Wednesday, 7 August 2019

🔹हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब का टाकला?

अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून प्रचंड विध्वंस केला त्या घटनेला ७१ वर्षे होत आहेत. जर्मनीच्या शरणागतीनंतर जपानी शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करण्याला अनेक शास्त्रज्ञ,
सेनानी यांनी विरोध केला होता. तरीही हा हल्ला का करण्यात आला याचा ऊहापोह करणारा लेख
अमेरिकन सरकारने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून दोन लाख जपानी नागरिकांना ठार मारले. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात. परंतु काही जण मात्र अजूनही या अणुबॉम्ब हल्ल्याचे समर्थन करतात : ‘झाले हे वाईट झाले, पण अणुबॉम्ब वापरला नसता, तर दुसरे महायुद्ध खूप लांबले असते व त्यात जास्त माणसे मारली गेली असती.’ अणुबॉम्ब हल्ल्यानंतरच्या ७० वर्षांत कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हिरोशिमाला भेट दिली नव्हती. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या नुकत्याच झालेल्या पहिल्यावहिल्या हिरोशिमा भेटीत बराक ओबामांनी अपार दु:ख व्यक्त करून अण्वस्त्रमुक्त जगाची अपेक्षा केली. परंतु जपानी नागरिकांची जाहीर माफी मात्र मागितली नाही. म्हणूनच अणुबॉम्ब हल्ल्यामागील या सरकारी कारणाची तपासणी केली पाहिजे.
जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली. दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला. हल्ल्यामागील कारणांच्या तपासात कायम उपयोगी असणारा हा तारीखवार घटनाक्रम अमेरिकेतील होलोकास्ट मेमोरियल म्युझियमच्या ‘वर्ल्ड वॉर सेकंड- टाइमलाइन ऑफ इव्हेंट्स’ शीर्षकाखाली उपलब्ध आहे. (संदर्भ: https://www.ushmm.org/wlc/en/article.php?ModuleId=10007306) अण्वस्त्र हल्ल्यामुळे झालेल्या मृतांच्या संख्येच्या विविध अंदाजांपैकी मृतांचा कमीतकमी अंदाज असा आहे : हिरोशिमाच्या २ लाख ५५ हजार लोकसंख्येपैकी १ लाख ३५ हजार आणि नागासाकीतील सुमारे १ लाख ९५ हजार लोकसंख्येपैकी ६४ हजार माणसे ठार. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांपेक्षा नागरिक जास्त मारले गेले आहेत. परंतु हिरोशिमा-नागासाकीमध्ये बहुसंख्य मृत्यू (९९%) निरपराध नागरिकांचे आहेत. जगातल्या कुठल्या दहशतवादी गटाने अथवा अमेरिकी शासनाच्या नजरेतील शांततेला धोकादायक कोणत्या राष्ट्राने (Rogue State) अमेरिकेच्या तोलामोलाचे दहशतवादी कृत्य केले आहे? युद्धकाळात नागरिकांवर होणारे हल्ले अनैतिक, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे असतात. त्याविरुद्ध १९२३ सालीच आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात आला होता. त्यामध्ये नुकसानभरपाईची तरतूददेखील आहे. महाभारताच्या युद्धाचेही त्या काळी धर्मनियम होते. ते मोडूनच श्रीकृष्णाने कुरुसैन्यातील द्रोणाचार्य, कर्ण, जयद्रथ अशा सेनापतींच्या हत्या करविल्या होत्या आणि भीष्माचार्यासमोर हतबल झालेल्या अर्जुनाला पाहून ‘न धरी शस्त्र करी’ हा स्वत:चा शब्द मोडून हाती सुदर्शनचR घेतल्याचे त्रिकालाबाधित सत्य व्यासांनी कथेतून सांगितले आहे. दुसऱ्या महायुद्धात आणि त्यानंतरही अनेक वेळा आंतरराष्ट्रीय नियमांची अनेक राष्ट्रांनी पायमल्ली केली आहे. असेच भयावह वक्तव्य इंग्लंडच्या नूतन पंतप्रधान तेरेसा मे यांनी नुकतेच संसदेत केले. ‘स्वत:च्या राष्ट्राचे संरक्षण’ या नावाखाली ‘दहशतवादी’ हल्ले करून लाखो नागरिकांना झटक्यात ठार मारण्याची मानसिक तयारी अनेक राष्ट्रप्रमुखांची कशी काय होते, याची उत्तरे अण्वस्त्र हल्ल्यांमागील जाहीर कलेली कारणे आणि प्रत्यक्ष कारणे, घटनाक्रम आणि निगडित संदर्भ लक्षात घेतले तर मिळू शकतील.
जर्मनीमध्ये अणुविखंडनाची साखळी प्रक्रिया १९३९ या वर्षी प्रथम हाती आली. आता अणुबॉम्बचे आव्हान तंत्रज्ञांपुढेच काय ते होते. जुलमी नाझी सत्ताकाळात अनेक ज्यू शास्त्रज्ञ जर्मनी सोडून अमेरिकेची वाट धरत होते. त्यांना जर्मनीच्या हाती येऊ शकणारा अणुबॉम्ब ही वंशविद्वेषी सत्तेच्या विजयाची खात्री वाटत होती. शांतताप्रिय अल्बर्ट आइन्स्टाइन हेदेखील त्या भावनेला अपवाद नव्हते. लिओ त्झिलार्ड या पदार्थ वैज्ञानिकाने आइन्स्टाइन यांचे मन मोठय़ा कष्टाने वळवून राष्ट्राध्यक्षांच्या पत्रावर त्यांची सही घेतल्यानेच तर मॅनहटन प्रकल्प १९४२ साली गुप्तपणे सुरू झाला. बघता बघता १ लाख ३० हजार व्यक्ती त्यासाठी झटू लागल्या. प्रकल्पाचा चार वर्षांच्या आयुष्यकाळातील एकूण खर्च (२०१६ या वर्षीच्या किमतीनुसार) २६ हजार कोटी डॉलर झाला. दरम्यान जर्मनी अण्वस्त्रे बनविण्याच्या जवळपासदेखील नाही हे कळल्यावर अनेक शास्त्रज्ञांनी मॅनहटन प्रकल्प बंद करण्याची विनंती केली होती. विनंती अमान्य केल्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी प्रकल्पाच्या कामातून अंग काढले. व्यथित झालेल्या आइन्स्टाइन यांना अणुबॉम्ब बनविण्याची विनंती करणाऱ्या पत्रावर सही करणे ही भलीमोठी चूक वाटली. अण्वस्त्र हल्ल्यामागचे बदललेल्या परिस्थितीमधील ‘मानवी हत्येची किमान किंमत मोजून महायुद्ध लवकर संपविणे’ हे कारण लेखाच्या सुरुवातीला पाहिले आहे. स्टीमसन आणि ट्रमन यांनी ते जनतेच्या गळी यशस्वीपणे उतरविले. अमेरिकेत ते कारण अजूनही शाबूत आहे. कदाचित त्याचाच आधार घेऊन महायुद्धानंतर राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्यावहिल्या हिरोशिमा भेटीत बराक ओबामांनी बॉम्बहल्ल्यातून बचावलेल्यांपैकी काही मंडळींची प्रतीकात्मक गळाभेट घेतली, अपार दु:ख व्यक्त केले आणि अण्वस्त्रमुक्त जगाची अपेक्षा केली. परंतु जपानी नागरिकांची जाहीर माफी नाही मागितली. ही दांभिकता नसेल तर काय आहे?
जर्मनीच्या शरणागतीनंतर जपानी शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करण्याला अनेक शास्त्रज्ञ, सेनानी यांनी विरोध केला होता. त्यात आइन्स्टाइन यांच्या पहिल्या नावानंतर इतरही अनेक मान्यवर आणि अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांची अवतरणे आणि अवतरणांचे स्रोत ‘हू डिसअॅग्रीड विथ द अॅटमिक बॉम्बिंग’ या शीर्षकाखाली सापडतात. (संदर्भ; http://www.doug-long.com/quotes.htm ) त्यातील पहिले नाव आहे अमेरिकन आर्मीचे पंचतारांकित जनरल आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त सेनांचे सर्वोच्च अधिकारी आयसेनहॉवर यांचे. त्यांनी लिहून ठेवले आहे की, ‘सेक्रेटरी ऑफ वॉर स्टीमसन यांनी जुलै १९४५ मध्ये माझी जर्मनीतील कार्यालयात भेट घेतली. भेटीत अमेरिकेने अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचे सांगितले आणि जपानी शहरांवर त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्याच्या प्लॅनिंगचे सूतोवाच केले. त्यावर माझे मत विचारले. माझे मत स्पष्ट होते: ‘जपान आता जवळजवळ पराभूत झाला आहे. अशा वेळी अणुबॉम्बचा वापर अमेरिकन सैन्याची हानी रोखण्यासाठीदेखील अनावश्यक आहे. शिवाय, असे महाभयंकर अस्त्र वापरून अमेरिकेने जगाला विनाकारण धक्का देऊ नये. माझ्या स्पष्टोक्तीमुळे स्टीमसन अस्वस्थ झाले होते.’ आयसेनहॉवर यांची राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द १९६१ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर याच मताचा पुनरुच्चार त्यांनी ११ नोव्हेंबर १९६३च्या न्यूजवीकमधील मुलाखतीत केला आहे.
अॅडमिरल विल्यम लेव्ही हे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन रुझवेल्ट आणि ट्रमन या दोघांचेही मुख्य सल्लागार होते. ते स्वत:चे मत सांगताना म्हणतात, ‘या पाशवी अस्त्राचा हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर वापर करण्याचा जपानविरोधी युद्धात मुळीच उपयोग झाला नाही. जपानचा आधीच पराभव झाला होता. अमेरिकेने अशा अस्त्राचा जगात प्रथम वापर करून पाशवीपणाचे नवे मानांकन घडविले आहे.’ वरील इंटरनेट साइट आणखी काही मान्यवर अमेरिकन अधिकाऱ्यांचा विरोध नोंदविते. जपानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी एखाद्या निर्जन बेटावर अणुबॉम्ब टाकून त्याची संहारक शक्ती जपानसह जगाला दाखवून द्यावी, असेही काही शास्त्रज्ञांनी सुचवले होते. पण ट्रमन यांनी कोणताही सल्ला मानला नाही. यावरून अणुबॉम्ब वापराचे कारण आता बदलल्याचे स्पष्ट होते.
ट्रमन यांनी रशियन फौजा जपानमध्ये उतरण्याआधी अणुबॉम्ब हल्ल्याचा निर्णय कृतीत उतरविला. त्यामुळे जपानवरील विजयाची माळ सोविएत रशियाच्या गळ्यात पडू नये आणि रशियाला भविष्यातही अमेरिकेची धास्ती वाटावी हे अणुबॉम्ब हल्ल्याचे खरे राजकीय कारण होते, असे मत डॉ. गेर अल्पेरोवित्झ या अमेरिकी इतिहासतज्ज्ञासह काही अभ्यासकांचे झालेले आहे. अणुबॉम्ब हल्ल्यानंतर मोजक्या दिवसांत अमेरिकेने गोळा केलेल्या डेटाचा आवाका पाहता रशियाकेन्द्री कारणालामानवी आणि इतर हानीची प्रत्यक्ष मोजदाद करण्यासाठी जिवंत प्रयोग, अशी पुस्ती जोडली पाहिजे.

