Friday, 24 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २४ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२४ मे २०१९ .
● २३ मे : जागतिक कासव दिवस
● संकल्पना : " Save Turtles "
● २३ मे : International Day Of End Obstetric Fistula
● संकल्पना २०१९ : " Fistula Is A Human Rights Violation , End It Now "
● शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांना पराभूत करत विजय मिळवला
● औरंगाबाद मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांना पराभूत करत विजय मिळवला
● पूर्व दिल्ली मतदारसंघातून गौतम गंभीर यांनी अरविंदर सिंह लवली यांना पराभूत करत विजय मिळवला
● लोकसभेत निवडून जाणारा गौतम गंभीर पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे
● अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत करत विजय मिळवला
● राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी ४ लाख २९ हजार १६१ मताधिक्यांनी विजयी
● नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वेळी स्पष्ट बहुमतासह सत्तेत दाखल होण्याचा मान मिळविला
● चिन्मय प्रभूने पाण्यात १ मिनिट ४८ सेकंदात ९ क्यूब सोडवुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्मध्ये आपले नाव नोंदवले
● गांधीनगरमधून अमित शहा विक्रमी 5 लाख 11 हजार 180 मतांनी विजयी झाले
● शिवा थापा इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या ६० किलो गटाच्या अंतिम फेरीत दाखल
● मेरी कोम इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या ५१ किलो गटाच्या अंतिम फेरीत दाखल
● सचिन सिवाच इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या ५२ किलो गटाच्या अंतिम फेरीत दाखल
● अमित पांघल इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या ५२ किलो गटाच्या अंतिम फेरीत दाखल
● मनीष कौशिक इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या ६० किलो गटाच्या अंतिम फेरीत दाखल
● नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपने सर्व २६ जागा जिंकल्या
● 8 वी भारत-म्यानमार समन्वयित गस्त अंदमान-निकोबार येथे आयोजित करण्यात आली
● इंद्रा नूयी यांना प्रतिष्ठित येल विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान
● पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा 30 मे रोजी पार पडण्याची शक्यता आहे
● स्टारबक्सच्या वतीने दक्षिण चीनमधील गंग्झाऊ प्रांतामध्ये ' सायलेंट कॅफे ' सुरु करण्यात आला आहे
● वायएसआर काँग्रेस चे जगनमोहन रेड्डी ३० मे रोजी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
● नरेंद्र मोदी २६ मे रोजी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत
● इंग्लंडमध्ये एप्रिल २०२० पासून एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार
● सोनी कंपनी आता भारतात स्मार्टफोन विक्री करणे थांबवणार
● पाकिस्तानच्या निदा दारने २० चेंडूमध्ये ५० धावा करत महिला टी-२० क्रिकेटमधील दुसरे वेगवान अर्धशतक पुर्ण केले
● पाकिस्तानी कलाकार नलिनी मालानी यांनी ७ वा जोआन मिरो आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
● ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा नवीन पटनायक यांची निवड
● मायक्रोसॉफ्ट ने इंग्लिश लर्निंग अँप " Read My World " लाँच केले
● एप्रिल २०१९ मध्ये पाकिस्तान मधील महागाईचा दर ९.४१% इतका वाढला आहे
● टीसीएस ला अमेरिकन बिझिनेस अवार्ड्स २०१९ मध्ये ४ विभागात पुरस्कार प्रदान करण्यात आले
● फिशिंग होस्टिंग नेशन्सच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे : अहवाल
● अमेरीकेच्या प्रतिबंधानंतर भारताने इराणकडून तेल खरेदी करणे पुर्णपणे थांबविले : अहवाल
● जपानी ब्रँड असही कासेईसाठी अमृता रायचंद यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती
● तिरंदाजी विश्वचषक स्टेज III स्पर्धा तुर्की येथे आयोजित करण्यात आली
● हीरो इंडियन महिला लीग फुटबॉल टूर्नामेंट चे आयोजन लुधियाना , पंजाब येथे करण्यात आले
● सेतु एफसी संघाने हीरो इंडियन महिला फुटबॉल लीग टूर्नामेंटचे विजेतेपद पटकावले
● ५७६ वी आरबीआय केंद्रीय मंडळ बैठक चेन्नई येथे संपन्न
● जागतिक आरोग्य संघटनेकडून अल्जेरिया व अर्जेंटिना मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित
● चौथी ग्रीन सस्टेनेबल केमिस्ट्री कॉन्फरन्स जर्मनी येथे आयोजित करण्यात आली
● भारतीय शास्त्रज्ञ ए पटवर्धन यांना ' जर्मन केमिस्ट्री प्राइज ' ने सन्मानित करण्यात आले
● आयटीएफ पुरुष फ्यूचर्स टेनिस स्पर्धा कंपाला , युगांडा येथे आयोजित करण्यात आली
● अनिरुद्ध चंद्रसेकर आणि निकी पुनाचा यांनी आईटीएफ पुरुष फ्यूचर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● रविचंद्रन अश्विन सोबत नॉटिंगहॅमशायर संघाने ६ सामन्यांसाठी करार केला
● मार्सेलो लिपिने यांची पुन्हा चीन फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● पवनकुमार चामलिंग यांच्या सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचा २५ वर्षांनंतर सिक्कीम मध्ये पराभव
● ताजमहल पहिले भारतीय वारसा स्थान जेथे स्तनपान कक्ष उपलब्ध करुन देण्यात आले
● जर्मन अलेक्झांडर झवेरव्हने जिनेव्हा ओपन २०१९ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला .

भारतीय रेल्वे विभाग

 भारतीय रेल्वे विभाग :
  विभाग    - केंद्र  -   स्थापना
1) मध्य विभाग
▪️ मुंबई - सन 1951
2) पश्चिम विभाग
▪️ मुंबई - सन 1951
3) उत्तर विभाग
▪️ दिल्ली - सन 1952
4) दक्षिण विभाग
▪️ चेन्नई - सन 1951
5) पूर्व विभाग
▪️ कलकत्ता - सन 1955
6) दक्षिण पूर्व विभाग
▪️ कलकत्ता - सन 1955
7) दक्षिण-मध्य
▪️ सिकंदराबाद - सन 1966
8) उत्तर पूर्व विभाग
▪️ गोरखपूर - सन 1952
9) सरहद्द रेल्वे
▪️ गोहाटी - सन 1958
10) पूर्व किनारपट्टीय विभाग
▪️ भुवनेश्वर - सन 1996
11) उत्तर मध्य विभाग
▪️अलाहाबाद - सन 1996
12) पूर्व मध्य विभाग
▪️ हाजीपूर - सन 1996
13) उत्तर पश्चिम विभाग
▪️ जयपूर - सन 1996
14) पश्चिम मध्य विभाग
▪️ जबलपूर - सन 1996
15) दक्षिण पश्चिम विभाग
▪️ बंगलोर - सन 1996
16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग
▪️ बिलासपुर - सन 1998
17) कलकत्ता मेट्रो
▪️ कलकत्ता - सन 2010
18) दक्षिण किनारी रेल्वे
▪️ विशाखापट्टणम, सन - 2019

🔷विमान वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या🔷

विमान वाहतूक सेवा  देणाऱ्या कंपन्या
1) एअर इंडिया  -
●आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी कंपनी
●मुख्यालय -मुंबई
2) इंडिया एअरलाईन
●देशांतर्गत विमानसेवा देणारी कंपनी
●मुख्यालय- दिल्ली
3)नॅशनल एव्हीयशन कंपनी ऑफ इंडिया लि.
●एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स तयार झालेली कंपनी ....
●या कंपनीचे ब्रॅण्ड नाव एअर इंडिया म्हणून स्वीकारण्यात आले आहे .
4)पवनहंस हेलिकॉप्टरर्स लि.[1985]
●पेट्रोलियम क्षेत्रात हेलीकॉप्टर सेवा पुरवण्याचे काम ही कंपनी करते.
5) वायुदूत मर्यादा [1981]
● प्रादेशिक हवाई सेवा देणारी कंपनी

भारतातील राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्प

भारतातील राष्ट्रीय जलविद्युत  प्रकल्प
पेरियार प्रकल्प ..........पेरियार नदी
श्रीशैलम प्रकल्प........ कृष्णा नदी
मयुराक्षी प्रकल्प ..........गंगा नदी
मैचूर योजना ...........कावेरी नदी
अलमट्टी प्रकल्प......... कृष्णा नदी
कृष्णराजसागर.......कावेरी नदी

भारतातील प्रमुख अभयारण्य


Latest post

महत्वाचे इतिहास प्रश्न

१. इबादत खाना का बांधण्यात आला?  अ. धर्मांवर चर्चा करणे ब. राज्याच्या चर्चेसाठी C. लोकांशी संवाद साधण्यासाठी D. यापैकी काहीही नाही  उत्तर: अ...