Friday, 9 August 2019

💁‍♂ *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा*


📣 दिल्लीतील शास्त्री भवनात मानाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची झाली घोषणा

📍 *बॉलिवूड पुरस्कार* :

● सर्वोत्कृष्ट चित्रपट : अंधाधून
● सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन :  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत : घूमर)
● सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर : उरी
● पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- :पॅडमॅन
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंग (पद्मावत : बिंते दिल)
● सर्वोत्कृष्ट अभिनेता : आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट अ‍ॅडाप्टेट स्क्रीनप्ले : अंधाधून

📍 *मराठी चित्रपट पुरस्कार* :

● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : भोंगा
● पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : पाणी
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : स्वानंद किरकिरे (चुंबक)
● सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक : सुधाकर रेड्डी (नाळ)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार : श्रीनिवास पोकळे (नाळ)

📍 *इतर पुरस्कार* :

● सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तेलुगू चित्रपट ‘महानटी’
● सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट : हेलारो
● सर्वोत्कृष्ट संवाद : बंगाली चित्रपट ‘तारीख’
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : किर्ती सुरेश (महानटी)
● सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
● सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन चित्रपट : कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
● सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट : हरजीता
● सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट : बुलबुल कॅन सिंग
● सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट : बारम
● सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट : मटानटी
● सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : सुदानी फ्रॉम नायजेरिया

✅✅एका ओळीत सारांश,10 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉जागतिक आदिवासी दिन (9 ऑगस्ट) याची संकल्पना – इंडिजिनस लॅंगवेजेस.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉वर्तमानात या देशात सर्वाधिक 840 आदिवासी भाषा बोलल्या जातात - पापुआ न्यू गिनी.

👉संयुक्त राष्ट्रसंघाचे “आंतरराष्ट्रीय आदिवासी भाषा वर्ष” – सन 2019.

👉या देशाने भारतासह 20 हून अधिक देशांना सूचीबद्ध केलेली अमली पदार्थांचे संक्रमण किंवा बेकायदेशीरपणे उत्पादन घेणार्‍या देशांची यादी प्रसिद्ध केली - अमेरीका.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉बोलल्या जाणार्‍या आदिवासी भाषांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक – चौथा (453 भाषांसह).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉2019 साली ‘भारतरत्न’ हा सन्मान प्राप्त करणारे व्यक्ती - प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉8 ऑगस्टला दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली - हाशिम आमला.

👉या खेळाडूने टी-20 क्रिकेट प्रकारात फक्त 18 धावांत 7 बळी मिळवित नवा विश्वविक्रम नोंदवला - कॉलिन अॅकरमन (दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज).

👉19-25 ऑगस्ट 2019 या काळात होणार्‍या जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेचे ठिकाण - माद्रिद, स्पेन.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी या आंतरराष्ट्रीय बँकेकडून महाराष्ट्र राज्यासाठी 200 दशलक्ष डॉलर (सुमारे 1410.8 कोटी रुपये) एवढ्या रकमेचे कर्ज मंजूर करण्यात आले - आशियाई विकास बँक (ADB).

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉ही भारतीय संस्था आणि चेन्नईची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या संस्थेमधील संशोधक संयुक्तपणे महासागरांच्या लाटांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी योग्य टर्बाइन विकसित करीत आहेत – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना वर्ष: सन1966; मुख्यालय: मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स).

👉भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न (1954सालापासून).

👉भारतरत्न सन्मान प्राप्त करणारे पहिले भारतीय - चंद्रशेखर व्यंकट रमन.

👉वर्ल्ड आर्चरी (जागतिक तिरंदाजी महासंघ) – स्थापना वर्ष: सन 1931; मुख्यालय: ल्युसाने, स्वित्झर्लंड.

👉भारतीय तिरंदाजी संघ (AAI) – स्थापना वर्ष: सन 1973; मुख्यालय: नवी दिल्ली.

🌹🌳🌴मोदी सरकारकडून ३००० ची ‘किसान’ पेंशन योजना आज पासून सुरू🌴🌳🌹

👉केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर दिल्लीतून याची सुरुवात करणार आहेत.

👉या योजनेचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

👉स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी योजना सुरू केली जाईल.

👉देशभरातील अल्पभूधारक शेतकरी (एसएमएफ) साठी एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे.

👉या योजनेसाठी १८ ते ४० वर्षांपर्यंतचे शेतकरी अर्ज करू शकतील.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ५० रुपयांपासून १००, १५० रुपयांपर्यंत रोख रक्कम दरमहिन्याला भरावी लागेल.

👉तसंच स्किममध्ये गुंतवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना ६० वर्षाचे झाल्यानंतर दरमहिन्याला ३००० रुपये पेंशन म्हणून मिळणार.

👉पेंशन योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांचा मृत्य़ू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० टक्के रक्कम देण्यात येईल. म्हणजे १५०० रुपये मिळतील. तसंच ही योजना जीवन विमा निगम यांच्यातर्फे चालवली जाणार आहे.

👉या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी:-
१. आधार कार्ड,
२. जमिनीचा सात-बारा,
३. बँक पासबुक,
४. राशन कार्ड,
५. २ फोटो

अशा कागदपत्रांची गरज असणार आहे.

👉या योजने अंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे हा उद्देश आहे.

👉तसंच किसान पेंशन योजनेता लाभ घेण्यासाठी आपण किसान कॉल सेंटरच्या १८००-१८०-१५५१ या नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकता. तसंच सामान्य सेवा केंद्र आणि राज्याचे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता.

📚 *चालू घडामोडी (09/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *लिंगाधारित अर्थसंकल्प [Gender Budget]

- या संकल्पनेचा उद्य 90 च्या दशकात झाला.
- जागतिक महिला परिषद 1995 नंतर "युनिफेम"तर्फे 1996 मध्ये द. आफ्रिका, पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका या भागात या संकल्पनेवर काम सुरू झाले.
- ही संकल्पना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात स्विकारण्यात आली.
---------------------------------------------------
● नक्की संकल्पना काय ?

- जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, तर अर्थसंकल्पातील विविध प्रस्तावांचे महिलाकेंद्रित विश्लेषण होय.
- थोडक्यात स्त्रियांच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या वित्तीय सुधारणांचे अंतिम परिणाम मोजणे म्हणजे जेंडर बजेट.
---------------------------------------------------
● भारतात सुरूवात

- सर्वप्रथम 2001 मध्ये या संकल्पनेवर विचार होवू लागला.
- तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या 2000-2001 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला.
- 2004 मध्ये केंद्र सरकारने ही संकल्पना स्विकारली तर 2005 पासून त्यावरचे परिशिष्ट हा बजेटचा भाग बनले.
- ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, केरळ, इ. राज्यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली.
---------------------------------------------------
● महाराष्ट्रात सुरूवात

- राज्यात 2013 मध्ये जेंडर बजेट ही संकल्पना स्विकारण्यात आली.
- 1994, 2001 आणि 2014 अशी तीन महिला धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत.
- 1992 पासून राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापने बंधनकारक करण्यात आले आहे.
- महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% रक्कम जेंडर बजेटसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे.
---------------------------------------------------
● जेंडर बजेटची उद्दिष्टे

- महिलांच्या सामाजिक समानतेसाठीच्या प्रमुख गरजा ओळखून त्यांची क्रमवारी लावून, त्यासाठी सुयोग्य आर्थिक तरतूद करणे.
- सामाजिक योजना आणि आर्थिक तरतुदी यांची सांगड घालणे.
- विशेष सामाजिक योजनांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे.
-------------------------------------------------
● अर्थसंकल्पाची कार्यपद्धती

- लिंगाधारित अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र आदेश जारी करणे.
- जेंडर बजेट सेल स्थापन करणे.
- जेंडर बजेट अहवाल प्रसिद्ध करणे.
-------------------------------------------------
● जेंडर बजेटसाठी प्रशिक्षण

Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management [VAMNICOM] Pune या संस्थेच्या Centre for Gender Studies मार्फत जेंडर बजेट संबंधी मार्गदर्शन, जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आज प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न*

●माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.

● राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

● या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

प्रणव मुखर्जी

● प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.

● मुखर्जी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.

● ते 1982 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

● पंतप्रधानां व्यतिरिक्त ,आठ वर्षे लोकसभेचे सभागृह नेते राहिलेले ते एकमेव व्यक्ती.

● भारतरत्न पुरस्कार मिळविणारे सहावे राष्ट्रपती आहेत. याआधी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन,व्हीव्ही गिरी आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे.

● पद्मविभूषण:2008

● त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.

नानाजी देशमुख

● हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.

● नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.

● नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.

● राज्यसभेचे सदस्यही होते.

● 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...