चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०१ जुलै २०१९ .
● ०१ जुलै : जीएसटी दिन
● ०१ जुलै : चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) दिन
● ०१ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिन
● संकल्पना २०१९ : " Zero Tolerance To Violence Against Doctors & Clinical Establishment "
● २०१८ मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी ९९ लाख कोटींनी कमी झाला
● २०१८ मध्ये भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी कमी होऊन ६७५७ कोटी रूपयांवर आला
● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे
● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये भारत ७४ व्या क्रमांकावर आहे
● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान ८२ शर्मा क्रमांकावर आहे
● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये बांगलादेश ८९ व्या क्रमांकावर आहे
● भारताने रशियासोबत २०० कोटी रुपयांचा " रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे " खरेदी करण्याचा करार केला
● आजपासून प्रतिष्ठित विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा , लंडन येथे आयोजित करण्यात येणार
● एका विश्वचषक स्पर्धेत ३ शतके ठोकणारा रोहीत शर्मा चौथा फलंदाज ठरला
● विश्वचषक स्पर्धेत सलग ५ अर्धशतक ठोकणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे
● विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामन्यांमध्ये ४ बळी घेणारा मोहम्मद शमी दुसरा गोलंदाज ठरला आहे
● उत्तर कोरियात जाणारे डोनाल्ड ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत
● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताला ३१ धावांनी पराभूत केले
● ओडिशा स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स असोसिएशन कडून अमित रोहिदासला " २०१८ वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू " म्हणून सन्मानित करण्यात आले
● ओडिशा स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स असोसिएशन कडून बाॅक्सिंग प्रशिक्षक भुषण मोहंती यांना " लाईफटाईम अचिवमेंट " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● नेदरलँड संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत महिला एफआयएच प्रो लीग २०१९ चे विजेतेपद पटकावले
● डीआयजी अपर्णा कुमार यांनी अमेरिकेतील माऊंट डेनाली शिखर सर केले
● हिमाचल प्रदेशने " ड्रग-फ्री हिमाचल " अॅपचे अनावरण केले
● हिमाचल प्रदेशने ड्रग सेवन करणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनसाठी टोल-फ्री हेल्पलाइन १९०८ सुरु केली
● जर्मनीने युरोपियन अंडर-२१ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● आयबीएसएफ स्नूकर वर्ल्ड कपचे आयोजन दोहा , कतार येथे करण्यात आले
● १९९२ च्या विश्वचषकानंतर इंग्लंडने पहिल्यांदा भारताला विश्वचषक सामन्यात पराभूत केले
● स्वीडन संघाने २०१९ महिला फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला
● माजी भारतीय क्रिकेटपटू राकेश शुक्ला यांचे निधन , ते ८२ वर्षांचे होते
● एस डी प्रजवल आणि ऋषी रेड्डी यांनी हरारे टेनिस स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद पटकावले
● विश्वचषक स्पर्धेत यजुवेंद्र चहल भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला ( १० षटक : ८८ धावा )
● न्यूझीलंडने एकल-प्लॅस्टिक बॅग वापरावर पुर्णपणे बंदी घातली
● कराचीमध्ये सार्वजनिक परिवहन सुविधा सुधारण्यासाठी जागतिक बँकेने ७२२ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले
● जपानने इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले
● मकाऊमध्ये आयोजित एशियन स्क्वॅश जुनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत वीर चोट्रानीने सुवर्णपदक पटकावले
● पी बी आचार्य यांनी मणिपुरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली
● २० वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळा नेपाळमध्ये आयोजित करण्यात येणार
● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन पार्लियामेंट " यादीत रवांडा अव्वल स्थानावर
● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन पार्लियामेंट " यादीत भारत १४९ व्या क्रमांकावर
● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन पार्लियामेंट " यादीत पाकिस्तान १०१ व्या क्रमांकावर
● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन मिनिस्ट्रियल पोझिशन " यादीत भारत ७८ व्या क्रमांकावर
● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन मिनिस्ट्रियल पोझिशन " यादीत पाकिस्तान १३६ व्या क्रमांकावर
● भारतीय महिला हॉकी संघाची ताज्या एफआयएच रँकिंगवर दहाव्या स्थानावर घसरण झाली
● भारतीय पुरुष हॉकी संघाने ताज्या एफआयएच रँकिंगवर पाचवे स्थान कायम राखले
● मॅक्स व्हर्स्टप्पनने २०१९ ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली
● केशनी आनंद अरोरा यांची हरियाणाच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली
● प्रणव दास यांची जागतिक सीमाशुल्क संस्थेचे संचालक म्हणून निवड करण्यात आली
● २१ जुलै २०१९ पासून आंतरराष्ट्रीय रेती मूर्तिकला स्पर्धा अमेरिकेत आयोजित करण्यात येणार
● के नटराजन यांनी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला .