३० ऑगस्ट २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न 30/8/2019

1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
     स्तव
   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

6) ‘आनंद’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.

   1) हर्ष      2) आनंदीआनंद     
   3) हास्य    4) उत्साह

उत्तर :- 1

7) ‘भव्दजन’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी आहे ?

   1) सज्जन    2) दुर्जन     
   3) प्रेमीजन    4) विद्ववत्जन   

उत्तर :- 2

8) ‘स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.

   1) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी    2) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
   3) आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला  4) उथळ पाण्याला खळखळाट फार

उत्तर :- 4

9) ‘पाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

   1) शेतीला पाणी देणे    2) त्याग करणे   
   3) इतरांना मदत करणे    4) कोंडी फोडणे

उत्तर :- 2

10) ‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा.

   1) अग्रज    2) अपूर्व     
   3) अनुज    4) अष्टावधानी

उत्तर :- 3 

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

जन्म : १२ जुलै १८६३ (रायगड)
निधन : ३१ डिसें. १९२६ (धुळे)

● विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या विचाराने प्रभावित.

● १८९५ रोजी "भाषांतर" नावाचे मासिक सुरू केले.

● मराठ्यांच्या इतिहासाची साधने २२ खंडात प्रकाशीत केले.

● १९१० रोजी 'भारत इतिहास संशोधक मंडळ' पुणे येथे स्थापन केले.

● १९११ रोजी शिवाजी जयंतीनिमित्त टिळकांच्या केसरी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला...लेखाद्वारे भारतीय चातुर्वण व्यवस्थेचा पुरस्कार केला.

● या लेखानुसार, भारतीय समाजाची अवनती होण्यामागे मुख्य कारण म्हणजे भारतीयांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पालन करणे सोडून दिले.

● १९२६ रोजी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हा ग्रंथ त्यांनी लिहीला.

● त्यांच्या मृत्यूनंतर ९ जुन १९२७ रोजी त्यांच्या अनुयायांनी धुळे येथे 'राजवाडे संशोधक मंडळाची स्थापना केली'.

एका ओळीत सारांश, 30 ऑगस्ट 2019

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉राष्ट्रीय क्रिडा दिन – 29 ऑगस्ट.

👉तेलुगू भाषा दिन – 29 ऑगस्ट.

👉आंतरराष्ट्रीय अणुचाचणी प्रतिबंधक दिन – 29 ऑगस्ट.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉29 ऑगस्ट 2019 रोजी या बँकेनी चेन्नईत त्याचे पहिले MSME सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) सुरू केले - इंडियन बँक.

👉28 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोळसा खाण क्षेत्र, कंत्राटी निर्मिती उद्योगांमध्ये एवढ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूकीला (FDI) मंजूरी दिली गेली - 100 टक्के.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉पर्यावरण मंत्रालयाने 27 राज्यांना वनीकरणासाठी हस्तांतरित केलेला निधी - 47,436 कोटी रुपये.

👉भारताची हवाईसेवा कंपनी, जी 2 ऑक्टोबर 2019 पासून त्याच्या विमानात एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणार आहे - एयर इंडिया.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा 2019 याचे ठिकाण - कझान, रशिया.

👉आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा 2019 यामध्ये भारताच्या चमूने जिंकलेल्या पदकांची संख्या - 1 सुवर्ण, 1 रजत,2 कांस्य आणि 15 उत्कृष्ट (स्पर्धेत 13 वे स्थान).

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सेफ सिटीज इंडेक्समध्ये प्रथम स्थान - टोकियो, जापान (त्यानंतर सिंगापूर आणि ओसाका).

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सेफ सिटीज इंडेक्समध्ये शेवटचे स्थान - काराकस, व्हेनेझुएला.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सेफ सिटीज इंडेक्समध्ये मुंबईचे स्थान - 45 वा (आणि दिल्ली 52 वा).

👉29 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले अभियान - 'फिट इंडिया'.

👉या ठिकाणी इंटरनॅशनल कोलिशन फॉर डिझास्टर रेजिलींट इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI) याचे सचिवालय कार्यालय स्थापन केले जाणार - नवी दिल्ली.

👉23 सप्टेंबर 2019 रोजी होणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघ हवामान कृती शिखर परिषदेचे ठिकाण - न्यूयॉर्क, अमेरिका.

