Wednesday, 4 December 2019

भारतातील पहिले सागरी संग्रहालय गुजरातमध्ये (लोथल) नियोजित

📌उपयोजन :-

🔰संग्रहालय जहाजाचे बहुआयामी कार्यक्षेत्र

🔰व्यापार केलेल्या साहित्याचा स्वतंत्र शोध

🔰हिंद महासागरातील जहाजांच्या भंगार ठिकाणाहून बचावलेल्या साहित्याचे प्रदर्शन

🔰जहाज बांधणीच्या पुरातत्व विभागासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र

🔰सागरी इतिहासाची पुनर्बांधणी

📌पाण्याखालील पुरातत्व संशोधन :-

🔰पुरातत्व उत्खननातून पाण्यात बुडलेल्या जहाजांचे अवशेष, बंदरे आणि सागरी घडामोडी नोंदींचा समावेश

🔰१९८९: गोव्यातील सांची रीफ मध्ये भारतातील तुकड्यांच्या स्वरूपातील जहाजांचा अभ्यास सुरू

🔰युनेस्कोच्या मते, जगातील सागर पृष्ठभागावर सुमारे ३ दशलक्ष अज्ञात जहाजे उद्ध्वस्त अवस्थेत

📌महत्व :-

🔰समृद्ध सागरी इतिहासाबाबत भारताची अफाट क्षमता

🔰आग्नेय आशिया आणि पर्शियन आखाती प्रदेश येथील पुरातत्व पुराव्यांनुसार उलगडा

🔰४००० वर्षांपूर्वी पूर्व आणि पश्चिम समुद्रात भारतीय समुद्री प्रवास अस्तित्वात असल्याचे संकेत.

🔰बुडलेल्या जहाजांच्या अभ्यासाच्या आधारे भारताचा सागरी इतिहास आणि इतर देशांशी व्यापारिक संबंधातील दुवे शोधणे शक्य

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...