Source: loksatta

चित्रभूषण’  पुरस्कार :-


••••••••••••••••••••••••••••••

● अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे  व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.
● शाल, श्रीफळ आणि ५१,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, आप्पा वढावकर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दिपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मीना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११,००० /- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● चित्रभूषण  पुरस्कार  (पुरुष विभाग )
● सन २०१५-२०१७
१) भालचंद्र कुलकर्णी - अभिनेता
२) श्रीकांत धोंगडे - कला- प्रसिद्धी
३) किशोर मिस्कीन  -  निर्माता
४)विक्रम गोखले   - अभिनेता / दिग्दर्शक  
● चित्रभूषण  पुरस्कार  (स्त्री विभाग )
● सन २०१५-२०१७
१) श्रीमती लीला गांधी -  अभिनेत्री / नृत्यांगना
२) श्रीमती सुषमा शिरोमणी  - अभिनेत्री / निर्माती / दिग्दर्शिका / वितरक

● चित्रकर्मी  पुरस्कार  विजेते
●सन २०१५-२०१७
१) रमेश साळगांवकर - दिग्दर्शक
२) संजीव नाईक   -  संकलक / निर्माता / दिग्दर्शक
३) विलास उजवणे  -  अभिनेता
४) आप्पा वढावकर  - संगीत संयोजक
५) नरेंद्र पंडीत - नृत्य दिग्दर्शक
६) प्रशांत पाताडे  - ध्वनीरेखन
७) दिपक विरकूड + विलास रानडे - संकलक
८) विनय मांडके  - गायक
९) जयवंत राऊत -  छायाचित्रण
१०) सतीश पुळेकर  -  अभिनेता
११) श्रीमती प्रेमाकिरण  - अभिनेत्री / निर्माती
१२) श्रीमती सविता मालपेकर - अभिनेत्री
१३) चेतन दळवी - अभिनेता
१४)अच्युत ठाकूर -  संगीतकार
१५) वसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक / अभिनेता

राज्य मंत्रिमंडळाची 07 ऑगस्ट बैठक पार पडली.

कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरीतील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा स्थगित करुन तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. बैठकील सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या बैठकीत पूरग्रस्त जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सोबत अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. या दहा निर्णयांवर एक नजर...

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :07 ऑगस्ट 2019

1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ.

2. सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.

3. जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर.

4. राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करुन त्यासाठी 128 पदे निर्माण करण्याबाबत.

5. केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणाबाबत.

6. गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत.

7. चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.4 अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र. 4 आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.

8. विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांबाबत.

9. तिरुपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याबाबत.

10. प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता.

✅✅एका ओळीत सारांश, 8 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉भारतातला राष्ट्रीय हातमाग दिन - 7 ऑगस्ट.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉या कंपनीने अखंडित ऑनलाइन व्यवहारांसाठी “आयडेंटिटी चेक एक्सप्रेस” या नावाचे एक वैशिष्ट्य सादर केले - मास्टरकार्ड.

👉नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनोमिक रिसर्च (NCAER) यांच्या मते, 2019-20 या वित्त वर्षात भारताची GDP वाढ – 6.2%.

👉बँकांना प्राधान्य क्षेत्रातला प्रमुख कर्जप्रदाता म्हणून वागविण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) बँकांना बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) माध्यमातून या क्षेत्रात कर्ज वाटप करण्यास परवानगी दिली - कृषी, MSME उद्योग आणि परवडणारी घरे.

👉7 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ठरविलेला नवा रेपो दर (त्याचा कर्ज दर) - 5.40%.

👉7 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) अंदाजित केलेला 2019-20 या वर्षीचा भारताचा वास्तविक किंवा महागाई याने समायोजित सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) - 6.9%.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉7 ऑगस्ट रोजी मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UNISA) याच्या 46 सदस्यांनी स्वाक्षरी केला तो करारनामा - सिंगापूर “कन्व्हेंशन ऑन मीडियेशन”.

👉पॅलेस्टिनी शरणार्थींसाठीच्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीला (UNRWA) मदत म्हणून भारताने इतकी रक्कम देऊ केली - 5 दशलक्ष डॉलर.

👉अमेरिकेच्या या नोबेल पुरस्कार विजेत्या साहित्यकाराचे, ज्यांचा 5 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू झाला - टोनी मॉरिसन.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या या व्यक्तीचे यांचे निधन - सुषमा स्वराज.

👉पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक - कांदिकुप्पा श्रीकांत.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉न्यूझीलंडच्या या माजी कर्णधाराने 5 ऑगस्ट रोजी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली - ब्रेंडॉन मेकॉलम.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉पॅलेस्टिनी शरणार्थींसाठीच्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीला (UNRWA) याचे स्थापना वर्ष - सन 1949.

👉पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन याचे स्थापना वर्ष - सन 1989.

👉मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UN Convention on International Settlement Agreements -UNISA) स्वीकारले गेले ते वर्ष – सन2018 (20 डिसेंबर).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).

👉सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) याची पहिल्यांदा मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री - विलियम पेटी (सन 1654).

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...