Tuesday, 20 August 2019

17 वी लोकसभा निवडणूक 2019

- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली.
- 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला.

● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा

- तृणमूल काँग्रेस 22
- बहुजन समाज पक्ष 10
- भारतीय जनता पक्ष 303
- बिजू जनता दल 12
- द्रविड मुन्नेत्र कळघम 23
- काँग्रेस पक्ष 52
- जनता दल (U) 16
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 05
- शिवसेना 18
- युवाजन श्रमिक रयथु काँग्रेस पक्ष 22

● महाराष्ट्र

- महाराष्ट्रात 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान झाले.
[पक्षाचे नाव- जिंकलेल्या जागा- मतांची टक्केवारी]
- भारतीय जनता पक्ष 23 (27.59%)
- काँग्रेस पक्ष 1 (16.27%)
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4 (15.52%)
- शिवसेना 18 (23.29%)
- AIMIM 1 (0.72%)
- Independent 1

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत संस्थेची स्थापना

◼️खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (AMRUT- Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

◼️राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून त्यात या समाज समुहातील तरुणांच्या विकासासाठी विशेष कार्य केले जाणार आहे.

◼️मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विविध घटकांच्या विकासासाठी यापूर्वी सारथी आणि महाज्योती संस्थेची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक होते. या समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्राप्त होत आहे. मात्र, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षणही मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांच्या धर्तीवर अमृत संस्था स्थापन करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे.

◼️अनुसूचित जातीतील तरुणांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सारथी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

◼️त्याप्रमाणेच बहुजन, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे.

◼️आता खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था काम करणार आहे. संस्थेची स्थापना व कार्यान्वयानासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार या विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत.

◼️या संस्थेच्या माध्यमातून अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था प्राधान्याने काम करणार आहे. तसेच कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा आणि एमफील-पीएचडी अभ्यासक्रमांसाठीही प्रशिक्षण देण्याचा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांचे सक्षमीकरण करण्यासह संबंधितांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मगरीविषयी बरेच काही ‼️



▪️नुकत्याच आलेल्या पुरात पाण्यातील अनेक मगरी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. मगर या प्राण्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. पण हा प्राणी नक्कीच काही जाणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. मगरीचा कराल जबडा पाहतापाहता मोठे प्राणी किती शिताफीने गिळतो हे आपण कदाचित पहिले असेल.

💁‍♂ मगरीला २४ दात असतात पण तरीही ती भक्ष्य गिळणे अधिक पसंत करते.

▪️मगर हा कुठल्याची पाण्यात किंवा जमिनीवर राहू शकणारा प्राणी आहे आणि विशेष म्हणजे ही प्रजाती पृथ्वीवर डायनासोर होते तेव्हापासून म्हणजे २४० दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात असावी असे संशोधकांचे म्हणणे आहे.

💁‍♂मगरीचे नक्राश्रू अशी मराठीत एक म्हण आहे. याचा अर्थ खोटे रडणे असा आहे.

▪️मगर भक्ष्य गिळते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येतात त्यावरून ही म्हण आली असावी. पण त्यामागचे कारण असे की भक्ष्य गिळताना ती खूप मोठ्या प्रमाणावर हवा गिळते. या हवेच्या दाबामुळे अश्रू निर्माण करणारे लचरीमल ग्रंथी कार्यान्वित होतात आणि मगरीच्या डोळ्यात अश्रू येतात.


▪️जगभरात मगरीच्या अनेक प्रजाती आहेत. सर्वात लहान मगर ५ फुट लांब आणि ३२ किलो वजनाची आहे तर सर्वात मोठी ७ फुट लांब आणि १२०० किलो वजनाची आहे.

▪️अन्न भक्षण केल्यावर ते पचविण्यासाठी मगर छोटे दगड खाते. ती फळे, भाज्या खात नाही. लांब शेपटीमुळे ती पाण्यात ताशी २५ किमी वेगाने पोहू शकते.

▪️ स्तनधारी आणि सरपटणारे अश्या दोन्ही प्राण्याचे गुण मगरीत आढळतात. जमिनीवर असताना तिचे हृदय सस्तन प्राण्यासारखे काम करते तर पाण्यात असताना सरपटणारया प्राण्याप्रमाणे काम करते.

✅ मगरीची ९९ टक्के पिल्ले पहिल्या वर्षातच मोठे मासे फस्त करतात.

▪️मगर एकावेळी १० ते ६० अंडी घालते. ही अंडी घरट्यात किंवा बिळात घातली जातात आणि तेथले तापमान किती असेल त्यावर पिलाचे लिंग ठरते.

▪️आज जगभर मगरी संकटात आहेत कारण त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते आहे. मगरीच्या कातड्यापासून बनविलेल्या वस्तू श्रीमंत लोकांसाठी स्टेट्स सिम्बॉल बनल्या असल्याने मगरी मोठ्या प्रमाणावर मारल्या जात आहेत.



आता भारतीय पोस्ट सुरू करणार ‘ही’ नवी सेवा

✍देशात ऑनलाइन खरेदीला मिळणारी पसंती पाहता आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यान, पोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.

