भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि १९८३चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा यंदाचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या १२ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार असून या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
श्रीकांत आणि अंजुम यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.
टीम इंडियाचे शतकांचे महाशतक
श्रीकांत यांनी १९८१ ते १९९२ यादरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
६० वर्षीय श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवला होता.
वनडेत त्यांनी भल्याभल्या गोलंदाजांची पिसं काढली. वेगवान गोलंदाजांनाही श्रीकांत हेल्मेटविना खेळायचे.
याच दौऱ्यात सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ही मालिका बरोबरीत राहिली. त्यानंतर श्रीकांत यांना कर्णधारपदावरून दूर करण्यात आले.
१९९२च्या वर्ल्डकपनंतर श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
२००९ ते २०१२ पर्यंत श्रीकांत यांच्याकडे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद होते.
अंजुम चोप्रा भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
No comments:
Post a Comment