Tuesday, 11 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ११ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
११ जून २०१९ .
● १२ जून : जागतिक बालकामगार विरोधी दिवस
● संकल्पना २०१९ : " Children shouldn’t Work In Fields , But On Dreams "
● पाकिस्तानाचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना एनएबीने बनावट बँक खाते प्रकरणी अटक केली आहे
● शांघाय सहकार्य संघटनेची बैठक १३ व १४ जून रोजी बिश्केक , किरगिझस्तान येथे होणार
● शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
● शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकी दरम्यान चीन आणि रशियाबरोबर द्विपक्षीय चर्चा होईल
● पाकिस्तान सरकारने सर्व नागरिकांना ३० जूनपर्यंत आपली अघोषित संपत्ती घोषित करण्याचे आवाहन केले
● १ एप्रिल २०२० पासून जुन्या वाहनांच्या वापरावर बंदी घालण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे
● फोल्क्सवॅगनच्या ऍमीओ चषक कार रेसिंग स्पर्धेला राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचा दर्जा देण्यात आला
● उषा रामनाथन यांना अॅक्सेस नाॅऊ कडून ' ह्यूमन राइट्स हीरो ' पुरस्कार प्रदान करण्यात आला
● जागतिक राफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की येथे आयोजित करण्यात आली
● सौरव कोठारी ने २०१९ पॅसिफिक आंतरराष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● ३ री युवा पुरुष - महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा रुद्रपूर , उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आली
● ६ भारतीय ग्रँड मास्टर्स ग्रँड स्विस  टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत
● अहमदाबादमध्ये ७ ते १८ जुलै दरम्यान इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप स्पर्धा आयोजित करण्यात येणार
● गोवा विधानसभेचे मान्सून सत्र १५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार
● तपन रे यांची गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● यस बँकेचे माजी अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी मंडळातून राजीनामा दिला
● २०१८ मध्ये गुगल ने बातम्यांच्या माध्यमातून ४.७ बिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई केली : अहवाल
● भूकंपानंतर घरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी भारताने नेपाळला १.६ अब्ज रुपयांची मदत जाहीर केली
● १२-१३ जून रोजी चक्रीवादळ " वायू " गुजरातच्या समुद्र किनार्यावर धडकणार : भारतीय हवामान विभाग
● मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी आमदार म्हणून शपथ घेतली
● १४ जून रोजी कर्नाटक सरकार कॅबिनेटचा विस्तार करणार
● ताज्या डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाने अव्वल स्थान कायम राखले
● अॅश्लेई बार्टीने ताज्या डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये २ रे स्थान पटकावले
● अमेरिकन नागरिकांना पाच वर्षांचा व्हिसा देणार असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले
● आर आर सिन्हा यांची खनिज धातु व्यापार महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● विनय सिंह यांची रेल्वे विकास निगम लिमिटेडचे ​​संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● कर्मचारी निवड आयोगाचे ( एसएससी ) सदस्य म्हणून राजीव श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली
● आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (एफआयबीए) आशिया ची सर्वसाधारण सभा बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली
● आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (एफआयबीए) आशियाचे अध्यक्ष म्हणून अल थानी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली
● याओ मिंग यांची चायनीज बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● भारत व फ्राॅन्स ने रेल्वे आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करार केला
● मँक्सिकोत होणार्या ३३ व्या गुआदालाजारा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात भारताची अतिथी देश म्हणून निवड करण्यात आली
● वर्ल्ड रग्बी नेशन्स कप स्पर्धा उरुग्वेमध्ये आयोजित करण्यात आली
● ओडिशा विधानसभेचे मॉनसूनचा सत्र २५ जूनपासून सुरू होणार
● भारतीय संघाने एफआयएच सिरीज फाइनल हॉकी टूर्नामेंटमध्ये उजबेकिस्तानला १०-१ ने पराभूत केले
● भारतीय संघ एफआयएच सिरीज फाइनल हॉकी टूर्नामेंटमच्या उपांत्य फेरीत दाखल
● भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला महाराष्ट्र व गुजरातमध्ये ऊर्जानिर्मिती प्रकल्प स्थापण्याची आॅर्डर मिळाली
● आरबीआयने के के चिब्बेर यांची जम्मु-कश्मीर बँकचे अंतरिम सीएमडी म्हणून केलेल्या नियुक्तीला मंजूरी दिली
● अभिनेते , नाटककार मोहन रंगाचारी यांचे निधन झाले
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रांन्सकडून जी-७ परीषदेसाठी आमंत्रित करण्यात आले
● सप्टेंबर २०१९ मध्ये पहिले राफेल जेट भारताला पाठवले जाईल : फ्रेंच सरकार
● सिनन ओझोक यांची निसान इंडिया ऑपरेशन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● कासिम-जोमर्ट तोकायेव्ह यांची कझाकिस्तानने राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली
● भाजपाचे खासदार वीरेंद्र कुमार १७ व्या लोकसभेचे ' प्रोटेम स्पीकर ' म्हणून नियुक्ती करण्यात आली
● गोवा सरकारने सामान्य श्रेणीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण मंजूर केले .