Thursday, 29 August 2019

अमेरिकेत पुन्हा मंदीची भीती

✍अमेरिकेत पुढील दोन वर्षांत म्हणजे २०२० आणि २०२१मध्ये मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे मत एका पाहणीत दिसून आले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे चित्र संमिश्र झाले असल्याचे इतरही काही अमेरिकी अहवालांमध्ये म्हटले आहे.

✍‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझीनेस इकॉनॉमिस्ट’ या संस्थेने ही पाहणी केली असून तिचा अहवाल सोमवारी जाहीर झाला. या पाहणीत म्हटले आहे की, २०१८ मध्ये व्याजदरात केलेली वाढ कमी करून फेडरल रिझव्‍‌र्ह या मध्यवर्ती बँकेने ठोस संदेश दिला आहे. सध्यातरी या बँकेच्या काही उपाययोजनांमुळे मंदीसदृश स्थिती रोखली गेली आहे.

✍या वर्षीच मंदी सुरू होण्याची शक्यता २ टक्के अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. एनएबीईचे अध्यक्ष कॉन्सटन्स हंटर यांनी सांगितले की, पुढील वर्षीच मंदी सुरू होईल असे ३८ टक्के अर्थतज्ज्ञांना वाटते, तर ती २०२१ मध्ये सुरू होईल, अशी ३४ टक्के तज्ज्ञांची अटकळ आहे.

✍४६ टक्के अर्थतज्ज्ञांना फेडरल रिझर्वकडून आणखी एक दरकपात अपेक्षित आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात नाममात्र का होईना, पण समझोता होईल आणि कोंडी फुटेल, अशी आशा ६४ टक्के अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या संस्था

● G7 (Group of 7)

- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा

● BRICS

- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका

● Asian Development Bank (ADB)

- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स
- जाॅईन करा टेलीग्राम चॅनल VJSeStudy

● SAARC (South Asian Association for Regional Cooperation)

- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव

● ASEAN (Association of South East Asian Nation)

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर

● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation)

- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान

● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries)

- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13

● IBSA

- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. जाणून घेऊयात याच सहा खास सन्मानांबद्दल...

🏵‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला.

🏵पॅलेस्टाईन 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵सौदी अरेबिया 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

🏵अफगाणिस्तान 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.

🏵मालदीव ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यघटनेतील महत्वाची कलमे


आता व्हॉट्सअॅपवरून करता येणार उबरची तक्रार

✍अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनी उबेरने देशात 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली.

✍तर या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासी कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान, गाडी खराब झाल्यास, ड्रायव्हरसोबत वाद झाल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी फोन करू शकतील.

✍तसेच यापूर्वी कंपनीच्या हेल्पलाइन सुविधेत केवळ मेसेज करण्याची मुभा होती. परंतु आता प्रवासी व्हॉट्सअॅपद्वारे  फोन करून मदत घेऊ शकणार आहेत.

✍उबेरच्या अॅपमध्ये असलेली ही सुविधा थेट प्रवाशांना कंपनीच्या सुरक्षा टीमसोबत बोलण्याची मुभा देणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षा मानकांनुसार पूर्वीपासूनच अॅपमध्ये एसओएस बटन देण्यात आले

✍असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. याच्या सहाय्याने आपात्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिसांशी जोडले जाऊ शकतो.

✍दरम्यान, मार्च महिन्यापासून या हेल्पलाइन फिचरचा वापर चंडीगढमध्ये सुरू करण्यात आला होता. आता कंपनीने आपले परिचालन असलेल्या सर्व 40 शहरांमध्ये हे फिचर उपलब्ध करून दिले आहे.

✍अमेरिका आणि कॅनडामध्ये कंपनी ही सुविधा पूर्वीपासूनच देत आहे. भारतात सुरूवातीला ही सुविधा इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असेल. परंतु उबर लाइटवर ही सेवा उपलब्ध नसेल. उबरच्या सर्व ग्राहकांना या सुविधेचा वापर करता येणार आहे.

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा, दीपा मलिक, बजरंग पुनिया आणि इतर बरीच नावे आहेत. 

▪️दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात क्रीडा आणि खेळाच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. 

▪️हा दिवस राष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्त्व ध्यानचंद यांची आठवण करून देतो जे आतापर्यंतच्या महान हॉकीपटूंपैकी एक होते. 

▪️"विझार्ड" म्हणून प्रसिद्ध असलेले ध्यानचंद यांचे बॉलवर उत्कृष्ट नियंत्रण आणि गोल-स्कोअरिंग क्षमता होती. 

▪️ 1928, 1932 आणि 1936 मध्ये त्यांनी हॉकी क्षेत्रात भारतासाठी तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली. 

▪️22 वर्षांच्या क्रीडा कारकीर्दीत त्यांनी 400 पेक्षा जास्त गोल केले. 

▪️1956 मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. 

▪️ त्यांचा जन्म अलाहाबादमध्ये 29 ऑगस्ट, 1905 रोजी झाला होता.

▪️29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून कधी जाहीर करण्यात आले ?

▪️ मेजर ध्यानचंद आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने 2012 मध्ये 29 ऑगस्ट हा देशाचा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केला.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉनला मागे टाकत 'ही' कंपनी व्यायवसायात बनली नंबर वन


▪️हॉटस्टारने भारतात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला मागे टाकत भारतातील ओव्हर द टॉप (ओटीटी) व्यवसायात नंबर वन क्रमांक पटकावला आहे.

▪️नेटफ्लिक्स इंटरनेट मनोरंजन सेवेत जगात जरी नंबर वन असले तरी भारतात मात्र वॉल्ट डिस्ने कंपनीच्या हॉटस्टारचीच चलती आहे. देशात हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्यात जबरदस्त चुरस आहे.

