Wednesday, 3 January 2024

वृक्क (Kidney)

आपल्या शरीरात दोन्ही बाजूस एक अशा दोन वृक्क असतात. वृक्कांचा आकार घेवड्याच्या बियांसारखा असून रंग लालसर तपकिरी असतो.वृक्कांची लांबी 10 ते 12 cm असून रुंदी 6 cm तर जाडी  4 cm असते.वृक्काचे वजन पुरुषांमध्ये 125-170 g असून स्त्रियांमध्ये 115-155 g असते.वृक्काच्या बाह्य आवरणाला वलकुट (Cortex) असे म्हणतात. त्यामध्ये 8-18 पिरॅमिड / शंक्वाकृती घटक असतात, त्यांना मध्यांश (Medulla) असे म्हणतात.मध्यांशासमोर मूत्रवाहिनेचे श्रोणी (Pelvis) नावाचा भाग असतो. तेथून वृक्काला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरविणारी वृक्क धमनी (Renal Artery) आत शिरते तर कार्बन डायॉकसाईड रक्त वाहून नेणारी वृक्क शीर (Renal Vein) बाहेर निघते.प्रत्येक मध्यांशामध्ये एक लाख याप्रमाणे प्रत्येक वृक्कात सुमारे 10 लाख मूत्र जनक नलिका असतात. त्यांना वृक्कानू (Nephron) म्हणतात.
वृकानुमध्येच अशुध्द रक्त गाळण्याची मूलभूत क्रिया घडून येते.उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते कारण त्याच्या वर यकृत ग्रंथी असते.आपल्या शरीरातील रक्त वृक्कामधून दररोज 400 वेळा गाळले जाते. म्हणजे एका मिनिटाला 125 मिली एवढे रक्त गाळले जाते.आपले वृक्क दररोज साधारणपण

💥वृक्काचे कार्य (Functions Of Kidney)

1) रक्तातील चयापचय क्रियेत तयार झालेले अमोनिया, युरिया व युरिक आम्ल यासारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे.

2) रक्तातील अयनांचे प्रमाण संतुलित ठेवणे.

3) रक्ताचा सामु (pH) संतुलित ठेवणे.

4) रक्ताचा परासरण दाब आणि आकारमान नियंत्रित करणे.

5) वृक्कामधून क्लीस्ट्रायॉल आणि एरिथ्रो पायोटीन हि संप्रेरके तर रेनिन हे विकार तयार होते.

6) वृक्कमुळे शर्करा, अमिनो आम्ले आणि पाणी यांचे पुनःअवशोषण घडून येते.

7) वृक्कमुळे आम्ल-आम्लरींचे संतुलन तसेच रक्तदाब नियंत्रित केला जातो.

8) वृक्कामुळे बायकार्बोनेटचे (HCO3)

9) ADH (Anti Diuretic Hormone) या वृक्कातील संप्रेरकामुळे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...