२० जुलै २०१९

भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् -  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान

46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

म्हणी व अर्थ ----

म्हण - आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.

अर्थ - दुसऱ्यांनी केलेल्या बारीक-सारीक चुका दिसतात, परंतु आपल्या हातून कितीही मोठी चूक झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे.

म्हण - आलीया भोगासी असावे सादर.

अर्थ - आपल्या कर्मात जे काही लिहिले आहे त्यानुसार भोगावे लागते, त्याबद्दल कुरकुर करु नये.

म्हण - आहेर नारळाचा गजर वाजंत्र्याचा.

अर्थ - लहानसे काम करुन त्याचा गाजावाजा मोठ्याने करायचा.

🔶🔶Synonyms🔶🔶


✳️Economical ,  frugal , thrifty

🔶Extravagant , lavish , wasteful , excessive

✳️False , untrue

🔶Fatal , lethal , mortal , deadly

✳️Enthusiasm - zeal , eagerness , fervour , passion

🔶Eradicate , uproot , destroy , remove

♻️ ठिकाण – विशेष नाव ♻️


______________

• काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.

• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.

• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.

• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.

• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.

• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.

• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
______________________________

◼️उत्तराखंड: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना राबविण्यात सर्वोत्तम ठरलेले राज्य

भारत सरकारची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्तराखंड राज्य हे देशातल्या पाच सर्वोत्तम कामगिरी दर्शविणार्‍या राज्यांपैकी एक ठरले आहे. जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या (SRB) बाबतीत उत्तराखंडने सर्वोत्तम कामगिरी दर्शविलेली आहे.

उत्तराखंडच्या व्यतिरिक्त, हरियाणा राज्याने जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या बाबतीत सातत्यपूर्ण कामगिरीसाठी एक राज्यस्तरीय आणि दोन जिल्हास्तरीय पुरस्कारांसह एकूण तीन पुरस्कार जिंकले आहेत. हरियाणाच्या भिवानी आणि महेंद्रगड या दोन जिल्ह्यांनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवलेत.

सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तर सरासरीने 161 जिल्ह्यांमध्ये वाढले असून ते प्रमाण सन 2015-16 मधील 909 मुली (प्रत्येक 1000 मुलांमागे) यावरून सन 2018-19 मध्ये 919 मुली एवढे होते.

❇️‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ (मुलगी वाचवा मुलगी शिकवा) (BBBP) हया उपक्रमाचा शुभारंभ हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी झाला. या उपक्रमात बाल लिंग गुणोत्तरात (child sex ratio) होणारी घसरण तसेच महिला सक्षमीकरण संदर्भातल्या मुद्दयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

◼️कार्यक्रमाची उद्दिष्टे -

🔸पक्षपाती लिंग निवड प्रक्रियेचे उच्चाटन करणे.

🔸मुलींचे अस्तित्व आणि संरक्षण याची खात्री करणे.

🔸मुलींच्या शिक्षणाची खात्री करणे.

‘पूर्वग्रह व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा-1994' कायद्याची अंमलबजावणी, देशभर जनजागृती आणि सल्ला ही मोहीम राबवणे तसेच बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्‍या 100 जिल्ह्यांमध्ये बहु-विभागीय उपाययोजना करणे यांचा पहिल्या टप्प्‍यात समावेश आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात प्रशिक्षण, जनजागृती यामध्ये वाढ करणे तसच सामुहिक एकत्रीकरण याद्वारे समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते, लाडली लक्ष्मी, मुलींसाठी शाळेचा शुल्क माफ, मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत प्राधान्य, ‘सर्वांना घर’ योजनेच्या अंतर्गत अनुदान, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत विनामूल्य LPG जोडणी आणि अन्य अश्या विविध योजना राबविल्या जातात.

​🔹भारतातली जागतिक वारसा स्थळे

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.

आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

▪️सांस्कृतिक

1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

17) हमायूनची कबर, दिल्ली

18) खजुराहो, मध्यप्रदेश

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

21) कतुब मिनार, दिल्ली

22) राणी की वाव, पटना, गुजरात

24) लाल किल्ला, दिल्ली

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

29) जतर मंतर, जयपूर

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

▪️नसर्गिक

1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

▪️मिश्र

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

▪️UNESCO बाबत

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

चालु घडामोडी वन लाईनर्स , १८ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१८ जुलै २०१९ .

