Monday, 10 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १० जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१० जून २०१९ .
● राफेल नदालने २०१९ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले
● १२ वेळा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारा राफेल नदाल पहिला खेळाडू
● यावर्षी ४८ % महिलांसह २ लाख भारतीय मुस्लिम बांधव हजला जाणार : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने आँस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत केले
● आयसीसी स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन तिसऱ्या स्थानी पोहचला आहे ( ६ शतके )
● विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर आता २७ शतकं जमा झाली आहेत
● इंग्लंडमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर पहिल्या स्थानावर
● आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर ( ३५५ षटकार )
● बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या प्रमुखपदी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे
● ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद २ हजार धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर पोहचला आहे
● अभिनेते , चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन झाले , ते ८१ वर्षांचे होते
● गिरीश कर्नाड यांच्या निधनानंतर कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
● भारत अमेरिकेकडून नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम – II (NASAMS-II) खरेदी करण्याच्या तयारीत आहे
● मार्च २०१९ मध्ये पाकिस्तानातून भारतात होणाऱ्या आयातीत ९२ टक्के घट झाली
● ७६ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश २०१९ अजिंक्‍यपद स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात येणार
● चौथ्या आंतर राज्य चॅलेंजर्स स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिपचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे
● बँक ऑफ महाराष्ट्रने एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात ०.१० टक्के कपात केली आहे
● २८ ते ३० जून दरम्यान १२ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार
● भारतीय रेल्वेत प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये मसाज सेवा पुरविली जाईल
● अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी कमलाकर नाडकर्णी आणि दया डोंगरे यांची निवड केली
● मर्सरने २०१९ साठी जगातील राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली
● २०१९ साठी जगातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत हैदराबाद १४३ व्या क्रमांकावर
● लुईस हॅमिल्टनने कॅनेडियन ग्रँड प्रिक्स २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● १६ व्या आशियाई मीडिया समिट चे आयोजन कंबोडियामध्ये करण्यात आले
● पोर्तुगाल ने यूईएफए नेशन्स लीग २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● २०२१ पर्यंत कॅनडा एकल प्लास्टिक वापरावर बंदी घालणार असल्याचे जाहीर करण्यात आले
● ४७ वी किंग्स कप फुटबॉल टूर्नामेंट स्पर्धा थायलँड मध्ये आयोजित करण्यात आली
● कुराकाओ संघाने ४७ वी किंग्स कप फुटबॉल टूर्नामेंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● ४७ व्या किंग्स कप टूर्नामेंटमध्ये भारतीय फुटबॉल संघ तिसऱ्या स्थानावर राहिला
● यस बँक वन उत्पादनासाठी ई-ऑक्शन आयोजित करणार
● आरबीआय रिटेल सहभागींसाठी परकीय चलन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करणार
● उत्तर प्रदेश मधील प्राचीन बौद्ध स्थान चौखंडी स्तूप ला " राष्ट्रीय महत्व " म्हणून घोषित करण्यात आले
● भारत पुढील ५ वर्षात मालदीवमधील १००० नागरी सेवकांना प्रशिक्षित करणार
● अमित शहा आँक्टोबर २०१९ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर राहतील
● पद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री आर व्ही जानकिरमन यांचे निधन
● अमेझाँन भारतातील इंटरनेट ब्रँन्ड्समध्ये सर्वाधिक विश्वासार्ह : अहवाल
● जम्मू-काश्मीर गुंतवणूकदार शिखर संमेलन २०१९ ऑक्टोबरमध्ये श्रीनगर मध्ये आयोजित करण्यात येणार
● बेलीझला भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून मनप्रीत वोहरा यांची नियुक्ती करण्यात आली
● महिला सुरक्षेसाठी कर्नाटक सरकारने ' Pink Sarthi ' वाहने सुरू केली आहेत
● कर्नाटक सरकारने शाळा व दवाखाना परिसरात ५० मीटर पर्यंत मोबाईल टाँवर उभारण्यास बंदी घातली
● २० जून रोजी वस्तु व सेवा कर ( जीएसटी ) परीषदेची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार
● केरळमध्ये ' कॉल ऑटो ' ' ऑटो ड्राइव्हर ' ह्या २ अॅपचे अनावरण करण्यात आले
● आर के चिब्बेर यांची जम्मु-कश्मीर बँकचे अंतरिम अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला
● बांग्लादेशची संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
● ३ दिवसीय भारत-म्यानमार परिषद इम्फाल येथे ९ जूनपासून आयोजित करण्यात येणार आहे
● २२ जून ते २४ जून पर्यंत हैदराबाद येथे इंटरनॅशनल कुरान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे
● भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती जाहीर केली .