Tuesday, 6 August 2019

✅✅एका ओळीत सारांश, 7 ऑगस्ट 2019✅✅

✅✅एका ओळीत सारांश, 7 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉जगातली तृतीय क्रमांकाची श्रीमंत महिला - मॅकेन्झी बेझोस (36.8 अब्ज डॉलर).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉क्राइसिस कम्युनिकेशन्स आणि इंटर्नल कम्युनिकेशन्स या दोन श्रेणींमध्ये ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड 2019’ याचा विजेता - भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL).

👉भारत सरकारने तयार केलेले दोन नवे केंद्रशासित प्रदेश - जम्मू व काश्मीर आणि लडाख.

👉जेथे ‘टेकएक्स 2019’ (टेक्नॉलॉजी एक्झिबिशन) आयोजित करण्यात आले ते ठिकाण - IIT दिल्ली.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'एक्सिलन्स इन सिनेमा' हा सन्मान प्राप्त होईल तो बॉलिवूडचा अभिनेता - शाहरुख खान.

👉4 ऑगस्ट रोजी निधन झालेले ज्येष्ठ गुजराती पत्रकार - कांती भट्ट.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉ATP वॉशिंग्टन ओपन 2019 मध्ये पुरुष एकेरी गटाचा विजेता - निक किर्गीओस (ऑस्ट्रेलिया).

👉दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाने 5 ऑगस्टला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली - डेल स्टेन.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉राज्यघटनेतल्या या कलमामुळे जम्मू व काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा दिला गेला - कलम 370.

👉केंद्र सरकारच्या थेट नियंत्रणाखाली असलेला भूप्रदेश - केंद्रशासित प्रदेश.

👉दक्षिण आफ्रिका – राजधानी: केप टाउन (संविधानक); राष्ट्रीय चलन: दक्षिण आफ्रिकन रँड.

👉असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP) – स्थापना वर्ष: 1972; मुख्यालय: लंडन, ब्रिटन.

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

​🔹

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.

▪️निवडणूक न लढवण्याचा निर्णय

सुषमा स्वराज सर्वप्रथम १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. सुषमा यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण व नंतर आरोग्य मंत्रालयाची धुरा वाहिली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. सुषमा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जागतिक व्यासपीठांवर दबदबा निर्माण केला. संयुक्त राष्ट्रसंघातील सडेतोड भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियातून येणाऱ्या विविध तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथे निपटारा करून वाहवा मिळवली. सोळाव्या लोकसभेत सुषमा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दिल्लीच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

सात वेळा लोकसभेच्या खासदार राहिलेल्या स्वराज या वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदावर विराजमान झालेल्या.

▪️अवघ्या 25व्या वर्षी केंद्रीय मंत्रिपदाची धुरा

1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज केंद्रीय मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या कायम स्मरणात राहतील. 1977 ते 1979 दरम्यान समाजकल्याण, श्रम आणि रोजगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर, वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या.

राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.

देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण 11 निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

मोदी सरकार-1 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील.

✅✅एका ओळीत सारांश, 6 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉4 ऑगस्टला भारताने आपल्या क्षेपणास्त्राची एकापाठोपाठ दोनदा यशस्वी चाचणी घेतली - क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एयर मिसाईल’ (QRSAM) (25-30 कि.मी. मारा क्षमता).

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉1000 रुपयांची नोट चलनात आणण्यासंबंधीचा हा कायदा रद्द करण्यात आला – ‘उच्च परिमाण बँक नोटा (चलन अवैधता) दुरूस्ती कायदा-1998’(1999 साली लागू).

👉भारत सरकारच्या TEC याच्या मेंडेटरी टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन ऑफ टेलीकॉम ईक्विपमेंट (MTCTE) अंतर्गत TEC प्रमाणपत्र मिळविणारी पहिली कंपनी - मॅट्रिक्स टेलिकॉम सोल्यूशन्स.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉ब्रिटनच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला भारतीय प्रकल्प - ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (केवडिया, गुजरात).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 5 ऑगस्टला संसदेत जम्मू-काश्मीरमधून हे कलम हटवण्याची शिफारस मांडली - कलम 370.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉5 ऑगस्टला निधन झालेल्या मराठी चित्रपट रंगभूमीचा अभिनेता - श्रीराम कोल्हटकर.

👉70च्या दशकात इंग्लिश भाषेत क्रिकेटची कॉमेंट्री करणार्‍या या व्यक्तीचे 4 ऑगस्टला निधन झाले - अनंत सेतलवड.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉पोलंडमधील वारसॉ येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजन गटात सलग तिसरे सुवर्ण पटकाविणारी भारतीय मल्ल - विनेश फोगट.

👉थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी - सात्विकसाईराज रेनकीरेड्डी-चिराग शेट्टी.

👉आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 106 एवढे सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज - रोहित शर्मा.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा - ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (केवडिया, गुजरात) (182 मीटर).

👉आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना वर्ष: सन 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).

👉जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) - स्थापना वर्ष: सन 1934; मुख्यालय: क्वाला लंपुर (मलेशिया).

🌺🌺केंद्र सरकारने केली "काबिल" ची स्थापना🌺🌺

🔰  देशातील व्युव्हात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांचा पुरवठा व्हावा या उद्देशाने तीन केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांच्या भागभांडवलाने नुकतीच "काबिल - खनिज बिदेश इंडिया लिमिटेड" ची स्थापना केली गेली.

🔴मुख्य मुद्दे:

🔰 काबिल मध्ये खलील तीन कंपन्यांचा सहभाग आहे.
1)नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को),
National Aluminium Company Ltd.(NALCO),
2)हिंदुस्तान कॉपर लिमिटेड.
Hindustan Copper Ltd.(HCL)
3)खनिज अन्वेषण कंपनी (एमईसीएल).
Mineral Exploration Company Ltd. (MECL).

🔰 या संयुक्त उद्यम कंपनी मध्ये वरील तीन कंपन्यांचा वाटा 40:30:30 असा आहे.

📌उद्दीष्ट : देशांतर्गत बाजारपेठेला क्रिटिकल व स्ट्रॅटेजिकल खनिजांचा सतत पुरवठा करणे.

🔰 “काबिल देशाच्या खनिज सुरक्षेची हमी देईल, तर आयात प्रतिस्थानाचे सर्वांगीण उद्दीष्ट साकार करण्यासही मदत करेल,

🔰 या संयुक्त उद्यमातून लिथियम आणि कोबाल्ट सारख्या खनिजांचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल.

🔰 हे ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील खनिज समृद्ध देशांशी भागीदारी वाढविण्यात मदत करेल.

🔰 लिथियम, कोबाल्ट, टंगस्टन, व्हॅनियम आणि निकेल इत्यादींसह 12 खनिजांना सामरिक खनिजे म्हणून ओळखले गेले आहे. देशाच्या सुरक्षा आणि विकासात सामरिक खनिजे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात

🔰 “काबिल विदेशातील मोक्याच्या खनिजांची ओळख, संपादन, अन्वेषण, विकास, खाण आणि प्रक्रिया या देशातील खनिजांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरेल.

🔰 कोळसा, खाणी व संसदीय कार्यमंत्री : प्रल्हाद जोशी

स्रोत : PTI,The Hindu,BUSINESS LINE. नवभारत टाइम्स,

🍀🍀 औषधाला न जुमानणार्‍या जिवाणूंसाठी नवे पेप्टाईड🍀🍀

📌अनेक जिवाणूंनी अँटिबायोटिक्स किंवा अन्य प्रकारच्या औषधांबाबतही प्रतिकारक क्षमता विकसित केलेली आहे.

📌 औषधांनाही न जुमानणार्‍या अशा जिवाणूंवर मात करण्यासाठी आता संशोधकांनी नव्या पेप्टाईडचा शोध लावला आहे. हे पेप्टाईड अ‍ॅसिनेटोबॅक्टर बाऊमानी बॅक्टेरियाचाही मुकाबला करू शकते.

📌अमिनो अ‍ॅसिडच्या छोट्या मालिकेला 'पेप्टाईड' असे म्हटले जाते.

📌अनेक पेप्टाईड मिळून एक प्रोटिन तयार होते. पेप्टाईडबाबत आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीचा वापर करून बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी 'ओमेगा 76' नावाच्या नव्या पेप्टाईडचे कॉम्प्युटर अ‍ॅल्गोरिदमच्या मदतीने डिझाईन बनवले आहे.

📌हे जीवाणूरोधक पेप्टाईड जिवाणूची पेशी भित्ती भेदून त्याला नष्ट करते.

📌 एका संक्रमित उंदरावर 'ओमेगा 76' चे परीक्षण करण्यात आले व त्यामध्ये ते अतिशय परिणामकारक असल्याचे दिसून आले.शिवाय, त्याचा कोणताही दुष्परिणामही आढळला नाही.

६ ऑगस्ट १९४५ :- हिरोशिमाचा अग्निप्रलय

आजचा दिनविशेष

६ ऑगस्ट १९४५ :- हिरोशिमाचा अग्निप्रलय

६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या ठाण्यावर जगातील पहिला अणुबॉंब टाकला. हा बॉंब वाहून नेणार्‍या वैमानिकाचे नाव कर्नल पॉल डब्ल्यू. टिबेट्स आणि बॉंब टाकणारा मेजर थॉमस डब्ल्यू. फ़ीअरबी. अणुबॉंब म्हणजे नेमके काय? हे वैमानिक आणि प्रमुख अधिकारी पॉल टिबेट्‌स यालाही माहिती नव्हते. या अणुबॉम्ब हल्ल्यांचे सांकेतिक नाव "लिटल बॉय" असे होते. मात्र हे लिटल बॉय जपान आणि माणुसकीला खोल जखम देऊन गेला.लिटल बॉयला दुस-या महायुध्‍दाच्या वेळी अमेरिकेतील मॅनहॅट्टन प्रकल्पांतर्गत लॉस अलामोसमध्‍ये बनवण्‍यात आला होता.

किती पॉवरफुल होता 'लि‍टल बॉय'? 
जवळजवळ ४ हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी ३ मीटर आणि व्यास ७१ सेंटिमीटर होते. या बॉम्बने आपली विस्फोटक क्षमता युरेनियम -२३५ च्या आण्विक विखंडन प्रक्रियेतून प्राप्त केले होते. तिची विध्‍वंसक क्षमता १३-१८ किलोटन टीएनटी (ट्रायनायट्रोटालूईन) च्या बरोबरीचे होते.या महासंहारक अस्त्राचा जपानवर वापर करू नये, त्या राष्ट्राला त्याची माहिती द्यावी आणि शरण आणावे असे हे अस्त्र निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पण, अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ट्रूमन यांनी ते काही ऐकले नाही. अमेरिकन हवाई दलाला, जपानवर अणुबॉंब फेकायचा आदेश त्यांनी दिला.

"जपान" हे नक्की झाल्यावर कुठल्या शहरावर अणुबॉम्ब टाकायचा हे हि ठरवायचे होते. इथे तेव्हाच्या अमेरिकेचा अतिशय क्रूरपणा दिसतो. अणुबॉम्बचे नक्की काय आणि किती दुष्परिणाम होतात हे अजून जगाला माहित व्हायचे होते. या परिणामांचा "नीट अभ्यास करण्यासाठी" अशी शहरे हवी होती जिथे साधारण ३ माइल्स म्हणजे ४.८ किमीच्या परिघात नागरी वस्ती दाट आहे. अशा ठिकाणी बॉम्ब टाकल्यावर त्याची विनाशकारी क्षमता नीट अभ्यासता येईल असे त्यांचे म्हणणे होते. अणुबॉम्बचे परिणाम व्यवस्थित अभ्यासता यावे म्हणून या महत्वाच्या शहरांवरचे इतर बॉम्ब हल्ले बंद करण्यात आले. एप्रिल, मे मध्ये आधी हिरोशिमा, क्योतो, योकोहामा, कोकुरा अशी शहरे त्यांनी निवडली. नंतर पुन्हा एकदा चर्चा वगैरे होऊन २५ जुलै रोजी हिरोशिमा, कोकुरा, नीइगाता, आणि नागासाकी अशी चार शहरे नक्की करण्यात आली. कदाचित टोकियोचे नाव नसण्याचे कारण म्हणजे टोकियोमध्ये अमेरिकेचे युद्ध कैदी होते हे असावे. २ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर सगळ्यात आधी बॉम्ब टाकण्यात येण्याचे नक्की केले गेले आणि तशी 'ऑफिशिअल ऑर्डर' निघाली.

सकाळी ८:१५ मिनिटांनी "एनोला गे"ने ९४००मी उंचीवरून अणुबॉम्ब 'आइओई'च्या 'टी' ब्रिज वर टाकला.त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या २००० फूट उंचावर झाला. जास्तीत जास्त परिणामांसाठी बॉम्ब तसा हवेतच फुटणे जरुरी होते, त्यामुळे तो तसाच तयार केला गेला होता. काही मायक्रो सेकंदातच न्युक्लीअर चेन रिअक्शन्स चालू झाल्या. फ़ार मोठा स्फ़ोट होवून ४०००० फ़ुटांवर धुराचे लोट उठत राहिले.१७० मैलांपर्यंत त्याचा धडाका जाणवला. (मुंबई ते पुणे अंतर १०० मैल आहे त्यामुळे १७० मैलाचा अंदाज यावा) बॉंब पडला त्या १ मैलाच्या परिघात एकही माणूस जिवंत राहिला नाही. माणसे उभ्या जागेवर विरून गेली. उरल्या त्या त्यांच्या सावल्या. भिंतीवर, दगडावर, आणि चपलांवर उमटलेल्या. लोखंडाचे दरवाजेच्या दरवाजे वाकले. टाईल्स, घरातली क्रोकरी, काचेच्या वस्तू चक्क वितळून एकमेकाला चिकटून गेल्या. या वस्तुंची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही.अशा प्रकारचे अस्त्र प्रथमच वापरले गेले असल्याने नक्की काय झालेय हे ही कळत नव्हते. "अनेक बॉंब एकाच वेळेस फ़ोडले गेले आहेत" अशी भाबडी समजूत त्यांनी करून घेतली होती. लोकांनी सूर्यापेक्षा प्रखर तेजाचा गोळा फ़ुटून निघावा असा प्रकाश क्षणभर पाहिला. ३ लाख लोकांचे डोळे दिपून गेले.प्रकाश एवढा प्रखर होता की ३ लाख लोकांना त्या प्रकाशाने कायमचे अंधत्व आले.प्रकाशाची लाट सर्वत्र दिसत होती.१०००० सेंटीग्रेडची भयानक उष्णता पुष्कळांचे प्राण घेण्यास समर्थ ठरली.या भीषण लाटेचा दिड-दोनशे फ़ूट उंचीचा एक तप्त कोनच सर्वांचा पाठलाग करीत होता.एका क्षणामध्ये ६०००० लोक एकदम मरण पावले.यानंतर वार्‍याचे प्रचंड झोत सुरू झाले.या सपाट्यात सुमारे ३ लाख लोक कोलमडून पडले. या महासंहारातून वाचलेले एक लाख लोक तीन दिवसात किरणोत्सर्गाच्या आणि आगीच्या जखमांनी टाचा घासून मेले. जे जगले ते अनंत यातना भोगत मरणाची वाट पहात राहिले.

नंतर झालेल्या पावसाच्या थेंबांनी लोकांना बरे वाटले पण तोही भ्रमच ठरला.कारण किरणोत्सारी द्रव्यांनी ते थेंब विषारी झाले होते.स्फ़ोटात होरपळलेल्या लोकांनी हे काळेशार पाणी पिताच त्यांची शरीरे आतून जळाली. अग्निप्रलयापेक्षा हा ५ मिनिटांचा पाऊस अधिक भयानक होता.

मृत्यू :- ७८,१५०

बेपत्ता:- १३,९८३

जखमी:- ३७,४२४

इतर प्रकारची इजा:- २,३५,६५६

एकूण :- ३,६५,२१३

जपान्यांच मात्र कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खरंतर जपानी मिलिटरीला हिरोशिमामधल्या स्​फोटाच्या तीव्रतेचा अंदाज यायलाही आणि बाहेरून मदत मिळायलाही काही तास गेले.पण तरी बॉम्बस्फोट झाल्यानंतरच्या काही तासात मदत कार्य वेगाने चालू झाले. हिरोशिमाताल्याच जगल्या वाचलेल्या लोकांनी रस्ते आणि दळणवळण नीट करायचे प्रयत्न सुरु केले. चक्क दुसऱ्या दिवसापासून त्यांनी काही भागातला वीजपुरवठा सुरळीत केला. स्फोटापासूनच्या तीन दिवसात शहराच्या बरयाच भागात ट्राम सर्विस चालू झाली.जिवंत असलेल्या सहकार्यांच्या अथक परिश्रमाने दुसऱ्या दिवशी 'उजीनो' नावाची एक ट्रेन लाईन चालू झाली आणि आठ तारखेला दुसरी ट्रेन लाईनही चालू झाली. या जागी पुढची ७५ वर्षे काहीही उगवणार नाही असे बोलले जात असताना ऑटममध्ये काही ठिकाणी जमिनीतून फुटलेल्या अन्कुरांमुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. पीस म्युझियमच्या बाहेर असलेले आसागिरीचे एक झाडही असेच आतून जळून गेलेले पण त्यालाही पालवी फुटली. या निसर्गाने केलेल्या चमत्कारामुळे लोकांना जगण्याची उमेद मिळाली. हिरोशिमामध्ये आज इतक्या वर्षांनी या घावाची कुठलीच दृश्य खुण दिसत नाही. इतकी तत्परता भारतातील राजकारणी कधी दाखवतात का?

संकलित

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...