नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२६ जून २०१९
जांभी मृदा
◆ सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर, पूर्व घाट, राजमहल टेकडय़ांवर, केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्य़ांमध्ये राधानगरी, आंध्रप्रदेशात मेडक, ओडिशात मयूरभंज येथे जांभी मृदा आढळते.
◆उष्ण कटिबंधीय प्रदेशात आद्र्र हवामानात जांभा जमीन तयार होते.
◆ पावसाचे प्रमाण २०० सें.मी.पेक्षा जास्त असल्याने खडकाचे अपक्षरण होते.
◆खडकामधील सिलिकांवर अपक्षयाची क्रिया होऊन लिचिंगची प्रक्रिया व त्यापासून आयर्न ऑक्साइड तयार होते. अशा तांबूस पिवळसर जमिनीस ‘जांभा मृदा’ असे म्हणतात.
◆अॅल्युमिनिअम ऑक्साइड व लोह ही द्रव्ये या मृदेत असतात.
◆ही मृदा फारशी सुपीक अस
त नाही. परंतु खताला लगेचच आणि चांगला प्रतिसाद देते.
◆ या मृदेतून नाचणी, भात, कडधान्ये, ऊस ही पिके तसेच आंबा, काजूसारखी फळझाडे चांगली वाढतात.
काळी मृदा/ रेगूर मृदा
◆ दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात.
◆बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.
• महाराष्ट्रात काळी मृदा विस्तृत प्रमाणात आढळते.
• कर्नाटकात उत्तरेकडे या मृदेचा रंग अधिक काळा होत जातो.
• आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते.
◆या मातीत लोह, अॅल्युमिनिअम व ह्यूमसचे प्रमाण जास्त असते.
◆तसेच टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट (मुख्यत: टिटॅनिअम) मुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे.
◆ उन्हाळ्यात या जमिनींना भेगा पडतात. मोसमी काळात पावसाच्या पाण्याने या मृदा फुगतात.
◆पिके : काळ्या मृदेतून खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते.
•कापूस, ऊस, तंबाखू यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तृणधान्ये, तेलबिया, विविध प्रकारचा भाजीपाला, संत्री- मोसंबी- द्राक्षांसारखी फळे
पिकवली जातात.
◆या जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कोरडवाहू शेतीसाठी ही जमीन आदर्श मानली जाते.
पृथ्वीची अक्षीय गती
★ पृथ्वीची अक्षीय गती ★
◆ पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला तिचा अक्ष व ज्या अक्षाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्याला भ्रमणाक्ष म्हणतात.
◆ भ्रमणाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला दिवस म्हणतात.
◆ अक्षीय गती ही पृथ्वीची दैनिक गती असून तिच्यामुळेच दिवस व रात्र होत असतात.
◆अक्षीय गतीमुळे विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदू ताशी सु. १,६०० किमी. गतीने फिरत असतो आणि जसजसे ध्रुवावरील बिंदूची गती शून्य असते.
◆ अक्षीय गतीमुळे उत्तर गोलार्धामधील गतिशील वस्तू उजवीकडे विचलित होते; अशा प्रकारे चक्रवात हा अक्षीय गतीचा पुरावा आहे. मात्र फूको लंबक (जे. बी. एल्. फूको या फ्रेंच भौतिकीविज्ञांनी शोधून काढलेला लंबक) हा अक्षीय गतीचा पहिला दृश्य पुरावा आहे.
◆ पृथ्वीच्या अक्षीय गतीत पुढील तीन प्रकारचे बदल होत असतात व त्यांच्यामुळे दिवसाचा (दिवस व रात्र यांचा मिळून) कालावधीही बदलत असतो.
रमाबाई रानडे
❇️रमाबाई रानडे❇️
- स्थापन केलेल्या संस्था
🔶हिंदू लेडीज सोशल क्लब (पुणे) - 1894
🔶सेवा सदन (1908) - मुंबई
🔶1918 मुलींसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय केली
🔶1909 - पुणे येथे सेवा सदन ची शाखा स्थापन करून ग्रंथालये मोफत दवाखाने आदी उपक्रम सुरू केले .
English Grammar
🌹 खालील शब्दांचे🌹
- अनेकवचन करू नये
- या नामापूर्वी a/an वापरू नये
- क्रियापद एकवचनी वापरावे
🌷Furniture , Machinery
🌷Equipment , Drapery
🌷Imagery , Poetry
🌷Scenery , Stationery
🌷Traffic , Luggage
🌷Crockery , Electricity
🌷Work , Dust , Rubbish
🌷Wood , Iron , Grass
🌷Advice , Butter , Dirt
🌷Food , Health , Garbage
🌷Heritage , Postage , Percentage
🌷Jewellery , Music , Maintenance
🌷Parking , Smoking
विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
📚 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफी
🔶 English Synonyms🔶
🔶Synonyms🔶
✳️Blithe - Graceful ( आनंदी)
✳️Brevity - Concise , Short ( सूचना)
✳️Brace - Strengthen , support ( बळकट करणे )
✳️Boost - Lift (ताकद वाढविणे)
✳️Bitter - Sour , Severe (कडू)
✳️Boisterous - Noisy , Stormy (बडबड्या)
✳️Bedlam - madhouse ( पागलखाना )
अलंकारिक शब्द🔹
🔹अलंकारिक शब्द🔹
1)बाजीराव = चैनी, अहंमान्य व्यक्ती
2)बावनकशी =निर्दोष, सर्वोत्कृष्ट व्यक्ती
3)बिरबल =चतुर व धोरणी व्यक्ती
4)नरसिंह =उग्र व पराक्रमी मनुष्य
5)वामनमूर्ती = ठेंगु मनुष्य
6)विश्वामित्र =अहंमन्य मनुष्य
7)शुक्राचार्य =कृश मनुष्य व व्रतस्थ
8)शिराळशेट =रंगेल ,चैनी मनुष्य
9)हरिश्चंद्र =सत्यवचनी मनुष्य
10)घाशीराम कोतवाल =अन्यायी मनुष्य
चालु घडामोडी वन लाईनर्स , २५ जून २०१९ .
चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२५ जून २०१९ .
● २६ जून : International Day Against Drug Abuse And Illicit Trafficking
● संकल्पना २०१९ : " Health For Justice , Justice For Health "
● २६ जून : International Day In Support Of Victims Of Torture
● परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भाजपमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केला
● परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे
● विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल हा दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
● विश्वचषकात १००० धावा पुर्ण करणारा शाकिब-अल-हसन बांग्लादेशचा पहिला खेळाडू ठरला
● विश्वचषक स्पर्धेत १००० धावा पुर्ण करणारा शाकिब-अल-हसन जगातील १९ वा खेळाडू ठरला
● विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली
● ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली
● विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड होणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे दुसऱ्या महिला आहेत
● पाकिस्तानला कतारकडून ३ अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे
● राजस्थान भाजपाचे अध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन झाले
● केंद्र सरकार लवकरच युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सची सुरुवात करणार
● जम्मु व कश्मीर आरक्षण विधेयक २०१९ लोकसभेत सादर करण्यात आले
● गृहमंत्री अमित शहा २६ जूनपासून २ दिवसीय जम्मु-कश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत
● महाराजा रणजीतसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणार्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानने ४६३ भारतीय नागरिकांना व्हीसा दिला
● अमेरिका संघाने महिला फिफा विश्वचषक २०१९ च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला
● फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल यांनी फ्लिपकार्टमधील हिस्सा ५३१ कोटींना वॉलमार्टला विकला
● सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योगांनी २०१७-१८ मध्ये ५.८७ लाख रोजगार निर्मिती केली : अहवाल
● मे २०१९ मध्ये गुगल पे सर्वात जास्त डाउनलोड केलेले फायनान्स अॅप ठरले
● मे २०१९ मध्ये फोन पे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त डाउनलोड केलेले फायनान्स अॅप ठरले
● पहिली जागतिक निर्वासित फोरम डिसेंबर २०१९ मध्ये स्वित्झरलॅडमध्ये आयोजित करण्यात येणार
● अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी २७ जून रोजी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत
● आरबीआयने तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार व्यवस्थापन प्रणाली चे अनावरण केले
● मे महिन्यात कच्च्या स्टीलचे उत्पादन ५ टक्क्यांने वाढून ९.१९६ मेट्रिक टन झाले
● आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे १०८ वे सत्र जिनेवा येथे आयोजित करण्यात आले
● आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या आशिया-पॅसिफिक ग्रुपचे प्रमुख म्हणून इराणचे मोहम्मद शरियतमदरी यांची निवड करण्यात आली
● आशिया युनायटेड बँकेला आसियान कॉर्पोरेट गव्हर्नन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले
● तिसरे आशियाई नेतृत्व शिखर सम्मेलन थिम्फू, भूटान येथे आयोजित करण्यात आले होते
● आशियाई नेतृत्व शिखर परिषदेत डॉ. गौरव निगम यांना " अभिनव संशोधन उत्कृष्टता पुरस्कार २०१९ " ने सन्मानित करण्यात आले
● केरळच्या सिफिया हनीफला नीरजा भानोत पुरस्कार २०१८ जाहीर झाला
● आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १३४ वे सत्र स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात आले
● २०२६ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा इटलीतील मिलान - काॅर्टीना या शहरात आयोजित करण्यात येणार
● ओडिशा विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून भाजपचे प्रदीप्ता कुमार नाईक यांची नियुक्ती करण्यात आली
● पानचान लामा यांची तिबेट बौद्ध संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● मेहदी बयात यांची रॉयल बेल्जियम फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● पवन हान्स लिमिटेडने नवीन हेलिकॉप्टरसाठी एअरबससह सामंजस्य करार केला
● ओडिशा स्किल डेवलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष म्हणून सुब्रतो बागची यांची नियुक्ती करण्यात आली
● चेल्सी फुटबॉल क्लबचे मॅनेजर म्हणून फ्रँक लॅम्पर्ड यांची नियुक्ती करण्यात आली
● ब्लॅक फॉरेस्ट बॉक्सिंग स्पर्धा जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती
● भारताने ब्लॅक फॉरेस्ट बॉक्सिंग स्पर्धेत ५ सुवर्णपदकासह एकुण ७ पदकांची कमाई केली
● निती आयोगाने ' स्वस्थ राज्ये , प्रगतीशील भारत ' अहवालाचे दुसरे संस्करण आज प्रसिद्ध केले
● अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २९ जून रोजी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत
● १२ वा वार्षिक आशियाई फेस्टिव्हल इंडियाना स्टेट म्युझियम , यूएसमध्ये आयोजित करण्यात आला
● २०१३-१४ मध्ये देशांतर्गत कोळसा पुरवठा ५७२ दशलक्ष टनांनी वाढून २०१८-१९ मध्ये ७३४ दशलक्ष टन झाला
● अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ आजपासून ३ दिवसीय भारत दौऱ्यावर येणार
● संयुक्त अरब अमीरातने संयुक्त राष्ट्र-विकसित अँटी-मनी लॉंडरिंग प्लॅटफॉर्म " goAML " चे अनावरण केले .
Latest post
ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.
१. डॉ. अम्ब्रीश मिथल -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...
-
📖 MPSC Maths Marathi🌷: ⚫️ वर्तुळ ⚫️ 1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या ...