● १८ जुलै २०१९ : Nelson Mandela International Day

● ३० वी जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धा इटलीमध्ये पार पडली

● ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेत जपानने ८२ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले

● ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेत भारताने ०४ पदकांसह २९ वे स्थान पटकावले

● इंझमाम-उल-हक यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य निवडक पदावरून राजीनामा दिला

● केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी दिली

● अॅमेझॉनने आयआयटी-जेईई परीक्षेच्या तयारीसाठी " जेईई रेडी " अॅपचे अनावरण केले

✅ ब्रँड फायनान्सने २०१९ मधील भारतातील १०० सर्वात मूल्यवान ब्रँडसची यादी जाहीर केली

● २०१९ मधील भारतातील १०० सर्वात मूल्यवान ब्रँडसच्या यादीत टाटा अव्वल क्रमांकावर

● २०१९ मधील भारतातील १०० सर्वात मूल्यवान ब्रँडसच्या यादीत एलआयसी दुसऱ्या क्रमांकावर

● २०१९ मधील भारतातील १०० सर्वात मूल्यवान ब्रँडसच्या यादीत इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर

● २०१९ मधील भारतातील १०० सर्वात मूल्यवान ब्रँडसच्या यादीत एसबीआय चौथ्या क्रमांकावर

● २०१९ मधील भारतातील १०० सर्वात मूल्यवान ब्रँडसच्या यादीत महिंद्रा समुह पाचव्या क्रमांकावर

● २०१९ मधील भारतातील १०० सर्वात मूल्यवान ब्रँडसच्या यादीत एचडीएफसी बँक सहाव्या क्रमांकावर

● ६ वा कलिंगा साहित्य महोत्सव १९ जुलैपासून भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात येणार

● राजेंद्र किशोर पांडा यांना " कलिंगा साहित्य पुरस्कार २०१९ " जाहिर

● पवन के वर्मा यांना " कलिंगा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०१९ " जाहीर

● पारो आनंद यांना " कलिंगा करुबाकी पुरस्कार २०१९ " जाहीर

● केदार मिश्रा यांना " कलिंगा साहित्य युवा पुरस्कार २०१९ " जाहीर

● डॉ. सिती हसमाह यांना आशिया एचआरडी लाईफटाईम अचिवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● सरकार २०२२-२३ पर्यंत कोळशाचे उत्पादन १ अब्ज टनपर्यंत वाढवणार

● क्रॅम्प-करनबॉउर यांची जर्मनीचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली

● पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबाच्या संस्थापक हाफीज सईदला अटक केली

● दिल्लीचे नवीन पर्यावरणमंत्री म्हणून कैलाश गहलोत यांची नियुक्ती करण्यात आली

● मुराट उइसल यांची सेंट्रल बँक ऑफ तुर्कीचे गवर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली

● बर्नार्ड अरनाल्ट यांनी बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत अनिश भानवालाने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत श्रेया अग्रवाल व यश वर्धन जोडीने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत मेहुली घोष व ह्रिदय हझारीका जोडीने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले

● जे पी अलेक्स यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणात कार्यकारी संचालक (वायु वाहतूक व्यवस्थापन) म्हणून नियुक्ती करण्यात आली

● दीपिका कुमारीने २०२० टोकियो ऑलिम्पिक गेम्स सराव प्रकारात रौप्यपदक पटकावले

● सुरजित सिंहची आगामी प्रो-कबड्डी हंगामात पुणेरी पलटन संघाच्या कर्णधार पदी निवड

● संसदेने राष्ट्रीय तपासणी संस्था (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● २ री जागतिक गुंतवणूक विमानचालन शिखर परिषद २० जानेवारीपासून दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार

● रशिया-भारत संयुक्त सैन्य अभ्यास ' इंद्र २०१९ ' डिसेंबरमध्ये भारतात आयोजित करण्यात येणार

● शालेय मुलांसाठी पहिली आंतरराष्ट्रीय वादविवाद स्पर्धा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात येणार

● ६ वी बंगाल ओपन स्क्वॉश स्पर्धा २० जुलैपासून कोलकाता येथे आयोजित करण्यात येणार

● चौथी जागतिक तेलुगू लेखक परिषद २७ डिसेंबरपासून विजयवाडा येथे आयोजित करण्यात येणार

● संजय संथकुमार यांची गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली

● ए एम नाईक यांची माइंडट्रीच्या गैर-कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

● रोमानियन एम जिओना यांची नाटोच्या उपसभापती पदी नियुक्ती करण्यात आली

● २१ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा कटकमध्ये सुरु झाली

● अभय यांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला

● ताबोर अॅथलेटिक्स मिट स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले

● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० जुलै रोजी कारगिलला भेट देणार आहेत

● गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे दिगंबर कामत यांची नियुक्ती झाली

● विक्रम राठौर यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , बंगळुरू येथे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

चालु घडामोडी वन लाईनर्स , १७ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१७ जुलै २०१९ .

