Thursday, 20 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स ,२० जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२० जून २०१९ .
● २० जून : जागतिक शरणार्थी दिवस
● संकल्पना २०१९ : #StepWithRefugees — Take A Step on World Refugee Day
● श्रीलंकेने आपला पहिला उपग्रह ' रावण-१ ' यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केला
● श्रीलंकेच्या ‘ रावण-१ ’ या उपग्रहासोबत जपान व नेपाळचे ‘बर्ड थ्री’ श्रेणीतील प्रत्येकी एक असे दोन उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले
● ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात इच्छामरणाच्या तरतुदीचा कायदा मंजूर
● अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निवड करण्यात आली
● ‘ एक देश , एक निवडणूक ’ घेण्याच्या संदर्भात समिती स्थापन केली जाणार आहे
● सर्वात जलद ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा हाशिम आमला दुसरा खेळाडू ठरला आहे
● सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक २०१९ स्पर्धेबाहेर गेला
● जायबंदी शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला बदली खेळाडू म्हणून अंतिम १५ खेळाडूंच्या संघात स्थान
● बीसीसीआयने रसिख सलामवर चुकीच जन्म प्रमाणपत्र दाखल केल्याबद्दल २ वर्षाची बंदी घातली
● इंग्लंडमध्ये केन विलियम्सन सर्वात जलद १००० धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेटपटू ठरला ( १७ डाव )
● पी.यु. चित्रा ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेतील १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले
● जिन्सन जॉन्सन ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेतील १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले
● मुरली श्रीशंकर ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. स्पर्धेत लांब उडीत सुवर्णपदक पटकावले
● संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून वियतनामने भारताला पाठिंबा दिला
● बांगलादेश आणि दक्षिण कोरिया मध्ये डीडी इंडिया प्रसारित करण्यासाठी केंद्र सरकारने करार केला
● दक्षिण कोरिया आणि बांगलादेशची चॅनेल्स आता डीडी फ्री डिश वर प्रसारित होणार
● तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून एस. एस. चौहान यांची नियुक्ती करण्यात आली
● हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली
● ३१ व्या बीएमडब्ल्यू आंतरराष्ट्रीय ओपन गोल्फ टूर्नामेंट जर्मनीमध्ये आयोजित करण्यात येणार
● दक्षिण कोरियाने ५०००० हजार टन तांदूळ उत्तर कोरियाला दिले
● अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी आपला श्रीलंका दौरा रद्द केला
● कुवैती अमीर शेख सबाह अल अहमद अल-जहांर अल-सबा इराक दौऱ्यावर आले आहेत
● श्रीलंकेच्या संसदेला चीनने आधुनिक सुरक्षा उपकरणे दान केली
● भारत-संयुक्त राष्ट्र निधीतून पलाऊमध्ये आरोग्य केंद्राच्या पुनर्वसनसाठी १.५ मिलियन डॉलर्स अनुदान देण्यात आले
● एचडीएफसीने १३३६ कोटी रुपयांना अपोलो म्यूनिच हेल्थ इन्शुरन्समधील ५१% हिस्सा विकत घेतला
● रुद्रजित सिंह यांची बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली
● अमेझाॅनने हैदराबादमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे डिलिव्हरी स्टेशन सुरू केले
● बांग्लादेशनंतर त्रिपुरा ४० मेगावॅट विजेचा पुरवठा नेपाळला करीत आहे
● युरोपियन युनियन न्यायालयाने एडिडास चा थ्री-स्ट्रिप ट्रेडमार्क अवैध घोषित केला
● रियल्टी गुंतवणूकीसाठी शीर्ष १० आशियाई शहरांमध्ये बंगळुरू चा समावेश करण्यात आला
● इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा शहरात मोटारबाईकवर बंदी घालण्यात येणार
● रॉबर्ट मोरेनो यांची स्पेन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● जे मुरली यांची आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले
● आरबीआयने साऊथ इंडियन बँक वर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे १० लाखांचा दंड ठोठावला
● अमिताभ बॅनर्जी यांची भारतीय रेल्वे वित्त महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● संयुक्त अरब अमीरात व जॉर्डन यांच्या दरम्यान संयुक्त सैन्य अभ्यास " Bonds Of Strength १ " संपन्न
● मंगोलियाचा वार्षिक सैन्य अभ्यास " खान क्वेस्ट २०१९ " मध्ये भारत सहभागी झाला
● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर
● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर
● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर
● एनसीईआरटीने चौथा राष्ट्रीय योग ऑलिंपियाड नवी दिल्ली येथे आयोजित केला
● सिक्किमचे अॅडव्होकेट जनरल म्हणून विवेक कोहली यांची नियुक्ती करण्यात आली
● आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघाचे (आयएसयू) अॅथलीट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून डी व्रिज यांची नियुक्ती करण्यात आली
● महानदी कोलफील्ड्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बी एन शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...