Wednesday, 3 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ३ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
३ जून २०१९ .

● अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजुर केले

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवला

● भारतीय संघ २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे

● भारतीय संघाने सातव्यांदा आयसीसी विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली

● आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे

● एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये ४ शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे

● आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा पुर्ण करणारा रोहीत शर्मा पहिला भारतीय फलंदाज

● एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा पुर्ण करणारा रोहीत शर्मा सचिन तेंडुलकर नंतर दुसरा भारतीय फलंदाज

● एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा व ११ विकेट्स घेणारा शाकिब-अल-हसन पहिला खेळाडू ठरला आहे

● २०१९ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता रोहित अव्वल स्थानी ( ७ सामने : ५४४ धावा )

● सब ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा राजकोट , गुजरात येथे पार पडली

● ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन पटना येथे करण्यात येणार

● येत्या १५ ऑगस्टपासून ' माऊंट अबू ' वर प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला

● संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टाईनच्या निर्वासितांसाठी कल्याणकारी कार्यक्रमाला भारत ५० लाख डॉलर्स देणार

● पश्चिम बंगालमधील सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण मिळणार

● मल्टी क्लास (रँकिंग) सेलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली

● विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणार्या गोलंदाजाच्या यादीत मोहम्मद शमी तिसऱ्या क्रमांकावर

● गगनयानसाठी भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यासाठी इस्रोने रशियन कंपनीसह करार केला

● आरोग्य मंत्रालयाने ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे

● गृहमंत्री अमित शहा आजपासून २ दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत

● मध्यप्रदेश मधील सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण मिळणार

● राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा सोनीपत येथे संपन्न

● श्रीलंकेचे पोलिस प्रमुख पुजित जयसुंदरा यांना दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे अटक करण्यात आली

● श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो यांना दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे अटक करण्यात आली

● भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) सीएमडी म्हणून के के पुरवार यांची नियुक्ती करण्यात आली

● ब्राझिलने अर्जेंटिनाला २-० ने पराभूत करत कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● अमेरिकेने इंग्लंडला ३-२ ने पराभूत करत २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● पाकिस्तान संघाने आयबीएसएफ स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● अमेरिकेने बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले

● रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन ४ जुलै रोजी १ दिवसीय अधिकृत इटली दौऱ्यावर जाणार आहेत

● अमेरिकन अर्थतज्ज्ञ डेव्हिड लिपटन यांची आयएमएफचे अंतरिम नेते म्हणून निवड करण्यात आली

● दुबईतील ड्यूटी-फ्री दुकानात आता भारतीय चलन स्वीकारण्यात येणार आहे

● भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे (बीएचईएल) सीएमडी म्हणून नवीन सिंंघल यांची नियुक्ती करण्यात आली

● राजौरीमध्ये ३१२ पंचायतींना तंबाखू मुक्त करण्यासाठी " ऑपरेशन खुमार " सुरु करण्यात आले

● शिगताका मोरी यांची जपान रग्बी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली

● ९ व्या रग्बी वर्ल्ड कपचे आयोजन २० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान जपानमध्ये करण्यात येणार आहे

● ग्लोबल वॉर्मिंगमुळे २०३० पर्यंत भारत ३४ दशलक्ष नोकर्या गमावू शकतो : आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना

● २०१७-१८ दरम्यान भारताचे एकूण अंदाजे दुधाचे उत्पादन १७६.३५ दशलक्ष टन होते

● ताज्या एफआयएच पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर आहे

● ताज्या एफआयएच पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे

● ताज्या एफआयएच पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तान संघ सतराव्या क्रमांकावर आहे

● ताज्या एफआयएच महिलांच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दहाव्या क्रमांकावर आहे

● मध्य प्रदेश सरकार लवकरच " महा आयुष्यमान " योजना सुरू करणार आहे

● थायलंड राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून अकिरा निशिनो यांची नियुक्ती करण्यात आली

● संसदेने होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● लोकसभेने भारतीय मेडिकल कौन्सिल (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● एस कृष्णन यांची तमिळनाडूचे अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...