Thursday, 1 August 2019

Current affairs

⚡️लंडन: विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर

ब्रिटनमधील क्वाकलरी सायमंड्स (QS) या संस्थेकडून ‘बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ ही नवीन जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

✍अहवालानुसार,

🔸ब्रिटनची राजधानी लंडन हे शहर सलग दुसर्‍या वर्षी विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर ठरले आहे.

🔸प्रथम दहा सर्वोत्तम शहरांमध्ये अनुक्रमे लंडन (ब्रिटन), टोकियो (जपान), मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), म्युनिच (जर्मनी), बर्लिन (जर्मनी), मॉन्ट्रियल (कॅनडा), पॅरिस (फ्रान्स), झ्यूरिच (स्वित्झर्लंड), सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि सोल (दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे.

🔸बेंगळुरू हे विद्यार्थ्यांसाठी भारतातले सर्वोत्तम शहर ठरले आहे, जे जागतिक पातळीवर 81 या क्रमांकावर आहे. परवडण्याच्या दृष्टीने बेंगळुरू जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकावर आहे. अन्य सर्वोत्तम भारतीय शहरांमध्ये मुंबई (85), दिल्ली (113) आणि चेन्नई (115) यांचा समावेश आहे.

ही यादी तयार करण्यासाठी सहा घटकांचा विचार केला गेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची शहरातली लोकसंख्या, जीवनशैलीतली गुणवत्ता, पदवी नंतर उपलब्ध नोकरीच्या संधी, परवडण्याजोगे आणि विद्यार्थ्यांचा अभिप्राय या घटकांचा समावेश आहे.

Current affairs

📌 NASAची प्रथम महिला अंतराळवीर जेरी कॉब यांचे निधन

अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेची प्रथम महिला अंतराळवीर ठरलेली जेरी कॉब यांचे दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या.

जेरी कॉब ह्या 1961 साली अंतराळवीर बनण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करणार्‍या प्रथम महिला होत्या.

कॉब ह्यांनी अनेक दशके अॅमेझोनच्या जंगलामध्ये मदत पोहचविण्यासाठी विमानचालक म्हणून काम केले होते.

मुस्लिम महिला अधिकार संरक्षण(तिहेरी तलाक) विधेयक 2018

• लोकसभेत 303  विरुद्ध 82 मतांनी मंजूर (25 जुलै 2019)

• राज्यसभेत 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर (30 जुलै 2019)

✅ कायद्यातील तरतुदी

1. पतीस 3 वर्ष कैद व दंड
2. तलाकपीडित स्त्री व अपत्यांसाठी निर्वाह भत्यास पात्र
3. खटला तडजोडीने मिटवणे शक्य
4. 19 सप्टेंबर 2018 पासून जम्मू अँड काश्मीर वगळता भारतभर लागू
5. गुन्हा अजामीनपात्र मात्र, दंडाधिकारी जामीन देऊ शकणार

सीएट इंटरनॅशनल क्रिकेट पुरस्कार 2019:-

● जीवनगौरव पुरस्कार – मोहिंदर अमरनाथ
● आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फलंदाज – विराट कोहली
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज – जसप्रीत बुमराह
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कसोटीपटू – चेतेश्वर पुजारा
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू – रोहित शर्मा
● आंतरराष्ट्रीय टी-२० सर्वोत्तम क्रिकेटपटू – ऍरॉन फिंच
● उल्लेखनीय कामगिरी – कुलदीप यादव
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम टी २० गोलंदाज – रशीद खान
● देशांतर्गत सर्वोत्तम खेळाडू – आशुतोष अमन
●आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – स्मृती मंधाना
● सर्वोत्तम युवा (कनिष्ठ) क्रिकेटपटू – यशस्वी जैस्वाल
● क्रिकेट पत्रकारिता पुरस्कार – श्रीराम वीरा आणि स्नेहल प्रधान
● विशेष मानवंदना – स्व. अजित वाडेकर

आशियाई विकास बँक (ADB) #Bank
ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.

“फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.

✅✅चालू घडामोडी,2 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) या स्वरुपात रूपांतरीत करण्याच्या निर्णय टपाल विभागाने घेतला - लघू वित्त बँक.

👉जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2018 साली भारत 2.73 लक्ष कोटी डॉलरची अर्थव्यवस्था झाली आणि आता ती जागतिक स्तरावरील या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली गेली - सातवी.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘QS बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ यानुसार, विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर – लंडन(ब्रिटन).

👉पश्चिम आफ्रिकेच्या या देशात कौशल्य विकास आणि कॉटेज उद्योग प्रकल्पांना पाठिंबा म्हणून 31 जुलै रोजी भारताने 500,000 डॉलरची मदत दिली - गॅम्बिया.

👉या ठिकाणी आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) परराष्ट्र मंत्री शिखर परिषद 2019 भरविण्यात आली - बँकॉक (थायलंड).

👉हा देश जुलै 2020 मध्ये मंगळ ग्रहावर अरबी जगतातले पहिले अंतराळ यान 'होप प्रोब' पाठवविणार आहे – संयुक्त अरब अमिरात (UAE).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘QS बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ यानुसार, विद्यार्थ्यांसाठी भारतातले सर्वोत्तम शहर – बेंगळुरू(जागतिक पातळीवर 81 वा).

👉31 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतराळाचा शांततापूर्ण हेतूंसाठी वापर करण्यासाठी सहकार्यासाठी भारत आणि या देशादरम्यान झालेल्या सामंजस्य करारास मान्यता दिली - बहरीन.

👉नवी दिल्ली येथे 1 ते 4 नोव्हेंबर 2019 या काळात आयोजित केल्या जाणार्‍या ‘वर्ल्ड फूड इंडिया (WFI) 2019’ या कार्यक्रमाचा भागीदार राज्य - जम्मू वकाश्मीर.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉30 जुलै रोजी अमेरिकेत निधन झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (IMF) भारताचे कार्यकारी संचालक असलेल्या व्यक्तीचे नाव - डॉ. सुबीर विठ्ठल गोकर्ण.

👉अर्थ मंत्रालयाचे नवे सचिव - राजीव कुमार.

👉हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (बेंगळुरू) याचे नवे संचालक (ऑपरेशन्स) – एम. एस. वेल्पारी.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉ICCने 2019-20 च्या हंगामासाठी नेमण्यात आलेल्या अमिराती ICC एलिट पॅनेलच्या दोन नवीन पंचांची नावे - मायकेल गफ (इंग्लंड) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडीज).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) याचे - स्थापना वर्ष: सन 1967; आणि मुख्यालय: जकार्ता (इंडोनेशिया).

👉आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) – स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका).

👉आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना वर्ष: सन 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).

👉गाम्बिया - राजधानी: बंजूल; राष्ट्रीय चलन: डलासी.

👉बहरीन - राजधानी: मनामा; राष्ट्रीय चलन: बहरैनी दिनार.

👉जागतिक बँक - स्थापना वर्ष: सन 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी (अमेरिका).

📚 *चालू घडामोडी (01/08/2019)*📚


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *लाहोर येथील बायोमेकॅनिक्स लॅबला ICC ची मान्यता.*

◆ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) पाकिस्तान देशातल्या लाहोर या शहरात पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) उभारण्यात आलेल्या “बायोमेकॅनिक्स लॅब” याला मान्यता दिली.

◆ पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) संशयास्पद वाटणारी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक तपास केंद्र म्हणून “बायोमेकॅनिक्स लॅब” उभारलेली आहे.

◆ ही प्रयोगशाळा लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) येथे उभारण्यात आली आहे आणि ICC या संस्थेद्वारे मान्यता देण्यात आलेली पाचवी बायोमेकॅनिक्स लॅब आहे.

◆ या ठिकाणी इतर मान्यताप्राप्त केंद्रासारखी प्रगत उपकरणे आणि सॉफ्टवेअर आहेत. या ठिकाणी तीन मापदंडांच्या अंतर्गत माहिती तयार करण्यास सक्षम असलेली किमान 12 हायस्पीड कॅमेरासह मोशन अनॅलिसिस सिस्टम बसविण्यात आली आहे.

◆ शाहरीर खान PCBचे अध्यक्ष असताना 2015-16 या वर्षी प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या बेकायदेशीर गोलंदाजीची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे*

◆ आंध्र प्रदेशच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे.

◆ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत याबाबत माहिती दिली. गोवा सरकारकडून सवलती घेणाऱ्या सर्व उद्योगांना नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देणं बंधनकारक राहील, असेही सावंत यांनी यावेळी नमूद केले.

◆ राज्यातील सर्व कंपन्या व कारखान्यांनी सरकारकडे नोंदणी करावी तसेच कर्मचाऱ्यांचा तपशील सादर करावा, असे नमूद करतानाच पुढील सहा महिन्यांत राज्याच्या कामगार व रोजगार धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

◆ भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या ८० टक्के नोकऱ्यांपैकी ६० टक्के नोकऱ्या कायमस्वरूपी असाव्यात, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले आहे.

◆ काँग्रेस आमदार अॅलिक्सो लोरेन्को यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना खासगी नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षणाचा मानस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला. सरकारचं नवं धोरण अमलात येताच भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या देणे उद्योगांना बंधनकारक होईल, असे सावंत म्हणाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *गुगल, फेसबुकवर सरकार डिजिटल टॅक्स लावण्याच्या तयारीत ?

◆ या कंपन्यांना भारतातून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो.

◆ केंद्र सरकार गुगल, फेसबुक आणि ट्विटरसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याचा विचार करत आहे.

◆ यासाठी वार्षिक 20 कोटी रूपयांचे उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लागण्याची शक्यता आहे.

◆ गेल्या वर्षी सरकारने ‘सिग्निफिकंट इकोनॉमिक प्रझेन्स’ची (एसइपी) कॉन्सेप्ट आणली होती. परंतु यावर अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. ‘सिग्निफिकंट इकोनॉमिक प्रझेन्स’नुसार कोणतीही कंपनी भारतातून नफा कमवत असेल तर त्याला कर भरणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

◆ या कॉन्सेप्टनुसारच केंद्र सरकार आता देशात नफा कमावणाऱ्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याचा विचार करत आहे. सध्या अनेक देशांमध्ये ‘सिग्निफिकंट इकोनॉमिक प्रझेन्स’बाबत चर्चा सुरू आहेत.

◆ युरोपियन युनियन अशा डिजिटल कंपन्यांवर 3 टक्के कर लावण्याचा विचार करत आहे. तर फ्रान्ससारख्या देशाने आपला नवा नियम तयार केला आहे. जर हा नियम पारित झाला, तर परदेशी डिजिटल कंपन्यांनाही देशांतर्गत कंपन्यांप्रमाणे 30 टक्के कर द्यावा लागेल.

◆ दरम्यान, गुगल, फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्यांना भारतातून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. परंतु त्या नफ्यातला मोठा वाटा या कंपन्या आपल्या परदेशातील सहकारी कंपन्या किंवा मूळ कंपन्यांना पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

◆ यापूर्वी आयकर विभागाने गुगलविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली होती. आता सरकार लवकरच येणाऱ्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये या कराचा समावेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✅✅चालु घडामोडी,1 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉29 जुलै 2019 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमण्यात आलेले संचालक - अतनू चक्रवर्ती.

👉उद्योग व अंतर्गत व्यापार जाहिरात विभागाच्या ‘वार्षिक अहवाल 2018-19’ याच्यानुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूकीची (FDI) नोंद झाली, जी – 64.37 अब्ज डॉलर होती.

👉अमेरिकेच्या Mad*Pow या धोरणात्मक सल्लागार संस्थेला खरेदी करणारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली भारतीय कंपनी - टेक महिंद्रा.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत प्रथम स्थान - सॅन फ्रान्सिस्को बे एरिया (अमेरीका).

👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत आशियामध्ये अग्रस्थान - सिंगापूर (21 वा).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत भारतातले अव्वल ठरलेले शहर – बेंगळुरू (कर्नाटक) (जागतिक: 43 वे आणि आशियात 7 वे).

👉8 आणि 9 ऑगस्ट 2019 रोजी 22 वी ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2019’ आयोजित करण्यात येत असलेले ठिकाण - शिलाँग, मेघालय.

👉‘ग्राहक संरक्षण विधेयक-2019’ याच्या अंतर्गत केंद्र सरकारला ही संस्था स्थापन करण्याविषयी तरतूद आहे - केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA).

👉या ठिकाणी ‘डोंगराळी लसूण (कोडाईकनाल मलाई पुंडू) या नावाने प्रसिद्ध असलेल्या लसणाला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला - कोडाईकनाल (तामिळनाडू).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉30 जुलै रोजी निधन झालेले माजी RBI गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ - सुबीर गोकर्ण.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉30 जुलै 2019 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करणारा भारताचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कर्णधार - वेणुगोपाल राव.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात येणार असलेली संस्था - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), पुणे.

👉पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातल्या मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्प - आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी.

👉मंजुरी देण्यात आलेला महाराष्ट्र राज्यातला पहिला हायपरलूप प्रकल्प - मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी).

👉“विधानगाथा” या पुस्तकाचे लेखक - हर्षवर्धन पाटील (माजी संसदीय कार्य मंत्री).

👉गुन्हेगारांच्या जैविक वैशिष्ट्यांची एकत्रित माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देणारी ॲम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली वापरणारे भारतातले पहिले राज्य – महाराष्ट्र.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले गव्हर्नर - सर ओसबोर्न स्मिथ (1935 - 1937).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).

👉मेघालय राज्याची राजधानी - शिलाँग.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...