Saturday, 6 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०६ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०६ जुलै २०१९ .

● ०६ जुलै : International Day Of Cooperatives

● संकल्पना २०१९ : " COOPS 4 DECENT WORK " .

● पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने बांग्लादेशला ९४ धावांनी पराभूत केले

● पाकिस्तान व बांगलादेश दोन्ही संघ २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

● भारत , इंग्लंड , ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड हे चार संघ २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ६०० धावा पुर्ण करणारा शाकिब-अल-हसन पहिला खेळाडू ठरला आहे

● एकाच विश्वचषक स्पर्धेत ६०० धावा व ११ विकेट्स घेणारा शाकिब-अल-हसन पहिला खेळाडू ठरला आहे

● एकाच विश्वचषक स्पर्धेत ४०० + धावा करणारा बाबर आझम पाकिस्तानचा दुसरा खेळाडू ठरला आहे

● विश्वचषक स्पर्धेत ६ बळी घेणारा शाहिन शाह अफ्रिदी (१९) सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे

● देशभरातून विकसित होणाऱ्या १७ पर्यटन स्थळांच्या यादीत अजिंठा-वेरुळचा समावेश करण्यात आला

● ओडिशा सरकारच्या आदेशानुसार महाविद्यालयीन शिक्षकांना आता ७ तास काम करणे अनिवार्य असेल

● हाँगकाँगने फनी चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेल्या ओडिशाला ७ मिलियन हाँगकाँग डाॅलर्सची मदत जाहीर केली

● केंद्र सरकार अनिवासी भारतीयांना आता १८० दिवसांची प्रतिक्षानकरता आधार कार्ड उपलब्ध करून देणार

● परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी केंद्र सरकार " स्टडी इन इंडिया " कार्यक्रम सुरु करणार

● मान्यवरने कार्तिक आर्यनला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● अमित सेन यांची स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक (वित्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली

● केंद्र सरकार राष्ट्रीय बॅंकांना भांडवल वाढीसाठी ७० हजार कोटींचा निधी देणार

● आंतरराष्ट्रीय आॅलंम्पिक समितीने कुवैत ओलंपिक समितीवरील निलंबन मागे घेतले

● पारुपल्ली कश्यप कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● ग्रॅण्ड चेस स्पर्धेचे आयोजन झगरेब , क्रोएशियामध्ये करण्यात आले

● इंटरकॉन्टिनेंटल फुटबाॅल कप स्पर्धा ७ ते १८ जुलै दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात येणार

● झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू तातेंडा तैबुचे आत्मचरित्र " Keeper Of Faith " प्रकाशित

● यूएई पर्यटकांना मोफत मोबाइल फोन सिम कार्डे वाटप करणार

● बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली

● जागतिक वारसा समितीची बैठक बाकू , अझरबैजान येथे आयोजित करण्यात आली

● यूनेस्कोने इराकच्या बॅबिलोनचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला

● ट्युनिशियाने सर्व सरकारी कार्यालयात चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे

● रशियाने " सोयुझ २.१ " राॅकेटसह ३३ उपग्रहांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले

● भाजपचे एस जयशंकर व जुगल ठाकूर यांची गुजरातमधून राज्यसभेवर निवड झाली

● सीबीआयचे अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना पदावरून हटविण्यात आले

● नागेश्वर राव यांची फायर सर्व्हिसेस , सिव्हिल डिफेंस व होम गार्डचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ३ री ग्लोबल सनफ्लॉवर सीड ऑइल परिषद १९ जुलैपासून मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे

● थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कर्नाटक बॅंकेने " वसुल-सो-फास्ट " वेब टुलचे अनावरण केले

● एकाच विश्वचषक स्पर्धेत बाबर आझम पाकिस्तानचा सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला आहे (४७६ धावा)

● आयर्लंडसाठी ४००० एकदिवसीय धावा करणारा पॉल स्टर्लिंग पहिला खेळाडू ठरला आहे

● विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा इमाम-उल-हक (२३) पाकिस्तानचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे

● मुस्तफिजूर रहमान बांगलादेशकडून सर्वात जलद १०० एकदिवसीय बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे ( ५४ सामने )

● अभय यांची सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी , हैदराबादचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ५ व्या आंतरराष्ट्रीय आर्मी स्काउट मास्टर्स स्पर्धेचे आयोजन जयसलमेर , राजस्थान येथे करण्यात आले

● यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने अझिम प्रेमजी यांना २०१९ ग्लोबल एक्सीलेंस पुरस्काराने सन्मानित केले

● यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने मास्टरकार्डचे सीईओ अजय बंगा यांना २०१९ ग्लोबल एक्सीलेंस पुरस्काराने सन्मानित केले

● युआयडीएआयने दिल्ली व विजयवाडा येथे आधार सेवा केंद्र सुरू केले

● विश्वचषक स्पर्धेत सलग २ शतके झळकावणारा जे बेस्ट्रो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे

● केंद्रीय अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये ३,१८,९३१ कोटी रुपये संरक्षण क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आले .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...