▪️मात्र अलीकडेच मोमॅजिक या अॅपचे वितरण करणाऱ्या कंपनीकडून केलेल्या एका सर्व्हेमधून हॉटस्टारच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

▪️या पाहणीमध्ये 41 टक्के नागरिकांनी हॉटस्टारला पसंती दाखवली तर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला 26 टक्के आणि नेटफ्लिक्सला 9 टक्केच नागरिकांनी पसंती दाखवली आहे.

▪️हॉटस्टारचे तब्बल 30 कोटी ग्राहक आहेत. तर अॅमेझॉनचे 1.3 कोटी आणि नेटफ्लिक्सचे 1.1 कोटी ग्राहक आहेत. त्याचबरोबर या तीनही मुख्य ब्रॅंडचे स्पर्धक असलेले वूट, झी5, अॅरे आणि लोनीलाईव्ह यांचीही लोकप्रियता वेगाने वाढते आहे.

✅या पाहणी अहवालानुसार 55 टक्के नागरिकांना या ओटीटी सेवेतून व्हिडिओ पाहायला आवडते.

येणार आमदारांसाठीही आचारसंहिता

📍 लवकरच सर्व आमदारांसाठी आचारसंहिता तयार केली जाईल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली घोषणा.

🗣 ओम बिर्ला म्हणाले :

● ही आचारसंहिता तयार करण्यासाठी सर्व विधानसभा सभापतींची समिती स्थापन केली जाईल.
● ही समिती सर्व विधानसभांच्या आणि विधान परिषदांच्या सभापतींशी चर्चा करेल.
● हि समिती नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

🤝 बैठकीत एकमुखाने पाठिंबा :

● यासंदर्भात विधानसभा आणि विधान परिषदांचे सभापती मिळून 30 हून अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक झाली.
● यावेळी विधानसभांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करण्यावर सर्व सभापतींचे मतैक्य झाले.
● सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे आणि कमीत कमी वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ यावी, यासाठी आमदारांसाठी आचारसंहिता तयार करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला.

💫 यामुळे विधानसभेतील कामकाज सुरळीत चालेल आणि सातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी होतील.

पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी


📌 भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.

📌 पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कराचीजवळ सोनमियानी प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

📌 काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थन न मिळाल्याने पाकिस्तानने यापूर्वीच बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची धमकी दिली होती. 

📌कराची हवाईमार्ग बंद करून दिले होते संकेत पाकिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने बुधवारी कराची विमानतळावरील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे ३ मार्ग बंद केले होते.

📌पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने 'नोटीस टू एअरमेन' (NOTAM) जारी करत बंदरांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.

📌 यानंतरच पाकिस्तान क्षेपणास्त्राची चाचणी करू शकतो अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. 

📌भारतीय विमानांसाठी पाकने बंद केले हवाई क्षेत्र भारतीय विमान वाहतुकीसाठी पाकिस्तानातील हवाई क्षेत्राच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यावर पाकिस्तान विचार करत असल्याचे पाक सरकारने जाहीर केले होते.

📌 वैमानिकांसाठीही दिले होते निर्देश भारतीय विमानांना हवाईबंदी घालताना पाकिस्तानने कराची ओलांडण्यासाठी वैमानिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी पाकिस्तानने केली होती.

📌 चार दिवसांच्या ही बंदी १ सप्टेंबरपर्यंत असेल असे प्राधिकरणाने 'नोटीस टू एअरमेन'मध्ये म्हटले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

छत्तीसगडमधील आरक्षण पोहोचले ८२% वर


▪️ छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️ या बरोबरच राज्यातील आरक्षण ८२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

📚छत्तीसगड राज्यात

    ▪️अनुसूचित जमातीला ३२ टक्के,             
    ▪️अनुसूचित जातींसाठी १३ टक्के      
    ▪️इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

▪️केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास समाजांना आरक्षण देणारे विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर छत्तीगडमध्ये या वर्गाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती.

📚देशातील सर्वाधिक आरक्षण

▪️छत्तीसगड राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर छत्तीसगड हे राज्य देशात सर्वात जास्त आरक्षण देणारे राज्य ठरले आहे.

▪️ या राज्यातील एकूण आरक्षण ८२ टक्क्यांवर पोहोचले असून सुप्रीम कोर्टाच्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा ते २२ टक्क्यांनी अधिक आहे.

📚सुधारणा करणार

▪️आरक्षणासंदर्भात लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी एका आयोगाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

▪️ मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसेवा अधिनियम, १९९४ मध्ये सुधारणा करण्यासाठी छत्तीसगड लोकसेवा अधिनियम सुधारणा अध्यादेश, २०१९ च्या प्रस्तावाला समर्थन देण्यात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

🥇विजेतेपद - पी.व्ही.सिंधू🏆
🥈उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान)

★स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड

●21-7 , 21-7 अश्या 2 सरळ सेटमध्ये विजय

●1977 साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात

●जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू - पी.व्ही.सिंधू ठरली आहे.

●यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश
1. 2013 - 🥉कांस्यपदक
2. 2014 - 🥉कांस्यपदक
3. 2017 - 🥈रौप्यपदक
4. 2018 - 🥈रौप्यपदक
5. 2019 - 🥇सुवर्णपदक

🏆भारतास जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आजपर्यंत - 10 पदके
(त्यातील 5 पदके एकट्या पी.व्ही.सिंधुची)

🎖वयाच्या 24 वर्षी पी.व्ही.सिंधू बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपदाची मानकरी ठरली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...