१५ ऑगस्ट २०१९

यशाचा राजमार्ग ला उस्फुर्त प्रतिसाद

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्साहास तोड नाही,गरज आहे ती दर्जेदार मार्गदर्शनासह दर्जेदार शैक्षणिक साहित्याची.

वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना लक्षात घ्यावयाच्या काही गोष्टी:

💎अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न चे सखोल विश्लेषण,
💎पायाभूत संकल्पना समज़ुन घेणे अत्यावश्यक बाब,
💎पायाभूत पुस्तकांसह दर्जेदार संदर्भ पुस्तकांचे तौलनिक व विश्लेषणात्मक वाचन व ते उदाहरणासह समज़ुन घेण्यासाठी त्याला चालु घडामोडींची जोड देणे आवश्यक
💎हया गोष्टी करत असताना समोर येणार्या शंकांची नोंदणी करणे आणि शंकांचं निरसन तज्ञ मार्गदर्शकाकरवी करुन घेणे म्हणजे खर्या अर्थाने अभ्यास करणे होय.
💎संवांदासाठी भाषाज्ञान ही आयोगाची उमेदवाराकडुन अपेक्षा आहे त्यासाठी दैनंदिन जीवनात तरतुद करणे योग्य
💎निर्णयक्षमता विकसित होण्यासाठी बुद्धीमत्ता चाचणी व गणित या घटकांचा नियमित सराव अनिवार्य
💎परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव हा अनिवार्य आहे.
💎शारिरिक मानसिक बौद्धिक व आत्मिक स्थैर्यासाठी व्यायाम,ध्यान,वाचन,चिंतन व क्रिडा या घटकांना दिनचर्येत जाणीवपूर्वक स्थान देणे अगत्याचे हे यशस्वी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या प्रवासाचा धांडोळा घेतल्यानंतर समोर आलेल्या बाबी आहेत.या सह स्वसंवाद,कुटुंबाशी सुसंवाद,सौह्रार्दपुर्ण वातावरणात राहणे आवश्यक आहे.
💎तज्ञांचं मार्गदर्शन आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य हे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचं गमक आहे.
💎परिस्थिती आणि संकंटांचं बाऊ करु नका,
💎मिळालेल्या संधीचं सोनं करा,
💎सर्व विषयांच्या संकल्पना स्पष्ट करुन घ्या,त्यांचा दैनंदिन जीवनात असलेला अर्थ पहा,
💎अवघड तेवढ्याच घटकाच्या स्वत:च्या नोट्स डेव्हलप कराव्यात तेही अनेकवेळा  वाचन झाल्यावरच.
💎नियोजनाशिवाय अभ्यास ध्येयपुर्ती मधील सर्वात मोठा अडसर आहे.
💎रिव्हिजन(उजळणी) हा महत्वाचा भाग आहे या परीक्षांमध्ये
💎सि सॅट मध्ये चांगला स्कोअर हवा असेल तर सरावाशिवाय पर्याय नाही
💎परीक्षा पास होण्यासाठी पेपर सोडवण्याचा सराव महत्वाचा,
💎आपली दिनचर्याच आपल्याला आपल्या ध्येय्यापर्यंत घेवुन जाते,
💎कुटुंबाशी असलेलं पारदर्शक नातं मनोबल अबाधित ठेवणारं असतं,दिर्घकालीन सातत्य राखुन,स्वत:शी प्रामाणिक राहुन आणि संयमाने करावयाच्या अभ्यासाला मनोबलाची आवश्यकता आहे.
💎समाज माध्यमं वाईट नाहीत परंतु अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारा दिर्घकालीन एकाग्र चित्ताने करावयाचा अभ्यासातला अडसर मात्र आहे म्हणुन शक्यतो अंतर राखलेलं बरं.
💎भाषांवर प्रभुत्व असेल तर मुख्य आणि मुलाखत या परीक्षेच्या टप्प्यात जमेची बाजु ठरु शकणारा भाग असेल.

🌸💕राज्य म्हणजे काय?💕🌸

👇👇👇👇👇👇👇👇👇

✍हे भारतीय राज्यघटनेअंतर्गत येणारा एक घटक असून ज्याचे स्वतंत्र असे सरकार आहे.

✍हे सरकार 'राज्य सरकार' म्हणून ओळखले जाते. या सरकारची निवड जनता मतांद्वारे करते.

✍राज्यांना आपले कायदे तयार करण्याचे व त्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार असतात.

✍प्रत्येक राज्याला स्वतंत्र विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो. या ठिकाणी राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात असतात.

🎄आंतरराष्ट्रीय न्यायालय (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस)🎄


👉  संयुक्त राष्ट्रसंघाची न्यायिक संस्था
👉स्थापना :- 1945
👉मुख्यालय-शांती महल- द हेग (नेदरलॅंड)
👉 सदस्य देश -193
👉 अध्यक्ष :-अब्दुलक्वी अहमद युसुफ
👉 भाषा ::-इंग्रजी आणि फ्रान्सिस
👉एकूण न्यायाधीश 15 प्रत्येक
👉न्यायाधीशांची नियुक्ती ही संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद व आमसभा यांच्यामार्फत केले जाते
👉 प्रत्येक न्यायाधीशाचा कालावधी ९ वर्षाचा असतो
👉न्यायाधीश पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात किंवा न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती होऊ शकते
👉 दर ३ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नव्याने भरले जातात
👉अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी तीन वर्षाचा असतो
👉अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नियुक्ती  आंतरराष्ट्रीय न्यायालयामार्फत केले जाते 👉आंतरराष्ट्रीय न्यायालय ही सल्लागार  संस्था आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...