Wednesday, 11 December 2019

दिवान हाऊसिंग फायनॅन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL): NCLT कडे जाणारी पहिली वित्तीय सेवा कंपनी


-  भारतीय रिझर्व्ह बँकेनी दिवान हाऊसिंग फायनॅन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या आर्थिक अडचणीत आलेल्या कर्जदात्या कंपनीला दिवाळखोरीच्या प्रक्रियेसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (NCLT) याकडे पाठविले, ज्यामुळे ती राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (NCLT) याकडे जाणारी पहिली वित्तीय सेवा कंपनी ठरली आहे.

- दिवान हाऊसिंग फायनॅन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीवर 83,873 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

- आर. सुब्रमण्यकुमार हे DHFL यकंपन RBIने नियुक्त केलेले प्रशासक आहेत. एकदा का NCLT द्वारे त्यांची नियुक्ती मंजूर झाल्यावर ते या प्रकरणाची सूत्रे स्वीकारतील.

▪️राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (NCLT) बाबत

- राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ (National Company Law Tribunal -NCLT) ही भारतातली अर्ध-न्यायिक मंडळ आहे जी भारतीय कंपन्यांच्या संबंधित प्रकरणाचा न्यायनिवाडा करते. त्याचे पीठ नवी दिल्लीत आहे.

- NCLT याची स्थापना ‘कंपनी कायदा-2013’ अन्वये केली गेली आणि भारत सरकारच्या वतीने 1 जून 2016 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. मंडळाची स्थापना न्यायमूर्ती जैन समितीच्या शिफारसीवर आधारित आहे.

No comments:

Post a Comment