Saturday, 31 August 2019

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक



🔺 भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली,

👉 पीटीआय | August 31, 2019

◾️नवी दिल्ली : भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरीची असूनही दुपटीहून अधिक आहे,असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की  देशात ८.७ टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के पुरुषांना नोक ऱ्या नाहीत.

महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोक ऱ्या मिळण्यास कठीण जाते. भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात २०१६-२०१७  दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. २११०४ उमेदवारांनी वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २८६९९१ अर्ज केले होते. कर्मचारी भरती व्यवस्थापक व कर्मचारी बाजारपेठ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, अजूनही नोकरी देताना भारतात लिंगभेदाचा परिणाम होत आहे. पात्रता व अनुभव, पर्याय, अर्ज प्रक्रिया यात महिलांना अडचणी आल्याचे दिसून आले. जर भारतातील नोकऱ्यांत महिलांना योग्य स्थान मिळाले तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे २७ टक्के वाढू शकते.

बहुराष्ट्रीय कंपन्यांत भेदभाव कमी
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महिलांना योग्य ते स्थान दिले असून भेदभाव कमी केला आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढवणे व त्यातून निवड करणे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे  आहे. उमेदवारांमध्ये विविधता असणे हे लहान, मध्यम व मोठय़ा उद्योगांनाही फायद्याचे आहे,असे मत शॉर्टलिस्टचे सहसंस्थापक सिमॉन देसजार्डिन यांनी व्यक्त केले. कर्मचारी भरती करताना क्षमता मापन, कामाचे अचूक वर्णन, लिंगभाव टाळणारी प्रक्रिया यांचा समावेश करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; 'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

📚राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मराठी चित्रपट

▪️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा

▪️पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट-पाणी

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

▪️सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक - सुधाकर रेड्डी (नाळ)

▪️सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

📚हिंदी चित्रपट

▪️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट-अंधाधुन

▪️सर्वोत्कृष्ट संगीत-पद्मावत

▪️सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पद्मावत)- अरिजीत सिंह

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष्मान खुराना (अंधाधुन),विकी कौशल (उरी)

▪️सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)

▪️सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

▪️सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट- केजीएफ

▪️सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

▪️पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

सर्वोत्कृष्ट ॲडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधुन

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
     स्तव
   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

6) ‘आनंद’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.

   1) हर्ष      2) आनंदीआनंद     
   3) हास्य    4) उत्साह

उत्तर :- 1

7) ‘भव्दजन’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी आहे ?

   1) सज्जन    2) दुर्जन     
   3) प्रेमीजन    4) विद्ववत्जन   

उत्तर :- 2

8) ‘स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.

   1) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी    2) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
   3) आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला  4) उथळ पाण्याला खळखळाट फार

उत्तर :- 4

9) ‘पाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

   1) शेतीला पाणी देणे    2) त्याग करणे   
   3) इतरांना मदत करणे    4) कोंडी फोडणे

उत्तर :- 2

10) ‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा.

   1) अग्रज    2) अपूर्व     
   3) अनुज    4) अष्टावधानी

उत्तर :- 3