✍भारतीय पोस्ट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसी, फ्रिज, टिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते.

✍सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती पोस्टातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच हे सामान पोस्टमॅनच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

✍दरम्यान, सरकारने सुरू केलेली ही सेवा असल्याने यामध्ये फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता नाकारण्यात येत आहे. तसेच सामान ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही पोस्टाचीच असणार आहे. वस्तू विकत घेताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे पैसे भरता येणार आहेत.

वन नेशन-वन रेशनकार्ड’ योजनेस प्रारंभ


✍नरेंद्र मोदी सरकार देशात आता ‘वन नेशन-वन रेशनकार्ड’ योजना लागू करणार आहे. या योजनेमुळे कुठलाही शिधापत्रकारक देशातील कुठल्याही सार्वजनिक वितरण व्यवस्था केंद्रातून धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेची 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. 1 जुलै 2020 पर्यंत देशभरात एक शिधापत्र लागू व्हावे, असे सरकारचे लक्ष्य आहे.

✍अन्य राज्यांमध्ये रोजगारासाठी गेलेल्या लोकांना या योजनेचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. संबंधित योजना लागू करण्यासाठी ग्राहक विषयक केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी खाद्यसचिव तसेच राज्यांच्या प्रतिनिधींसोबत गुरुवारी बैठक घेतली आहे.

✍30 जून 2020 पर्यंत वन नेशन-वन रेशनकार्ड देशभरात लागू होणार आहे. 85 टक्के आधारकार्ड पॉइंट ऑफ सेल (पीओएस) यंत्राशी संलग्न झाले ओत. 22 राज्यांमध्ये 100 टक्के पीओएस यंत्रांचा वापर सुरू झाल्याचे पासवान यांनी सांगितले आहे.

🔴भ्रष्टाचाराला आळा बसणार:-

✍योजनेमुळे सर्वसामान्यांना मोठा लाभ होणार आहे. यांतर्गत सर्वसामान्य आता कुठल्याही पीडीएस केंद्रावर अवलंबून राहणार नाहीत. दुकान मालकांवरील अवलंबित्व घटणार असून भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.

✍रोजगाराच्या संधीसाठी अन्य राज्यांमध्ये राहत असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे पासवान म्हणाले.

🔴आयएमपीडीएस:-

✍इंटीग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस (आयएमपीडीएस) अंतर्गत अनेक राज्यांमध्ये अन्नधान्य तसेच सार्वजनिक वितरणांतर्गत लाभार्थी कुठल्याही जिल्ह्य़ातून धान्यखरेदी करू शकतो.

✍या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि त्रिपुरा यांचा समावेश असल्याचे ग्राहक विषयक मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

🔴सकारात्मक प्रतिसाद:-

✍वर्षाच्या आत देशभरात ही योजना लागू करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे. योजनेला मूर्त रुप देण्याकरता पीडीएस केंद्रांवर पीओएस यंत्रांची गरज आहे.

✍सद्यकाळात आंध्रप्रदेश, हरियाणा समवेत अनेक राज्यांमध्ये 100 टक्के पीडीएस केंद्रांवर पीओएस यंत्रे उपलब्ध झाली आहेत. केंद्राच्या पुढाकाराला राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची शक्यता वाढली आहे.

SBI करणार 'डेबिट कार्ड' सेवा बंद, पैसे काढण्यासाठी 'योनो' या डिजिटल पेमेंट प्रणालीचा' असेल पर्याय

▪️एसबीआयचे चेअरमन रजनीशकुमार यांनी एका कार्यक्रमात याबाबत सुतोवाच केले आहे. त्यांनी म्हटले की, "सध्या मोठ्या प्रमाणावर वापरात असलेली डेबिट कार्ड सेवा बंद करण्याची आमची योजना आहे. देशात सध्या ९० कोटी डेबिट कार्ड आणि कोटी क्रेडिट कार्ड वापरात आहेत."

▪️मात्र, डेबिट कार्डला पर्यायही त्यांनी यावेळी दिला.ते म्हणाले, "योनो डिजिटल प्लॅटफॉर्म डेबिट कार्डची सेवा संपुष्टात आणण्यात महत्वाची भुमिका बजावेल.

▪️ योनोच्या माध्यमातून एटीएम मशिन्समधून रोख रक्कम काढता येईल तसेच दुकानांमधून वस्तू देखील खरेदी करता येतील.

▪️बँकेने यापूर्वीच ६८,००० योनो कॅशपॉईंट इन्स्टॉल केले आहेत. त्यानंतर येत्या १८ महिन्यांत याची संख्या १० लखांपर्यंत वाढवण्याची एसबीआयची योजना आहे.

▪️एसबीआयने याच वर्षी 'योनो' कॅश सेवेला सुरुवात केली आहे. याद्वारे ग्राहकांना आपल्या अकाऊंटमधून विना डेबिट कार्ड पैसे काढता येतात, ही प्रणाली खूपच सोपी आणि सुरक्षित आहे.

महाराष्ट्राचा मल्ल निघाला जग जिंकायला; राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

▪️महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मंगळवारी या स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला.

▪️ 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे.

