Thursday, 19 December 2019

CBI अधिकारी बी. पी. राजू: ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019’ पुरस्काराचे विजेता

🔸केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी बी. पी. राजू ह्यांना 'इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.

🔸17 डिसेंबर 2019 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम या शहरात झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

🔸राजस्थानातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान बी. पी. राजू ह्यांना NASSCOM-DSCI यांच्यावतीने देण्यात आला आहे.

🔸त्या प्रकरणात बी. पी. राजू यांच्या नेतृत्वात असलेल्या चौकशी पथकाने नऊ आरोपींना अटक केली. छडा लावताना त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले. मुख्य म्हणजे हा तपास अल्पावधीतच पूर्ण करण्यात आला होता.

CBI विषयी

🔸केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation -CBI) ही भारताची प्रमुख तपास संस्था आहे. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ही संस्था कार्य करते. स्पेशल पोलीस इस्टेब्लीशमेंट (SPE) या मूळ नावाने त्याची स्थापना सन 1941 मध्ये झाली.

ही एक वैधानिक संस्था आहे. हा विभाग सरकारी विभागातल्या लाचखोरी, भ्रष्टाचार, घोटाळे प्रकरणी तपास करते.

No comments:

Post a Comment