चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२७ मे २०१९ .
२७ मे २०१९ .
● २५ मे : जागतिक थायरॉईड दिन
● चीनने जपानला पराभूत करत सुदीरमन बँडमिटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● १२३ वी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पॅरीस येथे आयोजित करण्यात आली
● अपूर्वी चंडेला ने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
● व्हॅलेंसिया ने बार्सिलोना ला पराभूत करत कोपा डेल रे चषकावर कब्जा केला
● केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय यांचे विलिनीकरण करुन ' राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ' निर्माण करण्यात येणार आहे
● लोकसभेचे पहिले संसदीय अधिवेशन ५ ते १५ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे
● एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे
● नॉर्थ मुंबई पँथर्स संघाने टी-२० मुंबई लीगच्या दुसऱ्या मोसमाचे विजेतेपद पटकावले
● अमेरिकी देश पेरुच्या उत्तर मध्य भागाला ८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला
● ड्यूश बँकेने जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांक प्रकाशित केला
● जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांकात ५६ देशांचा समावेश करण्यात आला आहे
● जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांकात स्वित्झर्लंडमधील ' झुरीच ' हे शहर अव्वल स्थानी आहे
● जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांकात वेलिंग्टन हे शहर दुसऱ्या स्थानी आहे
● जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांकात कोपनहेगन हे शहर तिसऱ्या स्थानी आहे
● जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांकात मनिला हे शहर ५४ व्या स्थानी आहे
● जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांकात बिजिंग हे शहर ५५ व्या स्थानी आहे
● जागतिक सर्वोच्च दर्जाचे जीवन निर्देशांकात लागोस हे शहर ५६ व्या ( शेवटच्या ) स्थानी आहे
● एल वी नवनीथ यांची " द हिंदू " च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली
● अनुज शर्मा यांची कोलकाता पोलिस आयुक्त पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली
● ओडिशातील नव्याने निवडलेल्या खासदारांपैकी ३३% महिला आहेत
● अर्थशास्त्री गीतानास नाउसेदा यांची लिथुआनियाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली
● हिमंता बिस्वा शर्मा यांची बॅडमिंटन एशिया कौन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● 72 वी जागतिक आरोग्य सभा जिनेवा येथे आयोजित करण्यात आली
● बलराम भार्गव यांना सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी २०१९ चा डॉ ली जोंग-वुक मेमोरियल पुरस्कार जाहीर
● अखिल भारतीय कनिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धा चेन्नई येथे संपन्न
● समिया इमाद फारूकीने अखिल भारतीय कनिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींचे विजेतेपद पटकावले
● माईसनाम मेईराबा ने अखिल भारतीय कनिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांचे विजेतेपद पटकावले
● पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसर्या टप्प्यातील पहिल्या विदेश दौऱ्यात मालदीवला भेट देणार आहेत
● पश्चिम बंगाल सरकारकडून दिला जाणारा " नझरुल पुरस्कार " डॉ. तपन बागची यांना जाहीर
● सिक्किमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून प्रेम सिंह गोले हे शपथ घेणार आहेत
● पाकिस्तानमधील ऐतिहासिक ' गुरु नानक पॅलेस ' नष्ट करण्यात आले
● नोबेल विजेते भौतिकशास्त्री मर्रे गेल-मॅन यांचे निधन , ते ८९ वर्षांचे होते
● चीनचे उपराष्ट्रपती वांग किशान हे ३ दिवसीय अधिकृत पाकिस्तान दौऱ्यावर आहेत
● लुईस हॅमिल्टन ने मोनाको ग्रँड प्रिक्स २०१९ स्पर्धा जिंकली
● स्वीडन आँक्टोबर २०२० मध्ये विरोधी लढा देण्यासाठी जागतिक नेत्यांच्या परिषदेचे आयोजन करणार
● केंद्र सरकारने बायो-इंधन आयात प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे
● मध्यप्रदेशाच्या " ओरछा " चा UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश
● कान्स चित्रपट महोत्सव १४ मे ते २५ मे दरम्यान कान्स , फ्रान्स येथे संपन्न
● दक्षिण कोरियन दिग्दर्शक बोंग जोन यांचा चित्रपट ' पैरसाइट " ला कान्स चित्रपट महोत्सवात Palme d'Or पुरस्कार प्रदान
● ७२ व्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून " अँटोनियो बेंडरस " ची निवड करण्यात आली
● ७२ व्या कान्स चित्रपट महोत्सवात जीन पियरे व लुक डर्डेन यांना बेस्ट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले
● ७२ व्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून " एमिली बीचम " ची निवड करण्यात आली
● पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान पीटर ओ'नील यांनी राजीनामा दिला
● पापुआ न्यू गिनीचे नवीन पंतप्रधान म्हणून ज्युलियस चॅन यांची नियुक्ती करण्यात आली
● ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा नवीन पटनायक २९ मे रोजी शपथ घेणार .