● 17 July : World Day For International Justice

● बिसवा भुषण हरीचंदन यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली

● यु अनुसुया यांची छत्तीसगढच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली

● चंद्रकांत कावळेकर यांनी गोव्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला

● चंद्रकांत दादा पाटील यांची महाराष्ट्र बीजेपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

● स्वतंत्र देव सिंह यांची उत्तर प्रदेश बीजेपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

● कुलभूषण जाधव प्रकरणात आज आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निर्णय घोषित करणार

● २२ वी तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल ऍथलेटिक्स मिट स्पर्धा किरगिझस्तान मध्ये पार पडली

● तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत साहिल सिलवाल ने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत एस अर्चनाने महिलांच्या १०० मी रेसमध्ये सुवर्णपदक पटकावले

● तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत लिली दासने महिलांच्या ४०० मी रेसमध्ये सुवर्णपदक पटकावले

● तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत जिसना मॅथ्युने महिलांच्या ४०० मी रेसमध्ये रौप्यपदक पटकावले

● तात्याना कोल्पकोवा इंटरनॅशनल स्पर्धेत हर्ष कुमारने पुरुषांच्या ४०० मी रेसमध्ये सुवर्णपदक पटकावले

● ३७ वी गोल्डन ग्लोव्ह व्होजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्बियामध्ये आयोजित करण्यात आली

● व्होजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सेलोय सोयने पुरुषांच्या ४९ कीलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले

● व्होजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बिल्टोसन एल. सिंहने पुरुषांच्या ५६ कीलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले

● व्होजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजय कुमारने पुरुषांच्या ६० कीलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले

● आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने १० मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक पटकावले

● आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● हरियाणा सरकारने राई , सोनीपत येथे हरियाणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यास मंजुरी दिल

● संगणक पासवर्डचे शोधकर्ता फर्नांडो कॉर्बाटो यांचे निधन झाले , ते ९३ वर्षांचे होते

● रीबॉकने वरुण धवनला भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● २०१९ वुमन्स इन डेंजर निर्देशांकात दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर विराजमान

● २०१९ वुमन्स इन डेंजर निर्देशांकात भारत ९ व्या क्रमांकावर

● २०१९ वुमन्स इन डेंजर निर्देशांकात चीन २३ व्या क्रमांकावर

● आंतरराष्ट्रीय फिजिक्स ओलंपियाड तेल अविव , इस्रायल येथे पार पडली

● आंतरराष्ट्रीय फिजिक्स ओलंपियाड मध्ये भारताच्या अर्चित बुबना व निशांत अभंगी यांनी सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे सदस्य म्हणून किरण पंड्या यांची नियुक्ती करण्यात आली

● मेलबर्नच्या ला ट्रोब विद्यापीठाने शाहरुख खान यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले

● जपानचे नरिता विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट बिझिनेस विमानतळ यादीत अव्वल स्थानी विराजमान

● नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट बिझिनेस विमानतळ यादीत ३८ व्या क्रमांकावर

● मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट बिझिनेस विमानतळ यादीत ४३ व्या क्रमांकावर

● जाकिर हुसेन व सोनल मानसिंह यांची संगीत नाटक अकादमी फेलोशिपसाठी निवड करण्यात आली

● ७ वा इंडिया आंतरराष्ट्रीय रेशीम मेळा ४ ते ५ जुलैदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला

● २०१९ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) निर्देशांकात डेन्मार्क अव्वल स्थानावर विराजमान

● २०१९ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) निर्देशांकात भारत ११५ व्या क्रमांकावर

● २०१९ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) निर्देशांकात श्रीलंका ९३ व्या क्रमांकावर

● २०१९ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) निर्देशांकात नेपाळ १०३ व्या क्रमांकावर

● २०१९ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) निर्देशांकात पाकिस्तान १३० व्या क्रमांकावर

● २०१९ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) निर्देशांकात अफगाणिस्तान १५३ व्या क्रमांकावर

● अरुणाचल प्रदेश २०१९ वरीष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणार

● ८ वी भारत - उझबेकिस्तान दहशतवाद विरोधी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली

● आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टीन लागर्डे यांनी आपल्या पदावरुन राजीनामा दिला

●  जे. अरुण कुमार यांची पुडुचेरी क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● नरेश कुमार यांची अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली

● उर्सुला वॉन डेर लेयेन यांची युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली .

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...