-------------------------------------------------
(१) नाव मिळवणे.
अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम
येऊन सुप्रियाने नाव मिळविले.
-------------------------------------------------
(२) रक्ताचे पाणी करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी
केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
-------------------------------------------------
(३) सोंग काढणे.
अर्थ :- नक्कल करणे.
वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब
सोंग काढतो.
------------------------------------------------
(४) रात्रीचा दिवस करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलांनी
सानियाला शिकवले.
-------------------------------------------------
(५)भांबावून जाणे.
अर्थ :- गोंधळून जाणे.
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात
आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो
भांबावून गेला.
-------------------------------------------------
(६)डोक्यावर घेणे.
अर्थ :- अतिलाड करणे.
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला
आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर
घेतले.
------------------------------------------------
(७) आळा घालणे.
अर्थ :- बंदी आणणे.
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.
--------------------------------------------------
(८) तीरासारखे धावणे.
अर्थ:- खूप वेगाने धावणे.
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश
स्पर्धेत तीरासारखा धावतो.
--------------------------------------------------
(९) मर्जी राखणे.
अर्थ :- खूश ठेवणे.
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी
जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.
--------------------------------------------------
(१०) संगोपन करणे.
अर्थ :- पालनपोषण करणे.
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने
तिचे संगोपन केले.
Thursday, 3 February 2022
दहा वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...
No comments:
Post a Comment