Thursday, 6 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०६ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०६ जून २०१९ .
● ०७ जून: जागतिक अन्न सुरक्षा दिन
● संकल्पना २०१९ : " Food Safety , Everyone's Business "
● एफटीआयआयच्या दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता म्हणून जी. बी. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे
● बिकट अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या सैन्याने आपल्या अर्थसंकल्पात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे
● जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणून मुंबई अव्वल स्थानी : टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८
● जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरात नवी दिल्ली चौथ्या स्थानी : टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८
● शाकिब-अल-हसन २०० एकदिवसीय सामने खेळणारा बांगलादेशचा तिसरा खेळाडू ठरला आहे
● विराट कोहली सर्वात जलद ५० एकदिवसीय सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे
● न्युझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट एकदिवसीय सामन्यात १५० बळी घेणारा दुसरा सर्वात जलद गोलंदाज
● भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला ( १०८ सामने )
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्युझीलंडने बांगलादेशला २ विकेट्सनी पराभूत केले
● बंगळुरू रायनोजने इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग २०१९ चे विजेतेपद पटकावले
● दक्षिण कोरियाकडून दारिद्रयामुळे अडचणीत आलेल्या उत्तर कोरियाला ८ दशलक्ष डॉलरची मदत
● जी-२० देशांच्या अर्थमंत्र्यांची परिषद ८ जून रोजी जपान येथे आयोजित करण्यात आली
● अर्थमंत्री निर्मला सीतारामन जपान येथे होणाऱ्या जी-२० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार
● बांग्लादेशची प्रसिद्ध अभिनेत्री अंजू घोष हिने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे
● पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना घातलेली बंदी उठवली
● प्रसिद्ध अभिनेते दिनयार कॉन्ट्रैक्टर यांचे निधन , ते ७९ वर्षांचे होते
● विप्रोने अमेरिका स्थित कंपनी ' इंटरनेशनल टेक्नेग्रुप इंकारपोरेटेड ' ला ३१२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले
● उत्तराखंड चे अर्थमंत्री प्रकाश पंत यांचे निधन , ते ५८ वर्षांचे होते
● उत्सर्जन व्यापार सुरू करणारे गुजरात भारतातील पहिले राज्य बनले
● जागतिक बँकेने तमिळनाडूला आरोग्य देखभाल सुधारसाठी २८७ दशलक्ष अमेरिकन डाँलर्सचे कर्ज प्रदान केले
● थायलंडच्या संसदेने प्रयुत चन्-ओचा यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ति केली
● नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्टवरुन २ महिन्यांत ११००० किलो कचरा जमा केला
● ५ जूनपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत
● आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने २०१९ मध्ये चीनचा आर्थिक वाढीचा दर ६.२% असेल असा अंदाज वर्तवला आहे
● आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने २०२० मध्ये चीनचा आर्थिक वाढीचा दर ६% असेल असा अंदाज वर्तवला आहे
● भारतात दरवर्षी ५ वर्षाखालील १ लाख बालकांचा म्रुत्यु वायु प्रदुषणामुळे होतो : अहवाल
● इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदीची शिफारस केली आहे
● डॅनिलो पेट्रुसीने इटालियन ग्रँड प्रिक्स २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● २१ वी यूएसआयसी वर्ल्ड रेल्वे टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा बल्गेरिया येथे आयोजित करण्यात आली होती
● भारतीय संघाने २१ वी यूएसआयसी वर्ल्ड रेल्वे टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● प्रहलाद सिंग पटेल यांनी पर्यटन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला
● एलटी फायनान्शियल सर्व्हिसेसने ' डिजिटल सखी ' महिलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला
● आयसीआयसीआय बँकेने सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योगांसाठी बेंगलुरुमध्ये केंद्र सुरू केले
● भारतीय जूनियर महिला हॉकी टीम वॉन कॅंटोर फिट्झगेराल्ड अंडर-२१ इंटरनॅशनल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● जियानी इन्फँटिनो यांची फिफाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली
● २ रे जागतिक अपंगत्व शिखर सम्मेलन अर्जेंटिना येथे आयोजित करण्यात येणार
● चौथी चतुर्भुज सुरक्षा संवाद परिषद बँकॉक , थायलंड येथे आयोजित करण्यात आली
● सिद्धार्थ रावत ने आयटीएफ मेन्स फ्यूचर्स सिंगल्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
✅ यंदाच्या आर्थिक वर्षातील पतधोरण आज रिजर्व्ह बँकेने जाहीर केले आहे
● आरबीआयने आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये भारताचा जीडीपी दर ७% राहील असा अंदाज वर्तविला आहे
● रिजर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्क्यांने कपात केली , आता रेपो दर ५.७५ टक्के इतका झाला आहे
● रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस आणि एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे
● रिव्हर्स रेपो दर हा ५.५०% तर बँक रेट ६% इतका राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे .

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...