०९ जून २०१९ .
Sunday, 9 June 2019
चालु घडामोडी वन लाईनर्स , ०९ जून २०१९ .
०९ जून २०१९ .
भारतातील महत्त्वाचे रेल्वे समुद्री पूल 🚊
भारतातील महत्त्वाचे रेल्वे समुद्री पूल 🚊
१) पंबन रेल्वे पूल :-
रामेश्वरमजवळ पंबन बेटापासून मुख्य किनारी येण्यासाठी बांधण्यात आलेला हा रेल्वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली.
१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्यात आला.
पंबन रेल्वे पूल हा भारतामधील पहिला
समुद्री पूल आहे.
२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता.
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्यात आला आहे.
दोन खांबामध्ये इतके अंतर ठेवण्यात आले आहे, की ज्याच्यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील.
याला समांतर असा पूल बांधण्यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्ता खुला करण्यात आला.
-----------------------
२) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे.
यासाठी काँक्रिट स्टील मटेरियल वापरण्यात आले आहे.
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे.
या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने
देखरेख केलेला हा पूल आहे.
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्यात आले.
२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.
वरळी आणि वांद्रे यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे.
-----------------------
३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे.
कांडरौर गावात हा पूल आहे.
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे.
१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्यात आला.
पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्यात आलेल्या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्याती आहे.
कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्हा आणि बिलासपूर जिल्हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.
---------------------
४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही
म्हणता येईल.
पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे.
या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही.
विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्या शतकातील सुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्यात आले आहे.
हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे.
या सेतूचे बांधकाम विख्यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे.
या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्यात आली आहे.
_____________________________________
खालील तक्ता लक्षात ठेवा
📚 खालील तक्ता लक्षात ठेवा📚
---------------------------------------------------
*विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -*
1. 100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल
2. 10 क्विंटल = 1 टन
3. 1 टन = 1000 कि.ग्रॅ.
4. 1000 घनसेंमी = 1 लिटर
5. 1 क्युसेक=1000घन लि.
6. 12 वस्तू = 1 डझन
7. 12 डझन = 1 ग्रोस
8. 24 कागद = 1 दस्ता
9. 20 दस्ते = 1 रीम
10. 1 रीम = 480 कागद.
*अ) अंतर –*
1. 1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.
2. 1 से.मी. = 0.394 इंच
3. 1 फुट = 30.5 सेमी.
4. 1 मी = 3.25 फुट
5. 1 यार्ड = 0.194 मी.
6. 1 मी = 1.09 यार्ड
*ब) क्षेत्रफळ -*
1. 1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2
2. 1 सेमी 2 = 0.155 इंच 2
3. 1 एकर = 0.405 हेक्टर
4. 1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे
5. 1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2
6. 1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल
7. 1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल
8. 1 गॅलन = 4.55 लिटर
*क) शक्ती -*
1. 1 एच.पी. = 0.746 किलो वॅट
2. 1 किलो वॅट = 1.34 एच.पी.
3. ड) घनफळ - 1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2
4. 1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3
5. क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3
6. 1 मी 3 = 35 फुट 3
7. 1 यार्ड 3 = 0.765 मी. 3
*इ) वजन -*
1. 1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0
2. 1 पौंड (lb) = 454 ग्रॅम
3. 1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)
*दिनदर्शिका –*
· एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस
· महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
· टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.
========================
लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...