👉भारतातली पहिली बॅटरीवर धावणारी सिटी बस सेवा – गांधीनगर, गुजरात.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉सिनीयर ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत 10 मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी भारतीय नेमबाज - इलावेनिल वालारीवन.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉1930 साली या खगोलशास्त्रज्ञाने प्लूटो (बटु ग्रह) शोधला - क्लाईड टॉमबॉघ (अमेरिका).

👉एयर इंडिया या हवाईसेवा कंपनीची स्थापना - 15ऑक्टोबर 1932.

👉परदेशातल्या एका संस्थेद्वारे देशातल्या व्यवसायामध्ये मालकी हक्क घेण्यासाठी होणारी गुंतवणूक - थेट परकीय गुंतवणूक (FDI).

👉या साली भारतात परकीय गुंतवणूकीला सुरूवात झाली – सन 1991.

👉आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) – स्थापना वर्ष: सन 1907; मुख्यालय: म्युनिच, जर्मनी.

🌹🌳🌴27 राज्यांमधल्या वनीकरणासाठी केंद्र सरकारने 47,436 कोटी रूपयांचा निधी दिला🌴🌳🌹

👉देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 27 राज्यांना 47,436 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला.

👉महाराष्ट्राला 3844.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

👉वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (NDC) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वनीकरणाकरिता हा निधी वापरला जाणार आहे.

👉क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) याच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.

👉 क्षतिपूरक वनीकरणासाठी गोळा केलेल्या निधीचा राज्यांकडून वापर होत नसल्याच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली या प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले होते.

👉त्या 27 राज्यांमध्ये ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, आसाम, बिहार, सिक्कीम, मणीपूर, गोवा, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश आहे.

POLICE bharti चे नियोजन



शेवटी प्रतीक्षा संपली भरती आली आता अभ्यास कसा करायचा ......🤔

👉पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या पुस्तकाचा वापर आजपर्यंत पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी केला आहे तेच बुक्स वापरायचे बुक्स बद्लवायचे नाही . कारण बुक्स जर बद्लविले गोंधळ वाढेल आणि काहीही अभ्यास होणार नाही हे लक्षात घ्या .

👉जाहिरात अली कि नवीन नवीन बुक्स निघतात आपण सर्व घेऊन बसतो आणि अभ्यास एकही बुक्स चा होत नाही . जर तुम्हला खुपचं आवश्यकता भासल्यास एकाधि बुक्स घेऊन शकता.

👉दुसरी गोष्ट 5 किंवा 6 मुलांचा ग्रुप बनवा . आपल्या अभ्यासाबद्दल अडचणीचे निवारण करण्यासाठी आता तुमच्याकडे वेळ नाही 🕛 म्हणून तुम्हला जे काही duscussion करायचं आहे ते तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळेत करा यात तुमचं J1 आणि अभ्यास दोन्ही होईल.

कोणाचा एकाधि विषय चांगला असतो जर तो आपल्याला जमत नसेल तर तो त्याच्याकडुन समजवून घ्या

👉पेपरचा सराव करा , तुमचा पेपर ONLINE होणार आहे त्यामुळे तुम्ही ओनलाईन टेस्ट देण्याचा प्रयत्न करा , मी असं नाही म्हणत कि माझीच टेस्ट द्या माझ्यापेक्षा कोणी चांगली टेस्ट देत असेल तर त्याची टेस्ट द्या पण ONLINE सराव करण्याचा प्रयत्न करा कारण ओनलाईन आणि ऑफलाईन मध्ये भरपूर फरक असतो , हे आपल्याला पेपरला गेल्यावर समजते .

👉ज्यांचा कोणाचाही पेपर तुम्ही देता तो 5 ते 6 मुलांच्या ग्रुप नी एकाच वेळी द्या आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी त्याला Discuss करा एक - एक मिनिटांचा वापर करा

👉आज जर पोलीस बनलो तर बनलो नाही तर 2019 नंतर जागा निघेल याची काहीही शक्यता नाही. आज करू, उद्या करू, अस करण्यापेक्षा आताच करा . वेळ गेल्यावर पस्तवण्याशिवाय काहीच नाही करू शकत.

