Sunday, 31 December 2023

MPSC राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी यशाचा राजमार्ग

     अभ्यास सुरू करताना आजपर्यंत कसे प्रश्न विचारले गेले ते पाहावे आणि अभ्यास करताना मनातल्या मानत प्रश्न तयार करावेत त्याचबरोबर जो भाग लक्षात राहणार नाही अथवा महत्वाचा वाटतो त्याच्या शॉर्ट मध्ये नोट्स काढा..वाचताना घाई करू नका..शांतपणे समजून उमजून वाचा..एखादा कन्सेप्ट समजत नसेल तर आपल्या ज्याला चांगली त्या विषयावर पकड आहे त्यांना विचारा..त्यावर अधाररीत प्रश्न कोणत्याही मार्केटमधील प्रश्नसंच मधून सोडवा..
     आपण मागील परीक्षेत का fail झालो याची कारणे शोधा आणि ती एका डायरी मध्ये लिहा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा..अभ्यासासाठी छोटासा ग्रुप तयार करा..एकमेकांना नोट्स शेअर करा..खूप वेगवेगळ्या पुस्तकसूची आणि अभ्यासाच्या strategy मुळे गोंधळून जाऊ नका.कोणतेही तुम्हाला योग्य वाटेल ती वापरा.हि परीक्षा पास होण्याचा कोणताही एक विशिष्ट मार्ग नाही.वेगवेगळ्या मार्गाने यशस्वी होता येते.कोणतापण एक चांगला मार्ग निवडा.कोणतेही पुस्तकसूची वापरा.भरमसाठ पुस्तके खरेदी करू नका.कोणतेही एकच चांगले पुस्तक करा.हि परीक्षा पुस्तकांची परीक्षा नाही.आपण जे वाचले आहे त्यावर confident राहावा.खाली
     मी मोबाईल चा वापर कसा करता येईल ते लिहले आहे ते बघा तुम्हाला जमले तर use करा...किती तास अभ्यास केला यापेक्षा किती तो अभ्यास आत्मसात झाला यावर भर द्या..भरपूर प्रश्न हे शालेय पुस्तके,इकॉनॉमिक सर्व्हे, लोकराज्य मासिके,शासनाच्या वेबसाईट्स यावर आधारित असतात.त्यांचा चांगला अभ्यास करा...लक्षात घ्या हि तुमची आत्मविश्वासाची परीक्षा आहे..
      जे उमेदवार upsc आणि mpsc या दोघांचा अभ्यास करतात त्यांनी कोणत्यातरी एक परीक्षा द्यावी कारण दोघांचा अभ्यासक्रम, अभ्यास approach आणि परिक्षपद्धती मध्ये फरक आहे..जर तुम्ही upsc चा अभ्यास  सुरु केला नसेल तर mpsc द्या आणि जर तुमचा optional विषयाचा अभ्यास चांगला पूर्ण होत आला असेल तर  upsc करा..
        जे लोक नोकरी करत असतील त्यांना दिवसातून 5 ते 6 तास अभ्यास suffucient राहील....आणखी   या क्षेत्रात  नव्याने येणाऱ्या उमेदवारांनी जर तुमचा खरंच इंटरेस्ट असेल तर तयारी करा.competition खूप वाढले आहे आणि जागा त्या प्रमाणात कमी आहेत.अनिश्चितीता वाढली आहे..तुमचे आवडते क्षेत्र निवडा(कोणी सांगितले म्हणून अथवा कोणतातरी जाहिरात,विडिओ पाहून या क्षेत्रात येऊ नका)

प्रथमतः ही पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही..आपण कशासाठी आणि का अभ्यास करतो याची जाणीव आपणास सतत असणे आवश्यक आहे...परीक्षेचे स्वरूप पहा..अभ्यासक्रम पहा..कोणत्या विषयावर आपली कमांड नाही तो विषय पाहीले घ्या..एक विषय एकदाच घ्यायचा आणि अभ्यास पूर्ण करायचा..प्रश्न सोडवायचे.. शॉर्ट नोट्स काढायच्या आणि प्रत्येक विषयात पारंगत परीक्षेच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे..अभ्यासाबरोबर स्वतःवर विश्वास आणि कंट्रोल असणे आवश्यक आहे

जर अभ्यास करताना एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा प्रथम बेसिक चांगले करून घ्या
--अभ्यास करताना घाई करू नका
--जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक घेऊ नका
--आपल्या मित्रकडून समजून घ्या
--त्या टॉपिक च्या शॉट मध्ये नोट्स काढा
जास्तीतजास्त प्रश्न सोडवा
मुख्य परीक्षेला जवळजवळ 40% भाग हा पूर्व परीक्षेतील syllabus मध्ये आहे..जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याचा दररोज अभ्यास करा..कोणताही विषय optionla नका ठेऊ..अजून भरपूर वेळ आहे..सर्व कव्हर करू शकता..दररोज केलेल्या अभ्यासाची त्याच दिवशी revision करा(9pm rule--रात्री 9 नंतर कोणताही नवीन टॉपिक  वाचायचा नाही दिवसभर केलेल्या अभ्यासाची revision करायची..दररोज आपण काय अभ्यास करणार आहोत याची सकाळीच तयारी करायची आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करायचा..त्यामध्ये किती pages वाचणार असे नसावे तर syllabus चा किती भाग पूर्ण करणार असे नियोजन असावे..आपण केलेला अभ्यास फावल्या वेळेत आपल्या मित्राला सांगणे आपण काय अभ्यास केला ते..सांगितल्यामुळे अभ्यास आणखी पक्का होतो..
  


MPSC राज्यसेवा पूर्व मागील 2013  ते  2020 पर्यंत 🙏cut off... 🤔🤔


♦️2013- 177


♦️2014- 138


♦️2015- 125


♦️2016- 153


♦️2017- 189


♦️2018- 247


♦️2019- 197


♦️ 2020- 203.50


⚠️ मागील वर्षी चे cut off तुम्हाला idea यावी म्हूणन share केलेले आहेत..


No comments:

Post a Comment