Monday, 30 December 2019

UPSC मार्फत रेल्वेमध्ये सर्व नवीन भरती करण्यात येणार

🌷भारतीय रेल्वेमध्ये होणारी सर्व नवीन भरती आता पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत केली जाणार आहे. याबाबत सुधारणा करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या आठ संवर्गांचे एकाच मंडळात विलीनीकरण करून नवे ‘भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा’ (IRMS) हा संवर्ग तयार करण्याला मान्यता दिली आहे.

🌿मंडळाविषयी:-

🌷IRMS मंडळ ही एकमेव संस्था असेल जी उमेदवाराद्वारे अर्ज भरताना सूचित केलेली पसंती लक्षात घेणार.नवीन व्यवस्थेनुसार, नव्या विस्तारीत मंडळात रेल्वे मंडळाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असणार. त्याव्यतिरिक्त रेल्वेकडेचे 4 सदस्य आणि उर्वरित स्वतंत्र सदस्य असणार. हे सदस्य वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रातली 30 वर्षांचा अनुभव असलेले अत्यंत प्रतिष्ठित व्यवसायिक असणार आहेत.

🌷स्वतंत्र सदस्य मंडळाच्या बैठकीत उपलब्ध असणार परंतू ते रेल्वेच्या दैनंदिन कारभारात नसणार.पुढे होणारी सेवा भरती सुलभ करण्यासाठी ‘कार्मिक व प्रशिक्षण विभाग’ आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्याशी सल्लामसलत करून नवीन सेवा तयार केली जाणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी

🌷भारत सरकारचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या संस्थेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातली कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

🌿भारतीय रेल्वे विषयी:-

🌷भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.

🌷भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

🌷भारतात पहिली रेल्वेगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

🌷1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

🌷आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

No comments:

Post a Comment