शहर - नदी - राज्य
1. आगरा - यमुना - उत्तर प्रदेश
2. अहमदाबाद - साबरमती - गुजरात
3. इलाहाबाद - गंगा - उत्तर प्रदेश
4. अयोध्या - सरयू - उत्तर प्रदेश
5. बद्रीनाथ - गंगा - उत्तराखंड
6. कोलकाता - हुगली - पश्चिम बंगाल
7. कटक - महानदी - ओडिशा
8. नई दिल्ली - यमुना - दिल्ली
9. डिब्रूगढ़ - ब्रह्मपुत्र - असम
10. फिरोजपुर - सतलज - पंजाब
11. गुवाहाटी - ब्रह्मपुत्र - असम
12. हरिद्वार - गंगा - उत्तराखंड
13. हैदराबाद - मूसी - तेलंगाना
14. जबलपुर - नर्मदा - मध्य प्रदेश
15. कानपुर - गंगा - उत्तर प्रदेश
16. कोटा - चंबल - राजस्थान
17. जौनपुर - गोमती - उत्तर प्रदेश
18. पटना - गंगा - बिहार
19. राजमुंदरी - गोदावरी - आंध्र-प्रदेश
20. श्रीनगर - झेलम - जम्मू/कश्मीर
21. सूरत - ताप्ती - गुजरात
22. तिरूचिरापल्ली - कावेरी - तमिलनाडु
23. वाराणसी - गंगा - उत्तर प्रदेश
24. विजयवाडा - कृष्णा - आंध्र प्रदेश
25. वडोदरा - विश्वमित्री - गुजरात
26. मथुरा - यमुना - उत्तर प्रदेश
27. औरैया - यमुना - उत्तर प्रदेश
28. इटावा - यमुना - उत्तर प्रदेश
29. बंगलौर - वृषभावती - कर्नाटक
30. फर्रुखाबाद - गंगा - उत्तर प्रदेश
31. फतेहगढ़ - गंगा - उत्तर प्रदेश
32. कन्नौज - गंगा - उत्तर प्रदेश
33. मंगलौर - नेत्रवती - कर्नाटक
34. शिमोगा - तुंगा नदी - कर्नाटक
35. भद्रावती - भद्रा - कर्नाटक
36. होसपेट - तुंगभद्रा - कर्नाटक
37. कारवार - काली - कर्नाटक
38. बागलकोट - घटप्रभा - कर्नाटक
39. होन्नावर - श्रावती - कर्नाटक
40. ग्वालियर - चंबल - मध्य प्रदेश
41. गोरखपुर - राप्ती - उत्तर प्रदेश
42. लखनऊ - गोमती - उत्तर प्रदेश
43. कानपुर - छावनी - गंगा UP
44. शुक्लागं - गंगा - उत्तर प्रदेश
45. चकेरी - गंगा - उत्तर प्रदेश
46. मालेगांव - गिर्ना नदी - महाराष्ट्र
47. संबलपुर - महानदी - ओडिशा
48. राउरकेला - ब्राह्मणी - ओडिशा
49. पुणे - मुथा - महाराष्ट्र
50. दमन - गंगा नदी - दमन
51. मदुरै - वैगई - तमिलनाडु
52. तिरुचिरापल्ली - कावेरी - तमिलनाडु
53. चेन्नई - अड्यार - तमिलनाडु
54. कोयंबटूर - नोय्याल - तमिलनाडु
55. इरोड - कावेरी - तमिलनाडु
56. तिरुनेलवेली - थमीरबारानी - तमिलनाडु
57. भरूच - नर्मदा - गुजरात
58. कर्जत - उल्हास - महाराष्ट्र
59. नासिक - गोदावरी - महाराष्ट्र
60. महाड - सावित्री - महाराष्ट्र
61. नांदेड़ - गोदावरी - महाराष्ट्र
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१२ ऑगस्ट २०१९
नदी के किनारे बसे शहर
● माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
- भारताचे 13 वे राष्ट्रपती
- जन्म: 11 डिसेंबर 1935
- शिक्षक, पत्रकार, राजकारण असा मुखर्जींचा जीवनप्रवास
-------------------------------------------------
● भूषविलेली पदे
- 2004 ते 2012 याकाळात जंगीपूर (प. बंगाल) या मतदार संघातून ते लोकसभा सदस्य होते.
- केंद्रीय अर्थमंत्री: 1982 ते 1984 & 2009 ते 2012
- राज्यसभा नेते: 1980 ते 1984
- लोकसभा नेते: 2004 ते 2012
- केंद्रीय संरक्षण मंत्री: 2004 ते 2006
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री: 1995 ते 1996 & 2006 ते 2009
- नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष: 1991 ते 1996
- भारताचे राष्ट्रपती: 2012 ते 2017
-------------------------------------------------
● प्रकाशित पुस्तके
- Beyond Survival: Emerging dimensions of indian Economy (1984)
- Saga of Struggle & Sacrifice (1972)
- Challenges before the Nation (1992)
- The Coalition Year
-------------------------------------------------
● प्राप्त पुरस्कार
- पद्म विभूषण
- Bangladesh Liberation War Honour
- Grand Cross of the Ivory Coast
- भारतरत्न (2019)
विक्रम साराभाई
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार
जन्मदिन - १२ ऑगस्ट, १९१९
विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
बालपण व शिक्षण :-
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले.
१९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
कारकीर्द:-
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले.
भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.
विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली.
अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.
✅एका ओळीत सारांश, 12 ऑगस्ट 2019✅✅
🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹
👉सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी तयार करण्यात आलेले भारताचे प्रथम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड - फ्रीडम कार्ड (एनकॅश कंपनीचे).
👉मास्टरकार्डद्वारे समर्थित असलेले हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड तयार करणारी संस्था - RBL बँक आणि प्रॅक्टो कंपनी.
🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹
👉नव्याने शोधला गेलेला तलाव जो जगातला सर्वाधिक उंच ठिकाणी असलेला तलाव आहे - काजिन सारा तलाव (नेपाळच्या मानंग जिल्ह्यात सिंगारखारका येथे समुद्रसपाटीपासून 5,200 मीटर उंचीवर असलेला 1,500 मीटर लांबीचा आणि 600 मीटर रुंद तलाव).
👉आता, जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वाधिक उंच ठिकाणी असलेला तलाव - तिलीचो तलाव(नेपाळमध्ये समुद्रसपाटीपासून 4919 मीटर उंचीवर असलेला 4 किमी लांबीचा आणि 1.2 किमी रुंद आणि सुमारे 200 मीटर खोल तलाव).
🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹
👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगातला प्रथम क्रमांकाचा देश – संयुक्त राज्ये अमेरीका.
🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹
👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, स्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगातला क्रमांक – तिसरा.
👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारताचा जगातला क्रमांक - चौथा.
👉‘लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019’ यामधल्या तरतुदींनुसार स्थापना करण्यात येणार्या लवाद परिषदेचे अध्यक्ष – भारतीय प्रधान न्यायाधीश (CJI).
👉‘बिल्डिंग बेटर कोट्स: सर्वेयींग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ इंडियाज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स’ या अहवालानुसार, जिल्हा न्यायालय संकुलात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक - चंदीगड (त्यानंतर दिल्ली).
🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹
👉2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता - लिओनेल मेस्सी.
🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹
👉‘बिल्डिंग बेटर कोट्स: सर्वेयींग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ इंडियाज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स’ या अहवालानुसार, जिल्हा न्यायालय संकुलात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक – 18 वा.
🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹
👉“HarmonyOS” (किंवा चीनी भाषेत हाँगमेंग) या नावाने चीनचे स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टम तयार करणारी कंपनी - हुवेई.
🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹
👉कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) याचे स्थापना वर्ष - सन 1999.
👉युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) – स्थापना वर्ष: सन 1954; मुख्यालय: न्यॉन, स्वित्झर्लंड.
👉स्वातंत्र्यानंतर भारताचे प्रथम प्रधान न्यायाधीश - हरीलाल जेकिसुनदास कानिया (14 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950).
👉फेडरल कोर्ट ऑफ इंडिया (स्वातंत्र्यापूर्वी) येथे प्रथम प्रधान न्यायाधीश - मॉरिस ग्वेयर (1 ऑक्टोबर 1937 ते 25 एप्रिल 1943).
👉फेडरल कोर्ट ऑफ इंडिया येथे प्रथम भारतीय प्रधान न्यायाधीश - श्रीनिवास वरदाचारीयर (25 एप्रिल 1943 ते 7 जून 1943).
👉वर्तमानातले भारताचे प्रधान न्यायाधीश - रंजन गोगोई(3 ऑक्टोबर 2018 पासून).
🌺🌺गेल्या १७ वर्षांत यंदा राज्यसभेची कामगिरी ठरली सर्वोत्कृष्ट; तब्बल ३१ विधेयके मंजूर🌺🌺
🔰गेल्या १७ वर्षात यंदा पहिल्यांदाच राज्यसभेची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. कारण, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यसभेकडे मंजुरीसाठी आलेल्या ३३ विधेयकांपैकी तब्बल ३१ विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे १०५ टक्क्यांनी विधेयकांच्या मंजुरी प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे.
🔰या मंजूर विधेयकांमध्ये जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९, मुस्लिम महिलांचे वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक २०१९ (तिहेरी तलाक) या महत्वाच्या विधेयकांचा समावेश आहे. या अधिवेशनाचा कार्यकाळ संपताना राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू यांनी सांगितले की, गेल्या पाच अधिवेशनांमध्ये सभागृहाची मंजुरी क्षमता ही ७.४४ टक्क्यांहून ६५.६० टक्क्यांवर पोहोचली. गेल्या पाच वर्षातील ही आकडेवारी १०० टक्क्यांहून अधिक आहे.
🔰या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत ३६ तर राज्यसभेत ३१ विधेयके मंजूर झाली आहेत. ही ३१ विधेयके ३५ बैठकांमध्ये मंजूर करून घेण्यात आली. राज्यसभेची ही गेल्या १७ वर्षातली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. एकूण ५२ सत्रांमध्ये ही कामगिरी केली गेली. २४९ सत्रांपैकी कामकाजाचे अडीज दिवस हे गोंधळामुळे वाया गेले, यामध्ये सभागृहाच्या कामकाजाची १९ तास १२ मिनिटे वायाला गेली.
🔰नायडू म्हणाले, या अधिवेशनात मंजूर झालेली विधेयके ही देशात सामाजीक, आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या परिणाम करणारी महत्वाची विधेयके होती. यांपैकी तिहेरी तलाक विधेयक जे गेल्या ६० वर्षांत हिंदू कोड बिलानंतर मंजूर झालेले सर्वाधिक महत्वाचे सामाजीक सुधारणा विधेयक होते. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक हे देखील एक ऐतिहासिक विधेयक होते.
Latest post
Mpsc pre exam samples questions
1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे? A. ...
-
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास) 1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्व...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...