Monday, 30 December 2019

देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ

◾️देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे.

◾️केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वन सर्वेक्षण अहवालाचे आज प्रकाशन झाले.

◾️जगात मोजक्‍या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे.

◾️२०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे.

◾️देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे.

◾️देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे.

◾️भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे.

◾️देशात सर्वाधिक वनक्षेत्र
📌 मध्य प्रदेश,
📌 अरुणाचल प्रदेश,
📌 छत्तीसगड,
📌 ओडिशा आणि
📌 महाराष्ट्र
या राज्यांमध्ये आहे.

◾️ कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे.

◾️वृक्षाच्छादित क्षेत्र वाढण्यात महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची आहे.

◾️आंबा, बोरी आणि डाळिंबाची दरवर्षी एक कोटी झाडे लावली जातात. ती ९५ टक्के वाढतात.

◾️ही योजना लागू होऊन १८ वर्षे झाली असून, महाराष्ट्रात १८ कोटी झाडे लागली आहेत. याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे, असे आवाहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले.

◾️सागरी पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटी जंगलांचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरने वाढले आहे.

◾️देशात एकूण खारफुटीचे जंगल ४९७५ चौरस किलोमीटर झाले आहे. २०१७ च्या तुलनेत वाढ झाली असल्याकडेही जावडेकर यांनी लक्ष वेधले. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment