Monday, 23 December 2019

नोबेल पुरस्कारांबाबत माहिती नसलेल्या गोष्टी

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.

_*नोबेल पुरस्काराबाबतच्या काही रोचक गोष्टी*_

👉 या पुरस्कारातील लॉरीएट या शब्द हा ग्रीक पुरातन काळात खेळाडू आणि कवींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावरुन घेतला आहे. देवता अपोलो आपल्या डोक्यावर जो मुकुट घालयचे त्याला लॉरेल व्रेएथ म्हणतात.
   
👉 नोबेल पुरस्काराचे प्रमाणपत्र स्विडीश आणि नॉर्वेचे कॅलिग्राफर आणि कलाकार तयार करतात.

👉 नोबेल मेडल हे हाताने तयार केलेले असून 18 कॅरेट ग्रीन प्लेटेड तर 24 कॅरेट सोने वापरण्यात आले आहे.
  
👉 आतापर्यंत देण्यात आलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांचे सरासरी वय 59 वर्ष आहे.

👉 नोबेल विजेत्यांपैकी अधिक जणांचे वाढदिवस हे जून महिन्यात येतात.

👉 1901 पासून 49 वेळा नोबेल पुरस्कार देण्यात आले नाहीत. पुरस्कार न देण्याच्या घटना पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध या काळात सर्वात जास्त आहेत.

👉 लीयनिड हुरविक्ज़ यांना 2007 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी अर्थशास्त्राचे नोबेल मिळाला होता. नोबेल पुरस्कार मिळवणारे ते सर्वात वयस्कर आहेत.

👉 पाकिस्तानची मलाला सर्वात कमी वयातील नोबेल पुरस्कार विजेती आहे. तिला वयाच्या 17व्या वर्षी 2014 मध्ये शांततेसाठी पुरस्कार मिळाला होता.

👉 आतापर्यंत 48 महिलांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी दोन महिलांनी हे पुरस्कार नाकारले.

👉 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेला आतापर्यंत 3 वेळा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. या संघटनेला 1901 मध्ये शांततेचा पहिला नोबेल देण्यात आला होता.

👉 Linus Pauling ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांना दोन वेगवेगळ्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. 1954 मध्ये रसायनशास्त्रसाठी तर 1962 मध्ये शांततेसाठी हे पुरस्कार मिळाले होते.  

👉 आतापर्यंत 5 भारतीय नागरिकांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर भारतीय वंशाच्या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

👉 केवळ जिवंत असणाऱ्या व्यक्तींनाच नोबेल पुरस्कार दिला जातो. मात्र आतापर्यंत तिघांना मृत्युनंतर हा पुरस्कार दिला गेला आहे.

👉 सर्वात जास्त नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागतो.

👉 नियमानुसार प्रत्येक क्षेत्रासाठी जास्तीत जास्त तिघांना पुरस्कार देता येतो.

👉 नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबर रोजी दिले जातात. याच दिवशी 1896 मध्ये आल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...