चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०५ जून २०१९ .
०५ जून २०१९ .
● ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन
● संकल्पना २०१९ : " Beat Air Pollution "
● जागतिक पर्यावरण दिन २०१९ चे यजमानपद चीन कडे आहे
● दक्षिण अफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
● जगातली सगळ्यात मोठी एलपीजी पाइपलाइन टाकण्यासाठी इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांनी करार केला आहे
● गुजरातमधल्या कांडलापासून ते उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरपर्यंत एलपीजीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे
● २,७५७ कि.मी लांबीची ही पाइपलाइन राजस्थान , गुजरात व उत्तरप्रदेश या तीन राज्यांना पश्चिम किनारपट्टीशी जोडणार
● काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला
● केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून अरविंद सावंत यांनी कार्यभार स्वीकारला
● केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ‘ सेल्फी विथ सॅपलिंग ’ या जनमोहिमेचा प्रारंभ केला
● भारतीय पर्यावरण खात्यातर्फे सेलिब्रिटींना घेऊन तयार करण्यात आलेलं ' हवा आने दे ' गाणं लाँच केले
● ३० जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाच्या नव्या जर्सीत उतरणार आहे : बीसीसीआय
● भारत आज सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिका संघाशी भिडणार
● भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण
● भारतातील दरडोई उत्पन्नात १० टक्के वाढ होऊन ते १०,५३४ रुपये प्रति महिना झाले आहे
● २०१८-१९ या वर्षात देशभरात ७१ हजार ५०० कोटी रुपयांच्या बॅंक गैरव्यवहारांची नोंद झाली आहे
● आंतरराष्ट्रीय पॉलीश ऑप्थॅल्मिक काँग्रेस पोलंडमध्ये आयोजित करण्यात आली
● डॉ. सायरस मेहता यांना ' प्रीस्बॅमेनीया ' पुरस्काराने गौरविण्यात आले
● केरळ सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठित जे सी डेनियल पुरस्कार दक्षिणात्य अभिनेत्री शिला यांना जाहीर
● श्रीराम सुब्रमण्यम यांना आंध्र प्रदेश नवीन अॅड. जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले
● मोतिबिंदु वर अचुक उपचार शोधणार्या डॉ. पेट्रिसिया बाथ यांचे निधन
● २०१८ मध्ये एच -१ बी व्हिसा मंजुरी १०% टक्क्यांने घटली : यूएस डेटा
● निती आयोग गव्हर्निंग कौन्सिलची ५ वी बैठक १५ जून रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली
● जी २० परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताला जपान कडून आमंत्रण प्राप्त झाले
● २०१९ अमेरिकन सिनेमॅथेक अवॉर्डसाठी चार्लिज थेरॉन यांची निवड करण्यात आली
● सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्रांच्या राज्यपाल पदी निवड केली जाऊ शकते : सुत्र
● गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना २०१९ चा ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड जाहीर
● नासडॅकच्या अध्यक्षा अॅडेना फ्रिडमैन यांना २०१९ चा जागतिक लीडरशिप अवॉर्ड जाहीर
● एप्रिल २०१९ मध्ये भारताची चहा निर्यात ११.५% वाढली : भारतीय चहा बोर्ड
● पुमा ने भारतीय फुटबॉलपटू गुरुप्रीत सिंह संधू ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली
● २०१९-२० साली भारताचा विकास दर ७.५% राहील : जागतिक बँक
● व्ही विजयसाई रेड्डी यांची लोकसभेत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली
● डेल भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून अव्वल स्थानी विराजमान : ब्रँड ट्रस्ट अहवाल
● एलआयसी भारतातील विश्वासार्ह ब्रँड म्हणून तिसऱ्या स्थानी विराजमान : ब्रँड ट्रस्ट अहवाल
● अमेझॉन भारतातील विश्वासार्ह ब्रँड म्हणून पाचव्या स्थानी विराजमान : ब्रँड ट्रस्ट अहवाल
● भारताच्या ५ जी स्पेक्ट्रम किंमत जागतिक दरापेक्षा ४०% जास्त : सीओएआय
● निवडणूक आयोग अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-कश्मीर विधानसभेचे निवडणुक वेळापत्रक घोषित करणार
● २०२३ एशियन कप फुटबॉल टूर्नामेंटचे यजमानपद चीनला देण्यात आले
● वाइस एडमिरल अजेंद्र बहादुर सिंह यांना इंटेग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख्य म्हणून नियुक्त करण्यात आले
● एचडी विश्वनाथ यांनी जनता दल सेक्युलर (जेडीएस) कर्नाटकचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला
● अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी २७ जूनला पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत
● जागतिक पर्यावरण दिनी गुजरात सरकारने ' उत्सर्जन व्यापार योजना ' सुरु केली
● अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीच्या सदस्या म्हणून रोमिला थापर यांची निवड झाली
● पर्वतारोही अमूल्य सेन यांचे नुकतेच निधन झाले
● प्रशांत कुमार यांची झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली
● मृत्युंजय महापात्र यांची भारतीय हवामान खात्याचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली
● त्रिनिदाद आणि टोबॅगोला भारताचे राजदूत म्हणून अरुण साहू यांची नियुक्ती करण्यात आली
● त्रिनिदाद आणि टोबॅगोला भारताचे राजदूत म्हणून अरुण साहू यांची नियुक्ती करण्यात आली
● क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे संचालक म्हणून रिचर्ड फ्रायडेस्टाईन यांची नियुक्त करण्यात आली
● पासंग दोरजी सोना यांची अरुणाचल विधानसभेचे सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली .