◾️ तिमाहीला जीडीपी जाहीर केला जातो.
◾️भारताच्या विकासदरात मोठी घसरण झाली आहे.
◾️चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतले विकासदराचे आकडे जाहीर झाले आहेत.
◾️ त्यानुसार दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 4.5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे.
◾️गेल्या आर्थिक वर्षात याच दरम्यान हा आकडा 7.1 टक्के होता.
◾️सलग दुसऱ्या तिमाहीत विकासदाराच्या आकड्यांमध्ये घट झाली आहे.
◾️ जीडीपीच्या आकड्यातली ही गेल्या 6 वर्षांतली सर्वांत मोठी घसरण आहे. पहिल्या तिमाहीत हा आकडा 5 टक्के होता.
✍GDP म्हणजे नेमकं काय, तो कसा ठरवला जातो?
✍जीडीपी म्हणजे नेमकं काय?
◾️कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे.
◾️एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.
◾️जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. देशांतर्गत झालेलं उत्पादन आणि सेवांचाच जीडीपीसाठी विचार होतो.
◾️कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो.
✍ प्रमाण वर्ष कोणतं?
◾️भारतात कॉन्स्टंट प्राइस अर्थात कायमस्वरूपी दरांच्या गणनेसाठी 2011-12 हे वर्ष प्रमाण मानण्यात येतं.
◾️उदाहरणार्थ 2011 मध्ये शंभर रुपये किमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या तर एकूण जीडीपी 300 रुपये होतो. 2019 वर्षापर्यंत उत्पादन दोनवर आलं मात्र किंमत दीडशे रुपये झाली तर नॉमिनल जीडीपी तीनशे रुपये झाला. मात्र प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली का?
◾️केंद्रीय सांख्यिकी संस्था ही सगळी माहिती एकत्रित करून जीडीपी जाहीर केला जातो.
No comments:
Post a Comment