.11 कोटी नागरिकांचा समावेश

👉आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याची अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आली.

👉 NRCच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या अंतिम यादीत 3,11,21,004 नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे तर 19,06,657 नागरिकांना यादीतून वगळण्यात आले आहे.

👉राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या या यादीमुळे अनेकांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

👉 कारण या यादीतून आसाममधल्या त्या नागरिकांना वेगळे केळे जाईल ज्यांनी 1971 सालानंतर बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश केला होता.

👉गृहमंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, NRCमध्ये नाव समाविष्ठ नसलेल्या एखाद्या व्यक्तीला परदेशी ठरवळे जाणार नाही.

👉ज्या नागरिकांची नावे प्रस्तावित NRCमधून वगळण्यात आली आहेत त्यांना अपील करण्याची संधी मिळेल.

🌹🌳🌴NRC म्हणजे काय?🌴🌳🌹

👉राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) यामध्ये देशातल्या अधिकृत नागरिकांची नोंद असते.

👉ज्या नागरिकांचे नाव NRCमध्ये नसते त्याना अवैध मानले जाते.

👉NRCनुसार 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतीय मानले जात आहे.

👉NRC भारतीय नागरिकांच्या नावांची एक नोंदणी यादी आहे जे सन 1951 मध्ये तयार करण्यात आली होती.

👉आसाममध्ये बांग्लादेशामधून अवैधपणे आलेल्या लोकांच्या प्रश्नावरुन सर्वोच्च न्यायलयाने NRC अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

👉पहिली NRC 1951 साली जाहीर केले गेले होते. 

स्टार्टअप उद्योगांसाठी CBDTने ‘स्टार्ट-अप कक्ष’तयार केले

👉31 ऑगस्ट 2019 रोजी स्टार्ट-अप उद्योगांच्या प्रकरणाबाबत करविषयक तक्रारींचे निवारण आणि संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका ‘स्टार्ट-अप कक्ष’ (Start-up Cell) याची स्थापना केली.

👉स्टार्ट-अप उद्योगांच्या मूळ अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने CBDTने हा निर्णय घेतला.

👉हे समर्पित कक्ष ‘आयकर कायदा-1961’ याच्या प्रशासनाच्या संदर्भात स्टार्ट-अप संस्थांच्या बाबतीत कर-संबंधीत तक्रारींचे निवारण आणि अडचणी दूर करण्यासाठी कार्य करणार आहे.

🌹🌳🌴केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) 🌴🌳🌹

👉हे मंडळ भारतात प्रत्यक्ष करविषयक धोरणे आणि नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रदान करते.

👉CBDT हे ‘केंद्रीय महसूल मंडळ अधिनियम-1963’च्या अंतर्गत दि. 1 जानेवारी 1964 पासून कार्यरत असलेले एक वैधानिक प्राधिकरण आहे. हे मंडळ अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

👉‘केंद्रीय महसूल मंडळ कायदा-1924’ याच्या अंमलबजावणीनंतर कर प्रशासनासह आकारण्यात आलेले ‘केंद्रीय महसूल मंडळ’ अस्तित्वात आले.

👉पुढे ते मंडळ 1 जानेवारी 1964 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अबकारी कर व सीमाशुल्क मंडळ (CBEC) अश्या दोन भागात विभागण्यात आले.

एका ओळीत सारांश, 2 सप्टेंबर 2019

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉सीमा सुरक्षा दलाचे (BSF) नवे महानिदेशक - विवेक कुमार जोहरी.

👉01 सप्टेंबर 2019 पासून नवे भारतीय लष्कर उप-प्रमुख - लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे.

👉या ठिकाणी 30 जुलै ते 29 ऑगस्ट 2019 या काळात कुन पर्वतशिखरावर (7077 मीटर) भारतीय लष्कराची पर्वतारोहण मोहीम पार पाडली - झांस्कर, लद्दाख.

👉1 सप्टेंबर रोजी फायर अँड फ्युरी कॉर्प्सने या ठिकाणी आपला 20 वा वर्धापन दिवस साजरा केला - लेह, लद्दाख.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉स्टार्ट-अप उद्योगांच्या प्रकरणाबाबत करविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी या केंद्रीय मंडळाने एका ‘स्टार्ट-अप कक्ष’ची स्थापना केली - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT).

👉RBIने मोबाईल वॉलेट्ससाठी नो युवर कस्टमर (KYC) याच्या नियमांचे पालन करण्याची नव्याने ठरविलेली अंतिम मुदत - 29 फेब्रुवारी 2020.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या भारतीय वंशाच्या अमेरिकावासीला दक्षिण कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले - शिरीन मॅथ्यूज.

👉2 ते 13 सप्टेंबर 2019 या काळात संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन या ठिकाणी होणार - ग्रेटर नोएडा, दिल्ली, भारत.

👉या आशियाई देशात प्रथम विश्व शीख अधिवेशन आयोजित करण्यात आले - पाकिस्तान.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याच्या अंतिम यादी समावेश असलेल्या नागरिकांचा संख्या - 3,11,21,004.

👉“कोम्प्लिमेंटरी फीडिंग” या विषयासह ‘राष्ट्रीय पोषण माह 2019’ - सप्टेंबर 2019.

👉जम्मू व काश्मीर राज्यातले एकमेव असे पहिले फ्रेट टर्मिनल येथे असेल - जम्मू विभागातले सांबा रेल्वे स्थानक.

👉20-28 नोव्हेंबर 2019 या काळात पणजी, गोवा येथे होणार्‍या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) याचा विषय - एक भारत श्रेष्ठ भारत.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉रशियाच्या कझान शहरात ‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत भारतीय पथकाने जिंकलेल्या पदकांची एकूण संख्या - 5 (13 व्या स्थानी).

👉‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत जलतंत्रज्ञान प्रकारात भारतासाठी प्रथमच सुवर्णपदक जिंकणारा आणि भारताच्या सर्व स्पर्धकांमध्ये ‘बेस्ट ऑफ नेशन’चा पुरस्कार मिळविणारा व्यक्ती - अश्वथा नारायण सनागवारापू.

👉‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत पदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला - श्वेता रतनपुरा (ग्राफिक डिझाईन प्रकारात कांस्यपदक).

👉इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "बिल्ड फॉर डिजिटल इंडिया" उपक्रम राबविण्यासाठी या कंपनीबरोबर भागीदारी केली - गुगल.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत महिला गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी भारतीय नेमबाज – यशस्वीनी सिंग देसवाल.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने 31 ऑगस्ट रोजी आयुष्मान भारत-प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) योजनेचा प्रारंभ केला - पुडुचेरी.

👉राजस्थानचे नवे राज्यपाल - कलराज मिश्रा.

👉महाराष्ट्राचे नवे राजपाल - भगतसिंग कोशियारी.

👉हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल - बंडारू दत्तात्रेय.

👉केरळचे नवे राज्यपाल - आरिफ मोहम्मद खान.

👉तेलंगणाचे नवे राज्यपाल - तमिलीसाई सौंदराराजन.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतातले केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ (CBFC) – स्थापना वर्ष: सन 1951; मुख्यालय: मुंबई.

👉भारतातल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) याचे स्थापना वर्ष – सन 1964 (1 जानेवारी).

👉भारतात पहिली राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) या साली जाहीर केली गेली – सन 1951.

RISAT-2B: शत्रूवर नजर ठेवण्यासाठीभारताचा रडार इमेजिंग उपग्रह


👉भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) दि. 22 मे 2019 रोजी “री सॅट-2B” (RISAT-2B) या रडार इमेजिंग उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

👉RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर कृषी, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल.

👉इस्रोच्या PSLV C46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला.

👉ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) प्रक्षेपकाची ही 46 वी यशस्वी मोहीम आहे.

👉RISAT मालिकेतला पहिला उपग्रह दि. 20 एप्रिल 2009 रोजी अवकाशात सोडण्यात आला होता. आणि त्यानंतर 2012 साली या वर्गातला आणखी एक उपग्रह पाठवला.

👉यानंतर 2019 साली ISROची चार ते पाच पाळत उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे.

27 राज्यांमधल्या वनीकरणासाठी केंद्र सरकारने 47,436 कोटी रूपयांचा निधी दिला.


👉देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 27 राज्यांना 47,436 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला. महाराष्ट्राला 3844.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

👉वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (NDC) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वनीकरणाकरिता हा निधी वापरला जाणार आहे.

👉क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) याच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. क्षतिपूरक वनीकरणासाठी गोळा केलेल्या निधीचा राज्यांकडून वापर होत नसल्याच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली या प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले होते.

👉त्या 27 राज्यांमध्ये ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, आसाम, बिहार, सिक्कीम, मणीपूर, गोवा, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश आहे.
                  

नवी दिल्ली येथे 12 व्या 'भारत सुरक्षा परिषदचे' (India Security Summit) आयोजन

👉 नवी दिल्ली येथे 12 वीं भारत सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती.
👉 ही परिषद असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) द्वारा आयोजित केली गेली आणि केंद्रीय संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अधिकृतपणे या परिषदेला मदत केली आहे.

👉 या परिषदेचा विषय (थीम) “नवीन राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाकडे” (Towards New National Cyber Security Strategy) असा होता.

👉 या परिषदेदरम्यान, संवेदनशील राष्ट्रीय पायाभूत सुविधांचे संरक्षण, भविष्यातील सायबर धोका: घटना, आव्हाने आणि प्रतिसाद यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विविध कायद्याची अंमलबजावणी करणा-या एजन्सीजमधील वरिष्ठ अधिकारी या परिषदेस हजर होते.

👉 आपल्या भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी जाहीर केले की सायबर धमक्यांचा सामना करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने समन्वयाने आणि प्रभावी पद्धतीने देशात सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर’ (आय 4 सी) ’योजना सुरू केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत डिजिटल इंडियाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून शासनाने सायबर स्वच्छता केंद्र देखील सुरू केले आहे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...