चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१२ मे २०१९ .
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
🌸💕राष्ट्रगीताबद्दल माहिती💕🌸
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.
५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.
७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.
८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.
९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.
१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.
१. डॉ. अम्ब्रीश मिथल -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...