बिहार सरकारने राज्य सचिवालयात जीन्स, टी-शर्टवर बंदी घातली :


बिहार सचिवालयात कर्मचार्‍यांनी टी-शर्ट व जीन्स घालण्यास बंदी घातली आहे. सरकारने कर्मचार्‍यांना कार्यालयात सभ्य, सरळ, शांत आणि सोयीस्कर कपडे घालण्याचे आदेश दिले आहेत. बिहार सरकारच्या आदेशानुसार, "अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सभ्य, आरामदायक, सोपी, शांत आणि हलके रंगाचे पोशाख घालणे आवश्यक आहे." हवामान आणि कामाच्या प्रकारानुसार कर्मचार्‍यांनी आपला ड्रेस निवडणे आवश्यक असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. शासकीय आदेशानुसार अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन संस्कृतीचे विपरीत कपडे घालून कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली. ऑर्डरमध्ये पुढे असे वाचले आहे की जीन्स आणि टी-शर्ट घालणे हे ऑफिसच्या संस्कृतीच्या विरूद्ध आहे. टी-शर्ट आणि जीन्सवरील बंदी सचिवालयातील सर्व कर्मचार्‍यांसाठी असूनही त्यांच्याकडे कोणताही दर्जा असो. कर्मचार्‍यांना कार्यालयात आरामदायक व हलके रंगाचे कपडे घालण्यास सांगितले आहे. या आदेशानंतर राज्य सचिवालयातील सर्व कर्मचार्‍यांना राज्य सरकारने विहित केलेले कपडे घालावे लागतील

महाराष्ट्र उच्चपदे:-


राज्यपाल:- सी. विद्यासागर राव
विधानसभा अध्यक्ष:- हरिभाऊ बागडे
विधानसभा उपाध्यक्ष:- विजय औटी
विधान परिषद सभापती:- रामराजे नाईक निंबाळकर
विधान परिषद उपसभापती:- माणिकराव ठाकरे
विधान परिषद विरोधी पक्षनेते:- धनंजय मुंडे
निवडणूक आयुक्त :- ए. एस. सहारीया
राज्य मुख्य सचिव :- अजोय मेहता
MPSC अध्यक्ष :- चंद्रशेखर ओक (हंगामी)
महिला आयोग अध्यक्ष:- विजया रहाटकर
उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश:- न्या. प्रदीप नंदराजोग
महाधिवक्ता:- आशितोष कुंभकोणी
विधानसभा सभागृह नेते:- देवेंद्र फडणवीस
विधान परिषद सभाग्रह नेते:- चंद्रकांत पाटील
लोकायुक्त:- एम. एल. टहलियानी
राज्य मुख्य सेवा आयुक्त:- स्वाधीन क्षत्रीय
बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष:- प्रविण घुगे
पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष:- व्ही. गिरीराज
भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष:- डॉ. सदानंद मोरे
महाराष्ट्र पोलीस महासंचालक:- सुबोध जयस्वाल
मुख्य माहिती आयुक्त :- सुमीत मलिक
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष:- पाषा पटेल
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष:- न्या. आर. जी. गायकवाड

