Monday, 5 August 2019

✅✅एका ओळीत सारांश, 5 ऑगस्ट 2019✅✅

✅✅एका ओळीत सारांश, 5 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉जागतिक स्तनपान आठवडा 2019 (1 ते 7 ऑगस्ट) याचा विषय – एमपॉवर पेरेंट्स. एनेबल ब्रेस्टफीडींग.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉3 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) फसवणूकीचा अहवाल देण्यासंबंधित RBIच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातल्या या चार बँकांवर दंड आकारला - SBI (50 लक्ष रुपये), PNB(50 लक्ष रुपये), बँक ऑफ बडोदा (50 लक्ष रुपये), ऑरींएंटल बँक ऑफ कॉमर्स (1.5 कोटी रुपये).

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या शहरात प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) आंतरसत्रीय मंत्री परिषदेची 8 वी बैठक पार पडली - बिजींग, चीन.

👉मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी 2019 - नाझ जोशी (भारताची लिंगबदल केलेली महिला).

👉बँकॉकमध्ये झालेल्या जागतिक शालेय वादविवाद स्पर्धा 2019 यामध्ये पहिले स्थान - भारतीय संघ (तेजस सुब्रमण्यम - जगातला उत्तम वक्ता).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉2013 साली मानद ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या या व्यक्तीचा 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला - डॉन अॅलनपॅनेबॅकर.

👉‘ओ सीता कथा’ या तेलगू चित्रपटाच्या या अभिनेत्याचे 2 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले - देवदास कनकला.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉चेन्नईत ‘ईनोह-आयसोल्यूशन पुरुष AITA रँकिंग स्पर्धा 2019’ या टेनिस स्पर्धेच्या एकेरी अंतिममधील विजेता - मोहम्मद फहाद.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) याचे स्थापना वर्ष – सन 2012.

👉जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था असलेला जगातला सर्वात मोठा आर्थिक गट - प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP).

👉अखिल भारतीय टेनिस संघ (AITA) याचे स्थापना वर्ष – सन 1920.

👉भारतीय स्टेट बँक (SBI) याचे स्थापना वर्ष – सन 1955 (1 जुलै).

काश्मीर प्रकरण : घटनेतून कलम ३७० हटवण्याची शिफारस

​🔹

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मीरच्या विषयावर निवेदन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला.

केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा होता. प्रस्तावानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती असे अमित शाह म्हणाले. अमित शाह यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी आहे.

जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्य सभेत मांडला आहे. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीर यांचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे.

काश्मीरच्या विषयावर आम्ही चार विधेयके मांडणार आहोत. आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास आणि प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्यास तयार आहोत असे अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी काश्मीरमध्ये लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राज्यसभेत एकच गदारोळ सुरु झाला. केंद्र सरकार कलम ३५ अ मध्ये बदल करण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

मागच्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैद करण्यात आले.

▪️काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० आहे तरी काय?

भारतीय घटनेनुसार जम्मू काश्मीरचं स्वतंत्र संविधान आहे. केंद्र सरकार आणि काश्मीरचे राजे हरिसिंह यांच्यात २६ ऑक्टोबर १९४७ रोजी विलीनीकरणाचा करार झाला

३७० कलमानुसार जम्मू काश्मीरला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. परराष्ट्र, अर्थ, संरक्षण आणि दूरसंचार वगळता इतर विभागांमध्ये केंद्राचा कायदा लागू करण्यास राज्य सरकारची संमती कलम ३७० नुसार आवश्यक असते

कलम ३७० नुसार, भारताचा नागरिक काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकत नाही, एवढंच नाही तर दुसऱ्या राज्यातला नागरिक या ठिकाणी मालमत्ता विकत घेऊ शकत नाही. जम्मू काश्मीरच्या महिलेने जर इतर राज्यातल्या मुलाशी लग्न केले असेल तर त्यालाही या ठिकाणी जमीन खरेदीचा अधिकार नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे कलम काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं आहे

या कलमानुसार, भारतीय राज्यघटनेचे कलम ३६० देखील जम्मू काश्मीरवर लागू होत नाही, भारतातील इतर राज्यांमध्ये लागू होणारे कायदेही या राज्यात लागू होत नाहीत

▪️कलम ३७० हटवल्याने काय होईल?

