Friday, 21 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २१ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२१ जून २०१९ .
● २१ जून : ५ वा आंतरराष्ट्रीय योग दिन
● संकल्पना २०१९ : " Yoga For Heart "
● २१ जून : जागतिक संगीत दिन
● संकल्पना २०१९ : " Music At The Intersections "
● तेलुगू देसम पक्षाचे सहापैकी चार राज्यसभा सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
● भारतीय नौदलाने ओमानच्या समुद्रातून वाहतूक करणाऱ्या भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेसाठी ‘ ऑपरेशन संकल्प ’ सुरु केले
● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दोनवेळा १५० पेक्षा जास्त धावा करणारा डेविड वॉर्नर पहिला फलंदाज ठरला आहे
● पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील क्रिकेट कमिटी चेअरमन मोहसीन खान यांनी राजीनामा दिला
● ३० जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारत भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे
● धारावी ने पर्यटकांच्या पसंतीच्या आशिया खंडातील पहिल्या १० पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये स्थान पटकावले
● अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकेल पॉम्पिओ २५ जूनपासून भारत दौऱ्यावर येणार आहेत
● ताब्यात असलेल्या आरोपीच्या मृत्यूप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेप
● टोरांटो नॅशनल टीमने जी २० च्या दुसऱ्या लिलावात युवराजला विकत घेतले
● युवराज सिंह आता कॅनडातील ग्लोबल टी - २० लीग (जी -२०) स्पर्धेत खेळताना दिसणार
● ब्रिटीश हेराल्डच्या जगातील शक्तिशाली नेत्याच्या पोलमध्ये वाचकांनी सर्वाधिक मते नरेंद्र मोदींना दिली आहेत
● लोकसभेत नवीन ट्रिपल तलाक बिल सादर करण्यात येणार
● तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांनी कालेश्वरम लिफ्ट सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन केले
● आशियाई जूनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०१९ चीनमध्ये आयोजित करण्यात आली
● विश्व तिरंदाजी संघटनेने अभिनव बिंद्राला भारतीय तिरंदाज निवडीसाठी समितीवर नियुक्त करण्यात आले
● स्वामी राजर्षी मुनी यांना पंतप्रधान योग पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला
● एंटोनिएटा रोझी (इटली) यांना पंतप्रधान योग पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला
● बिहार स्कूल ऑफ योगा , मुंगेर ला पंतप्रधान योग पुरस्कार २०१९ पुरस्कार प्रदान करण्यात आला
● जपान योग निकेतन , जपान ला पंतप्रधान योग पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला
● राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
● मध्य आशियातील सर्वोत्कृष्ट कर्मचारी एअरलाईन्स म्हणून विस्तारा एअरलायनला सन्मानित करण्यात आले
● २०२२ राष्टकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी व तिरंदाजी या खेळांना स्थान देण्यात आले नाही
● २०२२ राष्टकुल क्रीडा स्पर्धेत टी-२० महिला क्रिकेट चा समावेश करण्यात येणार
● अमेरिकेने भारताला ह्युमन ट्रॅफिकिंग रिपोर्टच्या दुसऱ्या स्तरावर स्थान दिले
● अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली सीईओच्या यादीत पॅट्रिक जेलसिंगर अव्वल स्थानी विराजमान
● अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली सीईओच्या यादीत अॅडॉबचे शांतनू नारायणन ५ व्या क्रमांकावर
● अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली सीईओच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला ६ व्या क्रमांकावर
● अमेरिकेतील सर्वाधिक शक्तिशाली सीईओच्या यादीत गुगलचे सुंदर पिचाई 46 व्या क्रमांकावर
● अमेरिकेतील सर्वाधिक शक्तिशाली सीईओच्या यादीत ऍपलचे टिम कुक ६९ व्या क्रमांकावर
● इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स - लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणास सीसीआयने मंजुरी दिली
● इंडिगो जगातील सर्वोत्तम बेस्ट लो-कॉस्ट एअरलाइन्समध्ये ८ व्या क्रमांकावर
● युनियन बँक ऑफ इंडियाने बी.एस. वेंकटेश यांची मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती केली
● लुईस एनरिक यांनी स्पेनच्या फुटबॉल टीमचे प्रशिक्षक म्हणून राजीनामा दिला
● इथियोपिया २०२१ मध्ये वर्ल्ड टेलीकम्युनिकेशन्स डेव्हलपमेंट कॉन्फरन्स आयोजित करणार
● अमेरिकेने सौदी अरेबिया व क्यूबा ला ह्युमन ट्रँफिकिंग रिपोर्ट २०१९ मध्ये ब्लॅकलिस्ट मध्ये स्थान दिले
● २० व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय डिजिटल गव्हर्नमेंट रिसर्च परिषदेचे आयोजन युएई येथे आयोजित करण्यात आली
● ऑगस्ट २०१९ मध्ये शांघाय येथे २ रे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येणार
● ब्रिटन २०२० मध्ये सीओपी-२६  संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेचे आयोजन करणार
● ३४ व्या आशियान परिषदेचे आयोजन २० ते २३ जून दरम्यान बँकॉकमध्ये आयोजित करण्यात येणार
● वस्तू व सेवा कर परिषदेची ३५ वी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली
● एसी मिलानने मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्को गिआम्पॅलो यांची नियुक्ती करण्यात आली
● वरिष्ठ आशियाई कलात्मक जिम्नॅस्टिक चँपियनशिप स्पर्धा मंगोलिया येथे आयोजित करण्यात आली
● प्रणती नायक ज्येष्ठ आशियाई कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात फाइनलसाठी पात्र ठरली
● २०२२ मध्ये जी-२० शिखर परिषदेचे आयोजन भारतात करण्यात येणार .