▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📕 *विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी यांना ‘चित्रभूषण’*
● अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी, तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.
● शाल, श्रीफळ आणि 51,000 हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्या मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले.
◆ तसेच रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, दीपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मींना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
● शाल, श्रीफळ आणि 11 हजार रुपये रोख रक्कम असे देण्यात येणार्या या पुरस्काराचे स्वरूप आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📕 *काजिन सारा सरोवर ठरले जगातील सर्वात उंचीवरील सरोवर*
● नुकतेच नेपाळमध्ये काजिन सारा नावाचे सरोवर सापडले आहे, हे सरोवर आता जगातील सर्वात उंचीवरील सरोवर म्हणून ओळखले जाणार आहे.
● हे सरोवर नेपाळमधील मनांग जिल्ह्यातील चामे नावाच्या क्षेत्रात सिंगारखडका भागात स्थित आहे.
● सध्या जगातील सर्वात उंचीवरील सरोवर तिलिचो आहे, ते नेपाळमध्ये 4,919 मीटर उंचीवर आहे.
★ काजिन सारा सरोवर :
● या सरोवराचे स्थानीक नाव सिंगार आहे.
● हे सरोवर 5200 मीटर उंचीवर स्थित आहे.
● हिमालयातील बर्फ वितळण्यामुळे हे सरोवर तयार झाले आहे.
_______________________________
★ संकलन ★
राजेश देशमुख दिगंबर आधुरे
(राज्य कर निरीक्षक) (सहा. कक्ष अधिकारी)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📕 *चंद्रिमा शहा : भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा*
● प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
● 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
● याआधी त्या दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.
★ भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी :
● या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
● ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.
● उद्देश : देशात विज्ञानाचा प्रसार करणे
● मुख्यालय : नवी दिल्ली
● यापूर्वीचे अध्यक्ष : अजय सूद
● वर्तमान अध्यक्षा : चंद्रिमा शहा
_______________________________
★ संकलन ★
राजेश देशमुख दिगंबर आधुरे
(राज्य कर निरीक्षक) (सहा. कक्ष अधिकारी)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📕 *डॉ. विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली*
◆ भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक, 'इस्रो'चे संस्थापक दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
◆- भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक
◆- जन्म: 12 ऑगस्ट 1919
◆- मृत्यू: 30 डिसेंबर 1971
◆- भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी Cosmic Rays वरती संशोधन केले
◆- 1962 मध्ये Indian National Committees for Space Research या संस्थेची स्थापना केली 1969 मध्ये याचेच नाव ISRO ठेवण्यात आले.
◆- 1962 मध्ये IIM अहमदाबाद स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली
---------------------------------------------------
● पुरस्कार
◆- 1962: शांती स्वरूप भटनागर पदक
◆- 1966: पद्म भूषण
◆- 1972: पद्म विभूषण (मरणोत्तर)
◆ ISRO ची महत्त्वाची संस्थेचे Vikram Sarabhai Space Centre असे नामांकरण करण्यात आले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