२४ डिसेंबर २०१९

त्रिपुरा राज्याला पहिले विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) मिळाले

- कृषी-पूरक उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने त्रिपुरा राज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) तयार करण्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. ते राज्यातले पहिलेच विशेष आर्थिक क्षेत्र असेल.

- त्रिपुरा राज्यामधले प्रस्तावित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पश्चिम जलेफा (सबरूम, दक्षिण त्रिपुरा जिल्हा) येथे स्थापन केले जाणार. हे ठिकाण राजधानी आगरतळा या शहरापासून 130 कि.मी. अंतरावर आहे.

▪️ठळक बाबी

- प्रकल्पातली अंदाजे गुंतवणूक सुमारे 1550 कोटी असणार आहे. या क्षेत्राच्या विकासामुळे 12,000 कुशल रोजगार तयार होण्याचा अंदाज आहे.

- या क्षेत्राचा विकास त्रिपुरा औद्योगिक विकास महामंडळ (TIDC) करणार आहे.

- या क्षेत्रात अन्नप्रक्रियेसाठीचे उद्योग उभारले जातील. अन्नप्रक्रियेसोबतच रबर उद्योग, वस्त्रोद्योग, बांबू उद्योगांची या क्षेत्रात भर असेल.

▪️विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) म्हणजे काय?

- विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे खास आखून दिलेला करमुक्त प्रदेश होय. भारत सरकारने सन 2000 मध्ये SEZ धोरण आखले आणि 2005 साली SEZ कायदा करण्यात आला.

- SEZ मधील कोणत्याही प्रकाराच्या म्हणजेच जमीन, शेती, पडीक जमीन, नद्या, तलाव, भूजल अश्या स्त्रोतांवर राज्य वा केंद्र सरकार, ग्रामपंचायत किंवा इतर घटनात्मक संस्थांचा कोणताही अधिकार नसतो. तो एक स्वतंत्र आणि स्वायत्त भूप्रदेश असतो. या आर्थिक क्षेत्राचा कारभार हा पूर्णपणे खासगी असतो आणि त्यासाठी प्रशासकीय मंडळ असते.

-  गुंतवणूकदार, परकीय उद्योग यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून असे धोरण आखले जाते. हा ‘व्यवसाय सुलभतेचा’ एका भाग आहे.
-------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...