Monday, 2 December 2019

चालू घडामोडी प्रश्न

• जुलैमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने या दलाला संघटीत गट ‘ए’ चा दर्जा देण्यास मंजुरी दिली
- भारतीय रेल्वे सुरक्षा दल (RPF)

• 2 ते 13 सप्टेंबर 2019 या काळात संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन या ठिकाणी होणार
- ग्रेटर नोएडा, दिल्ली, भारत.

• इटलीमध्ये 30 व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावणारी भारताची धावपटू
- द्युती चंद

•  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्याप्रमाणे, शेतकऱ्यांना शाश्वत व संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने राज्यातल्या अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणारी योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.

• रानीदुगमा (गम्पाहा येथे)'---------- हे भारताच्या साहाय्याने बनविलेले पहिले मॉडेल गाव या देशात आहे
- श्रीलंका.

• एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 100 बळी टिपण्याचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू
- भारताचा जसप्रित बूमरा (57 सामने).

• हेनली पासपोर्ट निर्देशांक 2019’ याच्यानुसार जगातला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेला देश
- जपान आणि सिंगापूर (संयुक्तपणे)

• भारतीय विशिष्ट  ओळख प्राधिकरण (UIDAI) याचे पहिले आधार सेवा केंद्र (ASK) उघडण्यात आले ते ठिकाण
- दिल्ली आणि विजयवाडा.

• 2020 सालापर्यंत विजेवर चालणार्या  वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनसह विकसित केली जाणारी भारताचा पहिला महामार्ग (ई-कॉरिडॉर)
- दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा महामार्ग (500 किमी).

• 2050 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कायदा करणारे जी-7 समुहामधील पहिला देश
– ब्रिटन.

• तामिळनाडूचे राज्य फुलपाखरू------------ हे आहेत
- तामिळ योमन (सिरोक्रोआ थेइस).

* IIT मद्रासने विकसित केलेले RISC-C इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारीत असलेली भारताची प्रथम स्वदेशी इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर चीप
– शक्ती प्रोसेसर.

* 'गगनयान' अंतराळ मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याकरिता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या देशाच्या कंपनीसोबत करार केला
– रशिया (ग्लॅवकोसमोस कंपनी).

*  या कंपनीने भारतात 'डिजिटल उडान' नावाचा डिजिटल साक्षरता उपक्रम जाहीर केला
- जियो.

*  नासाची कोणती अंतराळ दुर्बीण २० जानेवारी २०२० रोजी बंद पडणार आहे
- स्पीटझर

*  इस्रोच्या चांद्रयान २ या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिला शास्रज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे
- रितू करीधल व मुथय्या वनिथा

*  जगातील सर्वात लांब पूल कोणता
-हाॅगकाॅग-झुहाई पूल

* रुस्तम काय आहे
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले मानवरहित हवाई वाहन आहे

*  दस्तक अभियान काय आहे
- उत्तर प्रदेश राज्य शासनाने युनिसेफच्या सहकार्याने घरोघरी पोहचणारे दस्तक नामक अभियान आहे. त्याचे उद्दिष्टे हे जपानी मेंदुज्वाराचे राज्यातून उच्चाटन करणे हा आहे.

* मंत्रालयातील महिला कर्मचारी तसेच मंत्रालयात स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे सुलभ व्हावे यासाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाचे नाव काय आहे
- हिरकणी कक्ष

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...