देशातील पहिल्या कंपनी रोखे ईटीएफला अर्थात ‘भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ला (ईटीएफ) केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी येथे केली.
तत्कालिन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारी २०१८ मधील अर्थसंकल्पीय भाषणात सरकारच्या कंपन्यांचा ईटीएफ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती.
भारत बॉन्ड ईटीएफ हा भारतात सुरू होणारा पहिला कंपनी रोखे ईटीएफ असेल.
किरकोळ गुंतवणूकदारांना भारत बाँड ईटीएफमध्ये किमान १,००० रुपये गुंतवणूक करण्याची अनुमती असून भारत बॉन्ड ईटीएफला ‘आम जनता’ किंवा ‘आम आदमी’ लक्ष्य असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
या माध्यमातून सरकारला निधी उभारणी करता येणार आहे. या ईटीएफमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचा तपशील संबंधितांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केला जाईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. Are
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा