🎆 डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे.
🎆 त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.
🎆 भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.
🎆 त्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे.
🎆 तर पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे.
🎆 हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे.
🎆 हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज करु शकता. यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
🎆 एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु शकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही.
🎆 यातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडूनकिंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.
🎆 तसेच या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.
🎆 या पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता येणार आहे.
🎆 हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत.
No comments:
Post a Comment