भारतातील उच्चपदस्थ:-

लोकसभा अध्यक्ष:- ओम बिर्ला
लोकसभेचे हंगामी अध्यक्ष:- वीरेंद्र कुमार
सरन्यायाधीश:- रंजन गोगोई (४६ वे)
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार:- श्री अजित दोवाल
पंतप्रधानांचे प्रधान सचिव:- श्री नृपेंद्र मिश्रा
पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव:-डॉ.पी.के.मिश्र
महान्यायवादी :- के. के. वेणुगोपाल
महालेखापाल:- राजीव महर्षी
मुख्य निवडणूक आयुक्त :-सुनील अरोरा ( २३ वे)
निवडणूक आयुक्त :- अशोक लवासा, सुशिल चंद्रा
पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार:- कृष्णमुर्ती सुब्रमण्यम
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष :- अरविंद सक्सेना
केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष :-शरद कुमार (हंगामी)
मुख्य माहिती आयुक्त :- सुधीर भार्गव
रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष:- शक्तीकांत दास( २५ वे)
नीती आयोगाचे उपाध्यक्ष:- डॉ. राजीव महर्षी
सेबी अध्यक्ष :- अजय त्यागी
भारतीय विमा नियामक अध्यक्ष:-सुभाषचंद्र खुंटीया
१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष:- एन. के सिंग
केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष :_ नरेंद्र कुमार
राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष:- न्या. बी. एन. कीरपाल
सातव्या आयोगाचे अध्यक्ष:- अशोक के. माथुर
आयबी अध्यक्ष:- राजीव जैन
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष:- भगवान लाल सहाय
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष:- रामशंकर कथरिया
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष:- नंद कुमार साई
राष्ट्रीय महिला आयोग:- रेखा शर्मा
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष:- सईद हायरुल हसन रिझवी
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष:- न्या. एच. एल. दत्तू
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष:- वालजीभाई वाला
राष्ट्रीय बालअधिकार व सरक्षण आयोग:- प्रियांक कानुंगो
कायदा आयोगाचे अध्यक्ष ( २१ व्या ) :- न्या. बलवीर सिंह चौहान
राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष:- रेखा शर्मा
बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष:- भानू प्रताप शर्मा
सीबीआय अध्यक्ष:- ऋषीकुमार शुक्ला
भूदल प्रमुख:- बिपीन रावत
नौदल प्रमुख: करमवीर सिंह
हवाईदल प्रमुख:- बी. एम. धनोआ
इस्रो अध्यक्ष:- के. सिवन
डीआरडीओ प्रमुख: जी. सतीश रेड्डी
भारतीय अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष:- के. एन. व्यास
टेलीकाॅम रेग्युलेटरी अॅथरिटीचे (ट्राय) अध्यक्ष:- राम सेवक शर्मा
कृष्णा जलवादाचे प्रमुख:- न्या. ब्रिजेश कुमार
भारताचे पहिले लोकपाल:- पिनाकी घोष
युजीसी चे अध्यक्ष:- डि. पी सिंग
भारतीय लोकसभेचे महासचिव:- स्नेहलता श्रीवास्तव
भारतीय राज्यसभेचे महासचिव :- देशदीपक वर्मा
NCC (राष्ट्रीय विद्यार्थी सेना) महासंचालक:- लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा
भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक:- डॉ. ए. के. मोहंती
BCCI चे पहिले लोकपाल:- न्या. डी. के. जैन
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष:- प्रमोचंद्र मोदी
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष:- व्ही. के यादव
परराष्ट्र सचिव :- विजय गोखले.

अमेरिकेत पुन्हा मंदीची भीती

✍अमेरिकेत पुढील दोन वर्षांत म्हणजे २०२० आणि २०२१मध्ये मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे मत एका पाहणीत दिसून आले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे चित्र संमिश्र झाले असल्याचे इतरही काही अमेरिकी अहवालांमध्ये म्हटले आहे.

✍‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझीनेस इकॉनॉमिस्ट’ या संस्थेने ही पाहणी केली असून तिचा अहवाल सोमवारी जाहीर झाला. या पाहणीत म्हटले आहे की, २०१८ मध्ये व्याजदरात केलेली वाढ कमी करून फेडरल रिझव्‍‌र्ह या मध्यवर्ती बँकेने ठोस संदेश दिला आहे. सध्यातरी या बँकेच्या काही उपाययोजनांमुळे मंदीसदृश स्थिती रोखली गेली आहे.

✍या वर्षीच मंदी सुरू होण्याची शक्यता २ टक्के अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. एनएबीईचे अध्यक्ष कॉन्सटन्स हंटर यांनी सांगितले की, पुढील वर्षीच मंदी सुरू होईल असे ३८ टक्के अर्थतज्ज्ञांना वाटते, तर ती २०२१ मध्ये सुरू होईल, अशी ३४ टक्के तज्ज्ञांची अटकळ आहे.

✍४६ टक्के अर्थतज्ज्ञांना फेडरल रिझर्वकडून आणखी एक दरकपात अपेक्षित आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात नाममात्र का होईना, पण समझोता होईल आणि कोंडी फुटेल, अशी आशा ६४ टक्के अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या संस्था

● G7 (Group of 7)

- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा

● BRICS

- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका

● Asian Development Bank (ADB)

- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स
- जाॅईन करा टेलीग्राम चॅनल VJSeStudy

● SAARC (South Asian Association for Regional Cooperation)

- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव

● ASEAN (Association of South East Asian Nation)

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर

● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation)

- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान

● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries)

- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13

● IBSA

- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. जाणून घेऊयात याच सहा खास सन्मानांबद्दल...

🏵‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला.

🏵पॅलेस्टाईन 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵सौदी अरेबिया 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

🏵अफगाणिस्तान 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.

🏵मालदीव ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यघटनेतील महत्वाची कलमे


आता व्हॉट्सअॅपवरून करता येणार उबरची तक्रार

✍अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनी उबेरने देशात 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली.

