NITI आयोगाने सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) यामध्ये प्रथिनेयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करण्यासाठीची योजना तयार केली आहे. त्यात मासे, कोंबडी आणि अंडी समाविष्ट करण्याच्या पर्यायांवर विचार केला जात आहे.
2020 साली प्रकाशित होणार्या NITI आयोगाच्या ‘15-इयर्स व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये या बाबीचा समावेश असण्याची शक्यता आहे. ते 1 एप्रिल 2020 पासून प्रभावी होणे अपेक्षित आहे.
देशातल्या सामान्य नागरिकांना योग्य पोषण मिळावे या उद्देशाने प्रथिनेयुक्त अन्नपदार्थ स्वस्त दराने उपलब्ध करून दिले जाणार.
ठळक बाबी
🔸सध्या रेशन दुकानातून स्वस्त दरात तांदूळ, गहू, साखर आणि तेल हे पदार्थ वितरित केले जात आहेत.
🔸अन्नधान्न्यांच्या उत्पादनात भारत जवळपास स्वयंपूर्ण आहे. परंतू पोषणाच्या बाबतीत देश मागे आहे आणि उपासमारीत देश पुढे आहे.
🔸संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते 195 दशलक्ष भारतीय कुपोषित आहेत. जागतिक उपासमारीपैकी एक चतुर्थांश भार भारतावर आहे.
No comments:
Post a Comment