Friday, 5 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०५ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०५ जुलै २०१९ .

✅ देशाच्या पहिल्या पुर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०१९-२० या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला

● अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारमन देशाच्या पहिल्या पुर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत

● माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने समान्मित करण्यात आले

● जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला धरणांच्या देखभाल , दुरुस्तीसाठी ९४० कोटींचा निधी जाहीर

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धा पोलंड येथे आयोजित करण्यात आली

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत हिमा दासने २०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत वी के विस्मयाने ४०० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत के एस जीवनने ४०० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत तजिंदर पाल सिंह तुरने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक पटकावले

● ६६ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद कबड्डी - महिला स्पर्धा पटना येथे आयोजित करण्यात येणार

● भारत , ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे संघ २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● ग्रामीण बँकांच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे

● पुणे येथे ५ ते ७ जुलैदरम्यान " साखर परिषद २०२० " चे आयोजन करण्यात येणार आहे

● २०१९ किया सुपर लीग स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौरला लॅकशायर संघाने आपल्या संघात समाविष्ट केले

● कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप स्पर्धा २०१९ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली

● उत्तर प्रदेश सरकारने तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री मुख्यमंत्री हेल्पलाइन १०७६ चे अनावरण केले

● त्रिपुरा सरकारला ग्रामीण रस्ते विकासासाठी केंद्र सरकारकडून ३५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

● कुलभूषण जाधव प्रकरणात १७ जुलैरोजी आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निर्णय घोषित करणार

● संयुक्त अरब अमीरातचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाह्यान ७ जुलैपासून ३ दिवसीय भारत दौऱ्यावर येणार

● कॅलिफोर्निया केशरचना भेदभाव प्रतिबंधित करणारे अमेरिकेतील पहिले राज्य बनले

● पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान २२ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार

● दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन खेळाडू शॉन मार्श २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

● आयएसएसएफ शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा इटली येथे आयोजित करण्यात आली

● ३० वी जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धा २०१९ इटली येथे सुरु झाली

● भारतीय एल्व्हेनिल वॅलरीव्हने ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले

● जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०१९ स्पर्धा ट्यूनीशियामध्ये आयोजित करण्यात आली

● २०१९ जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत अमित सरोहाने गोळा फेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● २०१९ जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत धरमवीर सिंहने गोळा फेक प्रकारात रौप्यपदक पटकावले

● महाराष्ट्र ज्युनिअर आंतर-जिल्हा राज्य बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा नागपूर येथे पार पडली

● नागपूर संघाने महाराष्ट्र ज्युनिअर आंतर-जिल्हा राज्य बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● चार्ल्स मिशेल यांची युरोपियन परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● २ री युरोपियन गेम्स स्पर्धा मिन्स्क , बेलारूसमध्ये पार पडली

● २ ऱ्या युरोपियन गेम्स स्पर्धेत रशियाने १०९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले

● बीजु जनता पक्षाचे अमर पटनायक , ससमित पात्रा यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली

● मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाचे प्रमुख अब्दुल्ला शामाल २ दिवसीय अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत

● बंगळुरू येथे २४ सप्टेंबरपासून फिबा महिला आशिया कप २०१९ स्पर्धा आयोजित करण्यात येणार

● लोकसभेने आधार (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● ए के मिश्रा यांची अतिरिक्त संचालक म्हणून जम्मु-कश्मीर बॅंकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली

● फ्रँक लॅम्पर्ड यांची चेल्सी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● कर्नाटक जनता दल (सेक्युलर) चे प्रमुख म्हणून एचके कुमारस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली

● रीबॉकने कैटरीना कैफला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● फोक्सवॅगनने अमेरिकेची फुटबॉलपटू अॅलेक्स मॉर्गनला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● ग्लोबल स्टार्टअप निर्देशांकामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर : आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...