✍तर या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासी कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान, गाडी खराब झाल्यास, ड्रायव्हरसोबत वाद झाल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी फोन करू शकतील.

✍तसेच यापूर्वी कंपनीच्या हेल्पलाइन सुविधेत केवळ मेसेज करण्याची मुभा होती. परंतु आता प्रवासी व्हॉट्सअॅपद्वारे  फोन करून मदत घेऊ शकणार आहेत.

✍उबेरच्या अॅपमध्ये असलेली ही सुविधा थेट प्रवाशांना कंपनीच्या सुरक्षा टीमसोबत बोलण्याची मुभा देणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षा मानकांनुसार पूर्वीपासूनच अॅपमध्ये एसओएस बटन देण्यात आले

✍असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. याच्या सहाय्याने आपात्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिसांशी जोडले जाऊ शकतो.

✍दरम्यान, मार्च महिन्यापासून या हेल्पलाइन फिचरचा वापर चंडीगढमध्ये सुरू करण्यात आला होता. आता कंपनीने आपले परिचालन असलेल्या सर्व 40 शहरांमध्ये हे फिचर उपलब्ध करून दिले आहे.

✍अमेरिका आणि कॅनडामध्ये कंपनी ही सुविधा पूर्वीपासूनच देत आहे. भारतात सुरूवातीला ही सुविधा इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असेल. परंतु उबर लाइटवर ही सेवा उपलब्ध नसेल. उबरच्या सर्व ग्राहकांना या सुविधेचा वापर करता येणार आहे.

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा, दीपा मलिक, बजरंग पुनिया आणि इतर बरीच नावे आहेत. 

▪️दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात क्रीडा आणि खेळाच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. 

▪️हा दिवस राष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्त्व ध्यानचंद यांची आठवण करून देतो जे आतापर्यंतच्या महान हॉकीपटूंपैकी एक होते. 

▪️"विझार्ड" म्हणून प्रसिद्ध असलेले ध्यानचंद यांचे बॉलवर उत्कृष्ट नियंत्रण आणि गोल-स्कोअरिंग क्षमता होती. 

▪️ 1928, 1932 आणि 1936 मध्ये त्यांनी हॉकी क्षेत्रात भारतासाठी तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली. 

▪️22 वर्षांच्या क्रीडा कारकीर्दीत त्यांनी 400 पेक्षा जास्त गोल केले. 

▪️1956 मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. 

▪️ त्यांचा जन्म अलाहाबादमध्ये 29 ऑगस्ट, 1905 रोजी झाला होता.

▪️29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून कधी जाहीर करण्यात आले ?

▪️ मेजर ध्यानचंद आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने 2012 मध्ये 29 ऑगस्ट हा देशाचा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केला.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉनला मागे टाकत 'ही' कंपनी व्यायवसायात बनली नंबर वन


▪️हॉटस्टारने भारतात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला मागे टाकत भारतातील ओव्हर द टॉप (ओटीटी) व्यवसायात नंबर वन क्रमांक पटकावला आहे.

▪️नेटफ्लिक्स इंटरनेट मनोरंजन सेवेत जगात जरी नंबर वन असले तरी भारतात मात्र वॉल्ट डिस्ने कंपनीच्या हॉटस्टारचीच चलती आहे. देशात हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्यात जबरदस्त चुरस आहे.

▪️मात्र अलीकडेच मोमॅजिक या अॅपचे वितरण करणाऱ्या कंपनीकडून केलेल्या एका सर्व्हेमधून हॉटस्टारच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

▪️या पाहणीमध्ये 41 टक्के नागरिकांनी हॉटस्टारला पसंती दाखवली तर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला 26 टक्के आणि नेटफ्लिक्सला 9 टक्केच नागरिकांनी पसंती दाखवली आहे.

▪️हॉटस्टारचे तब्बल 30 कोटी ग्राहक आहेत. तर अॅमेझॉनचे 1.3 कोटी आणि नेटफ्लिक्सचे 1.1 कोटी ग्राहक आहेत. त्याचबरोबर या तीनही मुख्य ब्रॅंडचे स्पर्धक असलेले वूट, झी5, अॅरे आणि लोनीलाईव्ह यांचीही लोकप्रियता वेगाने वाढते आहे.

✅या पाहणी अहवालानुसार 55 टक्के नागरिकांना या ओटीटी सेवेतून व्हिडिओ पाहायला आवडते.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...