📌'सरहद' संस्थेच्या वतीने २ ते ४ जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये पहिली जागतिक पाकृत आणि पाली परिषद आयोजित करण्यात आली आहे.
📌यानिमित्ताने बौद्ध धम्मगुरू दलाई लामा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
📌२ जानेवारी रोजी दोन्ही मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
📌 स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कायकर्ते गिरीश गांधी यांची निवड करण्यात आली आहे.
📌जैन आणि बौद्धांनी आपल्या ग्रंथलेखनासाठी व धर्मतत्त्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी याच भाषांचा उपयोग केला आहे.
📌यातील बहुतेक शिलालेख जैन आणि बौद्ध लेण्यात आजही उपलब्ध आहे. आधुनिक काळात विविध भाषांचे ज्या प्रमाणात अनुवाद झाले त्या प्रमाणात पाली साहित्याचे झाले नाही.
📌विद्यापीठात या भाषांचा अभ्यास होत असला तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. या भाषेतील उपलब्ध व्याकरणापासून ते या भाषांच्या उत्पत्तीवरही शास्त्रशुद्ध चर्चा व्हावी आणि भविष्यातील मार्ग ठरवण्यात यावा या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती गिरीश गांधी यांनी दिली.
📌तीनदिवसीय परिषदेत प्रबंध वाचनासाठी श्रीलंका, म्यानमार, अमेरिका, भुजान तसेच जगभरातील प्राकृत आणि पाली भाषेच्या तज्ज्ञांना आमंत्रित केले जाणार आहे.
📌देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे गिरीश गांधी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment