Monday, 3 June 2019

Political science


लोकमान्य टिळक यांचा उल्लेख


चालु घडामोडी वन लाईनर्स , ०३ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०३ जून २०१९ .
● ०३ : जागतिक सायकल दिन
● अमेरिकेच्या ‘व्हिसा’साठी अर्ज करताना आता सर्वानाच समाजमाध्यमांच्या वापराची माहिती द्यावी लागेल
● पश्चिम बंगालमधील महाविद्यालयांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जात विद्यार्थ्यांना त्यांचा धर्म जाहीर न करण्याची मुभा देण्यात आली आहे
● एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला
● २०१९ क्रिकेट विश्वचषक सामन्यात बांग्लादेशने दक्षिण अफ्रिकेला २१ धावांनी पराभूत केले
● ३३० धावा वन-डे आणि विश्वषचकातील बांगलादेशची आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या ठरली
● अँपल ची लोकप्रिय iTunes सर्विस लवकरच होणार बंद
● तामिळनाडू सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे
● ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरवर पॅरिसमध्ये एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे
● श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येत्या १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे
● देशभरातील 84 विमानतळांवर मार्च 2020 पर्यंत बॉडी स्कॅनर बसविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत
● हिमाचल प्रदेशने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी १० टक्के आरक्षण लागू केले
● केंद्र सरकार आसाम ला १००० एनआरसी न्यायाधिकरणांची स्थापना करण्यास मदत करणार
● ४ दिवसीय आंतरराष्ट्रीय शिमला उन्हाळी महोत्सव ३ जूनपासून सुरू होणार आहे
● मुंबई येथे एलिफंटा महोत्सव आयोजित करण्यात आला
● ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बीजापूर मतदारसंघातून राजीनामा दिला
● ऑल इंडिया कनिष्ठ रँकिंग बँडमिटन स्पर्धा थिरुअनंतपुरममध्ये आयोजित करण्यात आली
● मैंसनाम मईराबा ने ऑल इंडिया कनिष्ठ रँकिंग बँडमिटन स्पर्धेत १९ वर्षाखालील विजेतेपद पटकावले
● मालविका बनसोड हिने ऑल इंडिया कनिष्ठ रँकिंग बँडमिटन स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींचे विजेतेपद पटकावले
● शाकिब अल हसन एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा आणि २५० विकेट्स पुर्ण करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे
● रॉजर फेडरर फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंट २०१९ च्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल
● राफेल नडाल फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंट २०१९ च्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल
● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुरक्षेची पाहणी करण्यासाठी आज श्रीनगर व सियाचिन ला भेट देणार आहेत
● १५ वा वित्त आयोग आज मेघालयला भेट देणार आहे
● अल्जेरियाने ४ जुलै रोजी होणारी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक रद्द केली
● कॅनडाने व्हेनेझुएलामधील त्याचे दूतावास तात्पुरते बंद करत असल्याची घोषणा केली
● इस्लामिक सहकारी संघटनने (ओईसी)
जम्मू-काश्मीरसाठी विशेष दूत म्हणून यूसेफ अल्डोबे यांची नियुक्ती केली
● अल साल्वाडोरचे राष्ट्रपती म्हणून नयिब बुकेले यांनी शपथ घेतली
● इम्रान ताहीर १०० एकदिवसीय सामने खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फिरकीपटू बनला
● द्विपक्षीय वार्तेसाठी नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेपाळला आमंत्रित केले
● २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम रांचीमध्ये आयोजित. करण्यात येणार आहे
● एससी / एसटी युवकांना सशक्त करण्यासाठी केरळ सरकारने रेडिओ टॅक्सी सेवेचा शुभारंभ केला
● ५ जुलैपासून युनिव्हर्सल टेनिस रेटिंग स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित करण्यात येणार
● पीनाकी मिश्रा यांची लोकसभेत बीजेडी संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केरण्यात आली
● भारतीय वायु सेनाप्रमुख बी एस धनोआ ३ जूनपासून ४ दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावर रवाना होणार आहे
● १ लाखपेक्षा अधिक यात्रेकरुंनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे
● साउथ आफ्रिकन एअरवेज चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हुयनी जराना यांनी राजीनामा दिला
● शिवकोझुनठु यांची पुडुचेरी विधानसभा सभापती म्हणून नियुक्ति करण्यात आली
● आशियाई विकास बँकेने छत्तीसगड रोड सुधार प्रकल्पासाठी ३५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मंजूर केले
● जागतिक आरोग्य संघटनेने राजस्थान आरोग्य विभागाला तंबाखू नियंत्रणासाठी पुरस्काराने सन्मानित केले
● पंजाब सरकारने स्वच्छता रेटिंगशिवाय ऑनलाइन अन्न वितरणावर बंदी घातली
● जनता दल युनायटेडच्या ८ नवीन मंत्र्यांना बिहार कॅबिनेटमध्ये समाविष्ट करण्यात आले
● अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली
● ५ जूनपासून किंग्स कप फुटबॉल स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित केली जाणार .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...