▪️त्यामुळे राहुलकडून अनेकांच्या अपेक्षा लागल्या आहेत.

▪️संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्यानं राहुलला 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आणि विरोधकांना चपराक लगावली.

✅ राहुलने राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता त्यानं निवड चाचणी स्पर्धेत 61 किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे.

▪️ उपांत्य फेरीत त्यानं नवीन कुमारवर 9-4 असा मोठा विजय मिळवला होता.

महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

डिजिटल मतदार साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ‘आय-हेल्प’ हा उपक्रम सुरू केला आहे? – आसाम

चीनच्या मत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड्स’ उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? – इटली

फोनपेच्या सदिच्छादूत पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – अमीर खान

सर्व प्रमुख कृषी आवश्यकतांसाठी उपाय पुरवण्यासाठी कोणत्या बँकेने ‘बडोदा किसान’ हे कृषी डिजिटल व्यासपीठ विकसित केले आहे? – बँक ऑफ बडोदा

नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनने कोणत्या कंपनिसोबत सामंजस्य केले आहे? – अॅडोब

‘आंतरराष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंवाद’ कोणत्या शहरात पार पडला? – नवी दिल्ली

कोणता जिल्हा हा 5G कव्हरेज असलेला जगातील पहिला जिल्हा ठरला आहे? – शांघाई (चीन)

पहिल्यांदाच मतदान करणार्‍या मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या जिल्हा प्रशासनाने ‘संकल्प’ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे? – बोंगाईगाव (आसाम)

कोणत्या भारतीय क्रीडा संघटनेने असोचेमचा ‘उत्कृष्ट क्रीडा संघटना’ पुरस्कार जिंकला आहे? – नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया

नीती आयोगाच्या अहवालानुसार महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये पहिले स्थान प्राप्त करणारा ‘हैलाकांडी’ जिल्हा कोणत्या राज्यातील आहे? – आसाम

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कुकला ब्रिटनच्या रानीकडून  कोणता सन्मान देण्यात आला आहे? – नाइटहूड

नवकल्पना आणि उद्योजकता महोत्सव (FINE) कोणत्या शहरात पार पडला? – गांधीनगर

शासकीय रुग्णालयात ‘ट्रांसकॅथीटर ऑर्टिक वाल्व्ह इम्प्लांटेशन’ (TAVI) सुरू करणारे तमिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

चालू घडामोडी प्रश्नउत्तरे

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे

फडणवीस मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

1.खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापण्यास मान्यता.

2.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय.

3.मुंबई शहरासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्प राबविण्यासह त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता.

4.मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर बीड जिल्ह्यातील 4800 कोटींच्या कामासाठी निविदा मागविणार.

5.कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल व परिसराच्या विकास आराखड्यास मान्यता.

6.साताऱ्याच्या जिहे कठापूर येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

7.राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत उपजीविकेसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान (संकल्प) प्रकल्प राज्यात राबविण्यास मान्यता.

8.साखर कारखाना सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी मूळ स्थापित क्षमतेत वाढ केल्यास नवीन क्षमतेसह ऊस खरेदी करात सूट.

9.पत्रकार क्लब ऑफ नागपूर या संस्थेस मौजा गौडा येथील जागा तेथील वास्तूसह विशेष बाब म्हणून भाडेपट्ट्याने देण्यात येणार.

10.सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन व पाणीपट्टीच्या रकमेसंदर्भातील शासन निर्णयात सुधारणा.

11.ॲनिमल केअर सेंटर फाऊंडेशन मुंबई, मेसर्स पीपल फॉर ॲनिमल नवी दिल्ली आणि सिडको यांच्यामधील त्रिपक्षीय करारनाम्यावरील मुद्रांक शुल्क माफ.

12.मुद्रांक शुल्क अभय योजनेच्या राजपत्रामध्ये सुधारणा करण्याबाबत.

13.महाराष्ट्र राज्य सहकार अपिल न्यायालय व सहकार न्यायालय यांच्याकडे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची 255 पदे वर्ग करण्याचा निर्णय.

14.इमाव, विजाभज, विमाप्र विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस मान्यता.

15.अकोला येथील श्री. नथमल गोयनका विधि महाविद्यालय आणि यवतमाळ येथील अमोलकचंद विधि महाविद्यालयातील प्राचार्य व ग्रंथपाल पदांना अनुदान.

16.नागपूरच्या भिवापूर येथील हिरा बाळाजी मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची शासन अर्थसहाय्यासाठी निवड.

17.तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडको या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबत.

18.नागरी क्षेत्रातील खासगी जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टेवाटप करण्यासाठी कार्यप्रणाली मंजूर.

19.रायगड जिल्ह्यातील मौजे डोणवत (ता. खालापूर) येथील 0.64 हेक्टर जमीन औद्योगिक कारणासाठी मे. केमट्रॉन सायन्स-लॅबोरेटरीज यांना देण्याबाबत.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन

​​

        मांगदेछू जलविद्युत प्रकल्प

🗣पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

🗣4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे. प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे. 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.

🗣मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे. बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.

🗣भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे. थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...