Monday, 22 July 2019

चांद्रयान 2 अवकाशात झेपावले


---------------------------------------------------
📌 इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज (दि.22) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी 'चांद्रयान-2' चे प्रक्षेपण केले.

📌 संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले 'चांद्रयान-2' यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी जल्लोष केला.

🔵चांद्रयान कसं आहे?
------------------------------------------------

▪ चांद्रयानाचे ऑर्बिटर, लँडर आणि सहाचाकी रोव्हर असे तीन भाग असतील.

▪ लँडरचं नाव 'विक्रम' असे ठेवण्यात आले आहे.

▪ रोव्हरचे नाव 'प्रग्यान' असे ठेवण्यात आले असून हे सर्व भाग इस्रोने तयार केले आहेत.

▪ ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहील.

✅ मोहीम कशी असेल?
------------------------------------------------
▪ चंद्रापासून 30 किलोमीटरवर गेल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येईल.

▪ भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यशस्वी झाल्यास भारत जगातला चौथा देश ठरणार आहे.

▪ पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर इतके आहे.

▪ चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील.

▪ चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल.

▪ त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल.

▪ त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल.

▪ लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल.

▪ रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल.

▪ यानंतर पुढील 15 मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.

▪️चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

◼️रितु करिधल आणि एम.वनिता
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच चांद्रयान -२ सारख्या
महत्वपूर्ण मोहिमेचे नेतृत्व करणा-या
या भारतीय महिला शक्तीला सलाम!