चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०१ जून २०१९ .
०१ जून २०१९ .
● ०१ जून : जागतिक पालक दिन
● संकल्पना २०१९ : “ Honor Your Parents ”
● ०१ जून : विश्व दूध दिवस
● संकल्पना २०१९ : " Drink Milk : Today & Everyday "
● ०१ जून : आंतरराष्ट्रीय बाल दिन
● फिक्कीने २०१९-२० साली भारताचा वृद्धीदर ७.१% एवढा असण्याची शक्यता वर्तवली आहे
● २०१७-१८ या आर्थिक वर्षात बेरोजगारीचा दर ६.१ टक्के : सांख्यिकी मंत्रालय
● विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकारांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावे जमा झाला आहे ( ४० षटकार )
● फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह अत्याधुनिक हॉक जेट विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे
● क्रिकेट विश्वचषक २०१९ च्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने ७ गडी राखून पाकिस्तानवर मात केली
● किरेन रिजिजू यांच्याकडे क्रिडा खाते सोपविण्यात आले
● पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमार्फत देशातील सर्व शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहे
● माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे
● जानेवारी ते मार्चच्या तिमाहित आर्थिक विकासदर घसरून 5.8 टक्क्यांवर आला आहे : अहवाल
● मार्च २०१८ ते मार्च २०१९ या आर्थिक वर्षाचा विकासदर ६.८ टक्क्यांवर आला आहे : अहवाल
● अमेरिकेकडून भारताचा व्यापार अग्रक्रम दर्जा (जीएसपी) काढून घेण्याचा निर्णय झाला आहे
● पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जूनला श्रीलंका भेटीवर जाणार आहेत
● १७ व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन १७ जूनपासून सुरू होत असून २६ जुलैपर्यंत चालणार आहे
● केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करतील
● नवे नौदलप्रमुख म्हणून ऍडमिरल करमबीर सिंह यांनी कार्यभार स्वीकारला
● परवानगीशिवाय अनधिकृत टी-20 लीगमध्ये खेळल्याबद्दल बीसीसीआयने रिंकू सिंगवर बंदी घातली
● परकी चलनसाठा १.९९ अब्ज डॉलरने वाढत ४१९.९९ अब्ज डॉलरवर पोहचला
● ओडिशा विधानसभा सभापती म्हणून सुर्या पेट्रो यांची नियुक्ती करण्यात आली
● टांझानियाने प्लास्टिक उत्पादन , विक्री व वापरावर पुर्णपणे बंदी घातली
● पश्चिम बंगाल सरकारने दार्जिलिंगचे जिल्हाधिकारी संजय बन्सल यांना पदावरून हटवले
● पश्चिम बंगाल सरकारने दार्जिलिंगचे जिल्हाधिकारी म्हणून जाँयशी दासगुप्ता यांची नियुक्ती केली
● काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती करण्यात आली
● जागतिक बँकेने २०१९ साली चीनचा वृद्धीदर ६.२% एवढा असण्याची शक्यता वर्तवली आहे
● भारतातील मुख्य क्षेत्रातील उद्योगांची वाढ एप्रिल २०१९ मध्ये २.६% पर्यंत घसरली
● प्रियंका वर्मा लिखित द्वितीय ' Girl In The City ' उपन्यास प्रकाशित
● २ री आंतरराष्ट्रीय तायक्वोंडो चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धा हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणार
● इंटर मिलन ने मुख्य प्रशिक्षक पदी एंटोनियो कॉन्टे यांची नियुक्ती केली
● वेदांता लिमिटेड ने एमके शर्मा यांना गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले
● पाकिस्तानी अतिरिक्त अटॉर्नी जनरल जाहिद एफ इब्राहिम यांनी राजीनामा दिला
● फिलीपाईन्स मध्ये पदवीधर विद्यार्थ्याला आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान १० झाडं लावाली लागणार आहेत
● फीलीपाईन्सच्या केंद्र सरकारने ग्रॅज्युएशन लेगसी फ़ॉर द एनव्हायरमेंट या नावाने हा कायदा पारित केला आहे
● राजस्थान सरकारने राज्यात ई-सिगारेट वर बंदी घातली
● बांग्लादेश ऑक्टोबरमध्ये यूईएफए १६ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करणार
● २०१८-१९ या वर्षात आर्थिक तूट ३.३९% वर पोहचली
● टाटा पॉवर गुजरातमध्ये १०० मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
● केरळ सरकारने " हरिथदृष्टी " मोबाइल अॅप लाँच केले
● १९ जून रोजी लोकसभा सभापतीची निवडणूक होणार आहे
● लालपरी म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापन दिन आज १ जून रोजी साजरा करण्यात येत आहे
● प्रल्हाद सिंग पटेल यांची भारताचे पर्यटन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली
● आंध्रप्रदेशचे नवीन पोलिस महानिरीक्षक म्हणून गौरव सारंग यांची नियुक्ती करण्यात आली
● तमिलनाडु मुक्त विद्यापीठाचे उपकुलपती म्हणून के. पार्थसारथी यांची नियुक्ती करण्यात आली
● आशिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन सरचिटणीस म्हणून विन्स्टन ली यांची नियुक्ती करण्यात आली
● फ्लिपकार्टचे सचिन बंसल यांची उज्ज्वान स्मॉल फायनान्स बँकेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● रमेश पोखरियाल यांची मानव विकास संसाधन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली .