Thursday, 26 December 2019

सरकारी योजना :- जागतिक महायुध्दातील माजी सैनिक/त्यांच्या विधवा यांना निवृत्तीवेतन

⚡ दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत पदमुक्त झालेल्या माजी सैनिकांना सैनिकी सेवेबद्दल निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत अशा महाराष्ट्रातील माजी सैनिकांना व त्यांच्या विधवांना दरमहा मासिक अनुदान दिले जाते.

🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* :

▪ दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिकांपुरतीच मर्यादीत असल्याने त्या माजी सैनिक/विधवा यांचेकडे सैन्यसेवा केल्याबाबतचा कागदोपत्री पुरवा असणे आवश्यक.
▪ माजी सैनिकास केंद्र/राज्य शासन यांचेकडून काही निवृत्ती वेतन (लष्करी अथवा नागरी, स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन) मिळत असेल व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्ती या योजनेखाली निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असणार नाहीत. मात्र असे निवृत्ती वेतन दरमहा व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा कमी असल्यास ते जेवढया रक्कमेने कमी तेवढी रक्कम या योजनेखाली निवृत्ती वेतन म्हणून मंजूर करण्याची तरतूद आहे.
▪ महाराष्ट्रात 15 वर्षे वा अधिक काळ वास्तव्य असलेले माजी सैनिक इतर अटी पूर्ण करीत असल्यास या योजनेसाठी पात्र.
▪ महाराष्ट्राचे रहिवासी नसलेल्या व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाहीत.

📄 *आवश्यक कागदपत्रे* :

● दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिक/विधवा यांचेकडे सैन्यसेवाचा पुरवा.
● माजी सैनिकास केंद्र शासनाकडून काही निवृत्ती वेतन (लष्करी अथवा नागरी, स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन) मिळत असेल व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल तर असे माजी सैनिक/विधवा या योजनेखाली निवृत्ती वेतन मिळण्यास अपात्र आहेत. मात्र आता असलेल्या निवृत्तीवेतन रकमेपेक्षा कमी असेल तर जेवढया रक्कमेने ते कमी असेल तर त्याबाबत कागदोपत्री पुरावा
● महाराष्ट्रात 15 वर्षे वा अधिक काळ वास्तव्य असलेल्या कागदोपत्री पुरावा.
● महाराष्ट्राचे रहिवासी नसलेल्या व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाहीत.
● दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत निवृत्त झालेल्या महाराष्ट्रीय माजी सैनिकांना/विधवांना निवृत्ती वेतन मंजूर करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज

💰 *दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप* : दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत पदमुक्त झालेल्या माजी सैनिकांना सैनिकी सेवेबद्दल निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत अशा महाराष्ट्रातील माजी सैनिक / विधवा यांना दरमहा 3 हजार रुपये मासिक अनुदान दिले जाते.

🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...