कलम ३७० हटवलं गेल्यास जम्मू काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नाही

एखादा नवा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारच्या संमतीची आवश्यकता नसेल

३७० कलम हटवल्याने संपत्ती खरेदीचा गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल

आता केंद्र सरकार काय करणार ते पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरचा प्रश्न भिजत पडला आहे. त्यावर तोडगा म्हणून त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. राज्यसभेतली या विषयावरची चर्चा वादळी ठरते आहे यात काहीही शंकाच नाही. मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणून याकडे पाहिलं जातं आहे. कारण या सगळ्याबाबत मोदी सरकारने कमालीची गुप्तता बाळगली होती.
--------------------------------------------------

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार जम्मू काश्मीरसंदर्भातील कलम 370 हटवण्यात आलं आहे. काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये होण्यासंदर्भात विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं आहे

🔰🔰.🔰🔰

आतापर्यंत काय काय घडलं?
जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेला
अमित शहा यांनी जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेसंदर्भात प्रस्ताव
जम्मू काश्मीर राज्य दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्याचा प्रस्ताव
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधिमंडळ असेल
लडाख या केंद्रशासित प्रदेशात विधिमंडळ नसेल
शिवसेना, बसप आणि बीजू जनता दलचा विधेयकांना पाठिंबा
रालोआचा घटकपक्ष असलेल्या जेडीयूचा विरोध

अमित शहांनी मांडलेली 4 विधेयकं अशी आहेत
1) कलम 370 हटवणे.

2) जम्मू काश्मीर मधलं आरक्षण धोरण बदलणे.

3) कलम 35A हटवणे.

4) जम्मू काश्मीरचे 2 केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करणे.

याविषयी अधिक वाचण्यासाठी इथं क्लिक करा

भारतानं धोकादयक खेळ खेळल आहे - पाकिस्तान
"प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यांच्यावर दूरगामी परिणाम होईल असा धोकादायक खेळ भारताने खेळला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या सहकार्याने काश्मीरप्रश्नी तोडगा काढू पाहत होते. परंतु भारताने प्रश्नाचा तिढा सोडवण्याऐवजी चिघळवला आहे. पाकिस्तान काश्मिरी बांधवांच्या पाठिशी आहे. त्यांना आम्ही कधीही परकं करणार नाही. राजकीयदृष्ट्या आणि मुत्सदीदृष्ट्या आम्ही काश्मीरवासीयांना पाठिंबा देऊ. काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय मुस्लीम समुदायाने भारताचा निषेध करावा असं आवाहन केलं आहे," असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलंय.

बलुचिस्तान ताब्यात घ्या - संजय राऊत
या मुद्द्यावर चर्चा करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीर आणि बलुचिस्तानच भारतानं ताब्यात घेण्याची मागणी करून टाकली आहे.

जम्मू काश्मीरची स्वायत्तता समाप्त
कलम 370 मुळे काश्मीरचं स्वतःचं संविधान होतं. त्यामुळेच सुरक्षा आणि परराष्ट्र मंत्रालयाचे विषय सोडून इतर सर्व विषयांवर निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार होता. संविधानातून हे कलमच हटल्यामुळे काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेला आहे. 1947 मध्ये स्वायत्तता मिळण्याच्या अटीवरच काश्मीर भारतात विलीन झालं होतं.

पण हे कलम 370 काय आहे हे वाचवण्यासाठी इथं क्लि करा.
यासह कलम 35A सुद्धा संविधानातून काढून टाकण्यात आलं आहे. हे कमल नेमकं काय आहे हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

काश्मीरी नेत्यांना विश्वासात घेणं गरजेचं - शरद पवार
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर खोऱ्यात नेमकी काय प्रतिक्रिया उमटेल हे सांगता येत नाही, आपण शांतता राहील याची अपेक्षा करू या, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन
विरोध करणाऱ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेऊन याकडे पाहावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असंही ठाकरे यांनी म्हटलंय.

🔗 Article ३७० जम्मू काश्मीर 🔗

जम्मू काश्मीर राष्ट्रपती वटहुकूम

जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्य दर्जा काढून वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..

लडाख वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..
दुहेरी नागरीकत्व नाहीसे, कोणीही भारतीय व्यवसाय, जमीन खरेदी करू शकेल.

Article ३६७ मध्ये बदल केला आहे.